आजचं मार्केट – १५ मार्च  २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १५ मार्च  २०१९

आज क्रूड US $६७.२० प्रती बॅरल ते US $६७.५२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.०६ ते US $१=Rs ६९.२३ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.८८ होता. रुपया ७ महिन्याच्या कमाल स्तरावर होता

USA आणि चीन यांच्यात असलेल्या सर्व अडचणी दूर झाल्याशिवाय USA चीन यांच्यातील करारावर सह्या होणार नाहीत. बहुतेक या सर्व अडचणी दूर होता होता करारावर सह्या होणे एक महिनाभर पुढे जाईल. USA झुकले किंवा चीनने माघार घेतली अशी पब्लिसिटी कोणालाही नको आहे. त्यामुळे प्रकरण थंड करण्याचा प्रयत्न चालू आहे. ब्रेक्झिटच्या बाबतीत सुद्धा ३ रे डील मंजूर केले जाईल किंवा युरोपियन युनियनकडून मुदत वाढ घेण्यासाठी प्रयत्न केले जातील.

आज मार्केटने बँक निफ्टी या निर्देशांकांसाठी ऑल टाइम हाय प्रस्थापित केले. आज संपलेल्या आठवड्यात निफ्टी ३५८ पाईंट, सेन्सेक्स १३५३ पाईंट तर बँक निफ्टी १६२९ पाईंट वाढला. रुपया मजबूत झाल्यामुळे आणि क्रूडच्या किमती स्थिरावल्यामुले ऑइल मार्केटिंग कंपन्यांना त्यांच्या आयातीच्या खर्चात फायदा होईल या अपेक्षेने HPCL BPCL आणि IOC या तिन्ही ऑइल मार्केटिंग कंपन्यांच्या शेअर्स मध्ये तेजी होती.म्युच्युअल फंडांना ऑइल आणि गॅस संबंधित कंपन्यांमध्ये व्हॅल्यु आहे, या कंपन्यांचे शेअर्स स्वस्त आहेत असे जाणवत असल्यामुळे या क्षेत्रातील फंड ऍलोकेशन त्यांनी वाढवले आहे. त्याचा तक्ता मी देत आहे. या मध्ये P/E रेशियो आणि P/B रेशियो दिला आहे.

 

आता मार्केटला पुढचा ट्रिगर आहे पाऊस कसा होईल याबद्दलचा मेट डिपार्टमेंट किंवा स्कायमेट कडून येणारा अंदाज होय. त्या दृष्टीने या अंदाजाचा ज्या शेअर्सवर परिणाम होईल अशा शेअरकडे लक्ष ठेवावे. मेट किंवा स्कायमेट यांनी अंदाज देण्याआड आचार संहिता येत नाही. 

 

आज RBI गव्हर्नर शक्ती कांतादास याची देशातील स्माल फायनांस बँकांबरोबर बैठक झाली. देशात एकूण १० स्मॉल फायनान्स बँका आहेत. या बँका छोटे व्यापारी उद्योगांना कर्ज देतात. उदा :- AU स्मॉल फायनान्स बँक, इक्विटास,उज्जीवन फानान्सियल,

आज GST इंटेलिजन्सनी टायर उत्पादक कंपन्यांवर GST ची रक्कम ठरवताना जास्त इनपुट क्रेडिट घेतले अशा मुद्द्यावर धाडी घातल्या. टायर कंपन्यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला.

 

ज्युबीलंट फूडच्या ब्लॉक डील मध्ये कोटक, ICICI PRU, टाटा ट्रस्ट यांनी काल हिस्सा खरेदी केला. दिल्ली हायकोर्टाने Rs २० कोटी कंझ्युमर फंडात जमा करायला सांगितले.

भारती एअरटेल आपला Rs २५००० कोटींचा राईट्स इशू आणत आहे. या राईट्स इशूसाठी कंपनीने TRAI कडे १००% पर्यंत FDI लिमिट वाढवण्याची विनंती केली पण आता हा ईशु आचारसंहितेची मुदत संपेपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. टेलिकॉम सेक्टरसाठी ४९% FDI ऑटोमॅटिक रूट ने आणण्यासाठी परवानगी आहे.

सिप्लाच्या कुरूकुंभ युनिटची USFDA कडून तपासणी सुरु झाली.

