आजचं मार्केट – २० मार्च  २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २० मार्च  २०१९

आज क्रूड US $ ६७.५० प्रती बॅरल ते US $ ६७.६८ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६८.७४ ते US $१= Rs ६९.१३ या दरम्यान होता. US $निर्देशांक ९६.४५ होता.आज मार्केटमध्ये तेजी आणि मंदीचा खेळ चालू होता. लाल आणि हिरवा दोन्हीही रंग दाखवून बुल्स आणि बेअर्स यापैकी कोणालाही तक्रार करायला वाव मिळाला नाही.

USA आणि चीन यांच्या मधील टॅरिफ वरील वाटाघाटी लवकर संपतील असे वाटत नाही. चीनने बोईंग मॅक्स ७३७ या विमानाला टॅरिफ लिस्टमधून हटवा तसेच USA ने लावलेली टॅरिफ आधी हटवावी म्हणजे पुढची बोलणी चालू ठेवता येतील असे सांगितले युरोपिअन युनियनने UK च्या पंतप्रधान थेरेसा मे यांना असे सांगितले की एप्रिलच्या मध्यापर्यंत ब्रेक्झिटची मुदत २०२० सालापर्यंत वाढवा अन्यथा ३ महिन्यात कोणत्याही डील शिवाय ब्रेक्झिटसाठी तयार राहा. त्यामुळे आता UK ला पुढील पंधरा दिवस महत्वाचे आहेत. कारण जर डील मंजूर करून घ्यायचा निर्णय घेतला तर UK च्या संसदेत हे डील जुलाय २०१९ पर्यंत मंजूर करून घ्यावे लागेल.

आज निरव मोदी याला लंडनमध्ये अटक करण्यात आली. यामुळे आता PNB च्या फ्राड केसमधील पैसे वसूल होतील या अंदाजाने PNB चा शेअर वाढला.

व्हेनिझुएला या देशाने भारताला होत असलेली क्रूडची निर्यात स्थगीत ठेवायची ठरवले आहे. हा देश आता मुख्यतः रशिया आणि चीन या देशांना क्रूड निर्यात करेल. आतापर्यंत भारत या देशाकडून क्रूड आयात करणारा दुसरा मोठा देश होता.भारतात अलनिनो आपली चाहूल देत आहे.

अलनिनोमुळे पावसावर विपरीत परिणाम होतो. पावसाळ्याचे पहिले दोन महिने महत्वाचे असतात. या काळात पाऊस नेहेमीपेक्षा कमी पडेल असे स्कायमेटने आपले निरीक्षण जाहीर केले. अल निनोचा आणि दुष्काळाचा जवळचा संबंध आहे. आतापर्यंत भारतात पडलेल्या २० दुष्काळांपैकी १३ दुष्काळात अलनिनोने आपली हजेरी लावली होती

आज वोडाफोन आयडिया या कंपनीने Rs २५००० कोटींच्या राईट्स इशू घोषणा केली. हा राईट्स इशू Rs १२.५० प्रती शेअर या भावाने आणण्यात येत आहे. आपल्याजवळ जर या कंपनीचे ३८ शेअर्स असतील तर कंपनी तुम्हाला ८७ राईट्स शेअर्स Rs १२.५० प्रती शेअर या भावाने ऑफर करेल. CMP च्या तुलनेत जवळजवळ ५५% डिस्काउंट देऊन हा इशू कंपनी आणत आहे. या कंपनीचे प्रमोटर्सही या राईट्स इशूत भाग घेतील. या राइट्सची रेकॉर्ड डेट २ एप्रिल २०१९ ही असून हा १० एप्रिल २०१९ रोजी ओपन होऊन २४ एप्रिल २०१९ रोजी क्लोज होईल. कंपनी या इशुच्या प्रोसिड्सचा उपयोग कर्ज कमी करण्यासाठी करेल. सेबीने वोडाफोनआयडियाच्या प्रमोटर्सना ७५% शेअर होल्डिंग साठी परवानगी दिली.( राईट्स इशू या आणि इतर कॉर्पोरेट एक्शन विषयी माझ्या ‘मार्केट आणि मी” या पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे)

गुजरात पोल्युशन कंट्रोल बोर्डाने रॅलीज इंडियाचा अंकलेश्वर प्लांट बंद करायला सांगितले.

L & T चा DNA बदलत आहे असे दिसते. सेबीने L &T ला ‘शेअर BUY BACK’ साठी परवानगी नाकारल्यावर कंपनीने आपण पुन्हा शेअर BUY BACK साठी अर्ज करू असे सांगितले होते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी या BUY बॅक साठी घेतलेले शेअर्स विकले नाहीत. L &T ने आता माईंड ट्री मधील कंट्रोलिंग स्टेक घेण्याचे ठरवले असल्यामुळे L &T आता स्वतःचे शेअर्स BUY BACK करेल ही शक्यता मंदावली. त्यामुळे L &T च्या शेअरहोल्डर्सची निराशा झाली आहे. L & T ला हवे असलेले माईंड ट्रीचे शेअर्स ओपन ऑफर योग्य किमतीला आणल्याशिवाय त्यांना मिळणें कठीण होईल. माईंड ट्रीचे शेअर्सहोल्डर्स L &T ला ओपन ऑफरची किंमत वाढवायला लावतील असे दिसते. कंट्रोलिंग स्टेक मिळवण्यासाठी L &T ला हे शेअर्स Rs ११०० ते Rs १२०० प्रती शेअर्स या भावाने खरेदी करावे लागतील. सेबीच्या नियमाप्रमाणे जर ओपन ऑफर दिली तर माईंड ट्री ह्या कंपनीला आपला शेअर BUY बॅक रद्द करावा लागेल.इन्फोसिस या कंपनीचा शेअर BUY BACK ओपन मार्केट रुटनी २० मार्च २०१९ पासून सुरु झाला.हा शेअर BUY BACK १०३.२५ मिलियन शेअर्स BUY बॅक होईपर्यंत किंवा सहा महिने जे लवकर होईल तोपर्यंत इशू ओपन राहील.

आरती ड्रग्सचा शेअर BUY BACK शेअर होल्डर्ससाठी चांगला आहे. CMP च्या भावाच्या वर ३९% किंमत म्हणजे Rs ९०० प्रती शेअर या भावाने कंपनी शेअर्स BUY BACK करेल. EMBASSY पार्क ऑफिसचा REIT इशू आज पूर्णपणे सबस्क्राईब झाला.

वेध उद्याचा

  • उद्या फेडच्या दोन दिवसांच्या बैठकीत काय निर्णय झाला ते समजेल.
  • HEG या कंपनीचा BUY बॅक २२ मार्च रोजी बंद होईल. IEX च्या शेअर BUY BACK ची एक्स डेट २१ मार्च २०१९ असेल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८३८६ NSE निर्देशांक निफ्टी ११५२१ बँक निफ्टी २९८३२ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – २० मार्च  २०१९

  1. Vasant Bhadane

    Namaste mi vasant Bhadane ojhar nashik kadun jai hind please guide me share markets and matual funds Baddal mahiti pathava please

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.