आजचं मार्केट – १8 मार्च  २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १8 मार्च  २०१९

आज क्रूड US $६७ प्रती बॅरल ते US $६७.२० प्रती बॅरल या दरम्यान होते. रुपया US $१=Rs ६८.४५ ते US $१=Rs ६८.८९ या दरम्यान होता. US $निर्देशांक ९६.५२ होता. VIX १७.०२ होता. 
 
स्टेट बँक ऑफ  इंडियाची इक्विटी शेअर्सच्या माध्यमातून Rs २०००० कोटी भांडवल 
उभारण्यासाठी आपल्या २२ मार्च २०१९ रोजी ठेवलेल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बैठकीत विचार करेल. 
जेट एअरवेजच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यांनी सांगितले की बॉण्ड्सवरील व्याजाच्या पेमेन्टला उशीर होण्याची शक्यता आहे. जेटची आणखी ४ उड्डाणे आर्थीक  कारणांमुळे ग्राउंड झाली.
 
चीनमध्ये केबल उद्योगात मोठी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करण्यात आली त्यामुळे चीन आता केबल स्वस्त दरात निर्यात करू शकतो. याच उद्योगात असणाऱ्या स्टरलाईट टेक्नॉलॉजी या कंपनीचा शेअर सतत पडतो आहे. कंपनीने मात्र असे स्पष्ट केले की चीनमध्ये  केबलची किंमत कमी झाल्याचा आमच्या कंपनीवर जास्त परिणाम होणार नाही. 
 
मारुतीने आपण आपल्या उत्पादनात कपात करणार आहोत असे जाहीर केल्याने शेअर पडला. 
 
सीड्रील या कंपनीकडून टी सी एसला डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी ऑर्डर मिळाली. 
 
हॅवेल्स ने AC चे नवे मॉडेल बाजारात आणले. याची किंमत Rs ४५९०० असेल. 
 
JSW स्टीलच्या प्रमोटर्स ने ७ मार्च ते १५ मार्च दरम्यान गहाण ठेवलेले १.३० कोटी शेअर्स सोडवले. 
 
ल्युपिन या कंपनीला त्यांच्या न्यू जर्सी येथील  प्लांटसाठी USFDA ने वार्निंग जाहीर केली.
 
NLC ने Rs ४.५३ प्रती शेअर तर भारत डायनामिक्सने Rs ५.२५ प्रती शेअर आणि HAL ने Rs १९.८० प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला. 
 
आर्सेलर मित्तल यांना एस्सार स्टीलसाठी परवानगी दिली. याचा फायदा SBI, OBC IDBI कॅनरा बँक यांना होईल.
आज माईंड ट्री आणि लार्सन आणि टुब्रो इन्फोटेक या कंपन्या चर्चेत होत्या. माइंडट्री या IT क्षेत्रातील कंपनीचे २०.४% शेअर्स सिद्धार्थ आणि कॅफे कॉफी डे यांनी विकावयाचे ठरवले आहे. हे सर्व शेअर्स सिद्धार्थने कर्जासाठी तारण म्हणून ठेवले आहेत. कर्जाच्या परतफेडीस उशीर होत आहे.  या शेअर्स विक्रीच्या प्रोसिड्स मधून कॅफे कॉफी डेला असलेले कर्ज फेडण्याचा /कमी करण्याचा त्यांचा विचार आहे. 
 
L &T इन्फोटेक ही कंपनी हा स्टेक Rs ९८१ प्रती शेअर या भावाने खरेदी करण्याचा विचार करत आहे.L &T इन्फोटेक हा
स्टेक खरेदी केल्यानंतर मार्केटमधून शेअर खरेदी करून आपले होल्डिंग २६% पर्यंत वाढवून ओपन ऑफर आणू शकते. L &T इन्फोटेकने हा स्टेक विकत घेण्याविषयी विचार करण्यासाठी १८ मार्च २०१९ रोजी आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे. L &T इन्फोटेक ओपन ऑफर आणायला तयार आहे. 
 