RIL ने ब्रूकफील्ड बरोबर पाईपलाईन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या

 

 कंपनीतला १००% स्टेक Rs १३००० कोटीना विकण्यासाठी करार केला पण गॅस ट्रान्सपोर्टेशनचे अधिकार मात्र रिलायंस स्वतःकडेच ठेवेल.

बजाज फायनान्सने स्ट्राईडफार्मा मधील आपला स्टेक ३%ने कमी केला.

LIC ने रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स विकले.

रिलायन्स म्युच्युअल फंडाने ICRA च्या शेअर्समध्ये खरेदी केली.

रेलिगेअर एंटरप्रायझेसने सिंग बंधूंना कर्ज दिले होते ते परत करण्याबद्दल कोर्टाचा निर्णय आला.

आरती ड्रग्ज ही कंपनी २.८२ लाख शेअर्स Rs ९०० प्रती शेअऱया भावाने BUY बॅक करेल.

कल्याणी स्टील, रमा स्टी

 

ल ट्यूब्ज यांनी स्टीलसाठी वाढती डिमांड लक्षात घेऊन आपल्या उत्पादनाच्या किमती वाढवल्या.
सन फार्माने ४० लाख शेअर्स गहाण ठेवले.

आज यामाहा कंपनीने आपली MT -१५ ही बाईक बाजारात आणली.

आज ऍडव्हान्स आयकर भरण्याची शेवटची तारीख होती त्यामुळे मिडकॅप शेअर्स मध्ये विक्री सुरु होती ही विक्री बहुतेक पुढ्या आठवड्यात थांबेल. त्याविरुद्ध गेल्या १५ दिवसात FII नी भरपूर खरेदी केली. त्यामुळे मोठ्या खाजगी बँका आणि रिलायन्स या सारखे लार्जकॅप शेअर्स वाढले. 

 

आता थोडे तांत्रिक विश्लेषणाविषयी

मी आपल्याला टेक महिन्द्राचा चार्ट देत आहे. यामध्ये गुरुवारी हॅमर पॅटर्न तयार झाला होता. या पॅटर्न नुसार आज मंदी जाऊन तेजी सुरु झाली हे आपल्याला दिसते आहे. कालच्या ब्लॉक मध्ये हँगिंग मॅन पॅटर्न पाहिला होता.

वेध पुढील आठवड्याचा

 • पुढील आठवड्याची निफ्टी ऑप्शन, बँक निफ्टी ऑप्शन, IT निफ्टी यांची साप्ताहिक एक्स्पायरी २१ मार्च रोजी मार्केटला होळीची सुट्टी असल्यामुळे २० मार्च बुधवारी होईल. त्यामुळे एक दिवस कमी मिळेल.
 • १८ मार्च २०१९ रोजी एम्बसी ऑफिस पार्क REITचा इशू येईल. याचा प्राईस बँड Rs २९९ ते Rs ३०० असेल.
 • १९ मार्च २०१९ रोजी GST कौन्सिलची रिअल इस्टेट सेक्टरमधील GST स्ट्रक्चरवरविषयी
  विचार करण्यासाठी बैठक आहे.
 • २० मार्च २०१९ तारखेला FOMC ची दोन दिवसांची मीटिंग सुरु होईल.
 • २० मार्च २०१९ रोजी ब्रेक्झिट च्या सुधारित डीलवर किंवा युरोपियन युनियनकडून मुदतवाढ यावर UK च्या संसदेमध्ये मतदान होईल.
 • माईंड ट्री ही कंपनी २० मार्च रोजी आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बैठकीत शेअर BUY बॅक वर विचार करेल.
  २२ मार्च रोजी HEG या कंपनीच्या शेअर BUY BACK चा शेवटचा दिवस असेल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८०२४ वर NSE निर्देशांक निफ्टी ११४२६ बँक निफ्टी २९३८१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

2 thoughts on “आजचं मार्केट – १५ मार्च  २०१९

  1. surendraphatak

   30 जानेवारीच्या ब्लॉगपोस्टमध्ये NTPC च्या बोनसची बातमी मी दिली आहे 19 मार्च एक्स date आहे 20 मार्च रेकॉर्ड date आहे आज खरेदी केले तरी बोनस मिळू शकेल आपण लक्षपूर्वक ब्लॉग वाचा!!

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.