आजचं मार्केट – १९ मार्च  २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १९ मार्च  २०१९

आज क्रूड US $६७.५७ प्रती बॅरल ते US $ ६७.८४ प्रती बॅरल या दरम्यान होते. रुपया US $१=Rs ६८.३५ ते US $१=Rs ६९.०३ या दरम्यान होता. US $निर्देशांक ९६.४५ होता.
 
UK संसदेच्या सभापतींनी PM थेरेसा मे यांना तेच बिल तिसऱ्यांदा मतास टाकण्यास मनाई केली. ह्या बिलाविरुद्ध संसदेने आधी २ वेळा मतदान केले आहे.
 
फेड च्या FOMC ची दोन दिवसासाठी बैठक आज सुरु झाली.
 
मुकेश अंबानी यांनी एरिक्सन खटल्यात Rs ४८३ कोटी कोर्टात भरल्यामुळे त्यांचे धाकटे बंधू आणि ADAG ग्रुपचे प्रमुख अनिल अंबानी यांच्यावरील तुरुंगात जायची आफत टळली. त्यामुळे ADAG ग्रुपचे शेअर्स वाढले.
 
L &T इन्फोटेक ने माईंड ट्री या कंपनीतील श्री सिद्धार्थ आणि कॅफे कॉफी डे या कंपनीचा स्टेक प्रती शेअर Rs ९८० या भावाने खरेदी केला. आणखी ४६% शेअर्स खरेदी करून माइंडट्री मध्ये ६६% पर्यंत स्टेक घेण्याचा L &T चा हेतू आहे. या स्टेक खरेदीनंतरही माईंड ट्री ही वेगळी कंपनीच राहील असे जाहीर केले . आज मात्र L &T, माईंड ट्री, कॅफे कॉफी डे हे शेअर पडले. पण L &T इंफोटेक आणि सिद्धार्थ याच्याच सिकल लॉजिस्टिक या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी आली.
 
प्रत्येक वर्षातून दोनदा गॅसच्या किमती ठरवल्या जातात. एप्रिल आणि ऑक्टोबर मध्ये या किमती ठरवल्या जातात. गॅसची किंमत वाढेल या अंदाजाने आज ONGC, ऑइल इंडिया, गेल, IGL आणि MGL या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली.
BS VI नॉर्म्स लागू होणार असल्यामुळे दुचाकी वाहनांची इन्व्हेन्टरी वाढत आहे. सर्व दुचाकी वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी आपण या वर्षी उत्पादनात कपात करणार आहोत असे जाहीर केल्यामुळे आज हिरोमोटो, TVS, आयचर मोटर्स, बजाज ऑटो या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मंदी आली.
 
एस्सार स्टीलचे रेझोल्यूशन जवळ जवळ पूर्ण होत आल्यामुळे ऍसेट रिकन्स्ट्रक्शन कंपन्यांचा फायदा होईल. एडेलवाईस, JM फायनान्सियलचे शेअर्स वाढत होते..
 
टाटा मोटर्स JLR च्या काही मॉडेल्सच्या किमतीत १ एप्रिल २०१९ पासून ४% पर्यंत वाढ करणार आहे.
 
आज GST कौन्सिलची बैठक झाली. त्यात खालीलप्रमाणे निर्णय झाला. १ एप्रिल पासून अंडरकन्स्ट्रक्शन फ्लॅटवर इनपुट टॅक्स क्रेडिट शिवाय ५% आणि जर इनपुट टॅक्स क्रेडिट घेतले तर GST १२% राहील. अंडर कन्स्ट्रक्शन अफोर्डेबल हौसिंगसाठी १% GST लागेल. हा निर्णय रिअल्टी क्षेत्रासाटी आणि घर घेणाऱ्या ग्राहकांसाठी लाभदायक आहे.
 
IOC या कंपनीने Rs १.५० प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.
 
जेट एअरवेजमध्ये आणखी गुंतवणूक करायला नकार दिल्यावर सरकारने जेट एअरवेजला कर्ज देणाऱ्या बँका आणि फायनान्सियल इन्स्टिट्यूशनना कंपनीला अडचणीतून बाहेर काढण्याचे आवाहन केले. एतिहाद आपला जेट एअरवेज मधील २४% स्टेक स्टेट बँकेला विकायला तयार आहे.
 
ग्रॅन्युअल्स इंडिया या कंपनीने तारण म्हणून ठेवलेले १.४ कोटी शेअर सोडवले.
 
AURIONPRO सोल्युशन ही कंपनी आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या बैठकीत २५ मार्च २०१९ रोजी BUY बॅक वर विचार करेल.
 
आज निफ्टी पुष्कळ दिवसांनी ११५०० वर बंद झाला.
 
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८३६३ NSE निर्देशांक निफ्टी ११५३२ बँक निफ्टी २९७६८ वर बंद झाले.

 

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.