आता जें प्रमोटर्स आहेत त्यांच्याकडे १३.३२% स्टेक आहे. त्यांना आपली माईंड ट्री ही कंपनी विकण्याची इच्छा नाही. पण L &T इन्फोटेक मात्र परिस्थितीचा फायदा घेऊन माईंड ट्री ACQUIRE करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून याला होस्टाइल टेकओव्हर असे म्हटले जात आहे.  त्यांना L &T इन्फोटेक करत असलेले  होस्टाइल टेक ओव्हर टाळायचे आहे. त्यामुळे त्यांनी २० मार्च रोजी माईंड ट्रीचे  बोर्ड ऑफ डायरेक्टर्स शेअर BUY BACK वर विचार करतील असे जाहीर केले आहे. BUY BACK साठी गेल्या ६ महिन्यातील सरासरी किंमत विचारात घेतली  जाते. ही किंमत माईंड ट्री साठी Rs ८७८ आहे. कंपनी या किमान किमतीला शेअर्स BUY बॅक ऑफर करू शकते. कंपनीच्या शेअर कॅपिटल+फ्री रिझर्व्हज यांच्या १०% पर्यंत BUY बॅक करू शकते. जर कंपनीला २५% शेअर्सचे BUY BACK करायचे असेल तर स्पेशल  रेझोल्यूशन पास करावे लागते. शेअर्स BUY BACK नंतर कंपनीचा DEBT/ EQUITY  रेशियो २:१ जास्तीतजास्त असायला पाहिजे. 
BUY BACK किंवा ओपन ऑफरमुळे माईंड ट्री या कंपनीच्या मायनॉरिटी शेअरहोल्डर्सचे काहीच नुकसान होणार नाही. त्यांच्यासाठी ही विन विन सिच्युएशन आहे. आज या बातमीचा परिणाम माईंड ट्रीचा शेअर वाढण्यात तर L &T आणि L &T इन्फोटेकचे  शेअर पडण्यात  झाला.
 
तद्यांचे असे मत आहे की जर हे टेक ओव्हर यशस्वी झाले तर माईंड ट्रीचा आताचा हाय लेव्हल स्टाफ कंपनी सोडून जाईल. तसेच बिझिनेस स्ट्रॅटेजी आणि आऊटलुक यात फरक पडेल.शेअर BUY BACK हे EPS, ROC, ROE ,लॉन्ग टर्म शेअरहोल्डर्स ची व्हॅल्यू वाढवण्यासाठी करतात. शेअर  BUYBACK चा उपयोग हे होस्टाइल  टेकओव्हर टाळण्यासाठी होईल असे वाटत नाही. टेकओव्हर या कॉर्पोरेट एक्शन विषयी माहिती माझ्या ‘मार्केट आणि मी’ या पुस्तकात दिली आहे.    
बंधन बँकेने आपल्या प्रमोटर्सचे शेअर होल्डिंग कमी करण्यासाठी गृह फायनान्सचे आपल्यात मर्जर जाहीर केले. गृह फायनान्स ही HDFC लिमिटेड ची सबसिडीअरी आहे HDFC लिमिटेड चा गृह फायनान्समध्ये ५७.८३% स्टेक आहे. शेअरस्वाप रेशियो गृह फायनान्स च्या १००० शेअर्ससाठी बंधन बँकेचे ५६८ शेअर्स असा ठरला. या मर्जरनंतर HDFC लिमिटेडचा मर्ज्ड एंटिटीमध्ये १४.९६% स्टेक राहील अशी व्यवस्था झाली. या मर्जरनंतर  बंधन बँकेच्या प्रमोटर्सचा स्टेक ६१% राहील. 
 
आता RBI ने असे सांगितले आहे की कोणतीही NBFC कोणत्याही बँकेत ९.९% पेक्षा जास्त स्टेक ठेवू शकत नाही. 
बंधन बँकेने असे जाहीर केले की त्यांना RBI कडून मर्जरसाठी परवानगी मिळाली. याचा अर्थ म्हणजे HDFC लिमिटेडला आता आपला मर्ज्ड एंटिटीमधला  १४.९६% स्टेक ९.९% पर्यंत कमी करावा लागेल. 
 
D-MART ने CP  (कमर्शिअल पेपर्स) इशू करून Rs १०० कोटी उभारले. CP म्हणजे  अल्पावधीसाठी अनसिक्युअर्ड प्रॉमिसरी नोट कंपन्या इशू करतात. यालाच CP असे म्हणतात. या CP किमान  Rs ५ लाख किंवा त्याच्या पटीत असतात. मॅच्युरिटी फिक्स्ड असते.  CP ची मुदत कमीत कमी ७ दिवस आणि जास्तीत जास्त २७० दिवस असते. हे एक DEBT इन्स्ट्रुमेंट आहे. चांगले रेटिंग असलेल्या कंपन्याच CP इशू करू शकतात.नवीन प्रोजेक्टच्या फंडिंगसाठी तसेच वर्किंग कॅपिटलसाठी CP चा उपयोग केला जातो. ज्या वेळी CP इशू करण्याचे प्रमाण वाढते त्यावेळी बँकांचा व्याजाचा दर जास्त असतो, प्रॉडक्शन सायकल अपस्विंग मध्ये असते आणि मनी मार्केट व्याजाचे दर बँकांच्या कर्जावरील व्याजाच्या  दरापेक्षा  कमी असतात पण CP कोण इशू करत आहे, त्याचा उपयोग कशाकरता केला जाणार आहे हे पाहणे जरुरीचे आहे.     
 
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८०९५ NSE निर्देशांक निफ्टी ११४६२ बँक निफ्टी २९५९६ वर बंद झाले. 

 

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.