आजचं मार्केट – २२ मार्च  २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch २७-२८एप्रिलला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – २२ मार्च  २०१९

आज क्रूड US $ ६७.४३ प्रती बॅरल ते US $६७.८५ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६८.६१ ते US $१=Rs ६९.०४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.७६ होता.

USA फेड च्या दोन दिवसांच्या बैठकीत दर न वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर्षी फेड ने दोनदा रेट वाढवण्याची शक्यता वर्तवली होती. या उलट आता फेडने रेट न वाढवता एखादवेळी क्वचित परिस्थिती बघून एक रेट कट करण्याची शक्यता वर्तवली.

ECU ने ब्रेक्झिटसाठीची मुदत तीन महिन्यापर्यंत वाढवण्यास संमती दिली.

या दोन जागतिक स्तरावरील घटनांमुळे लिक्विडीटी वाढेल आणि त्यामुळे FII चा फ्लो भारतात येत असल्यामुळे आणि भविष्यातही चालू राहण्याची शक्यता असल्यामुळे रुपयाच्या विनिमय दरात चांगलीच सुधारणा झाली.

बुधवारी गुजरातस्थीत ‘संदेश’ हा मेडिया क्षेत्रातला शेअर Rs ८० ने वाढला. निवडणुकीमुळे मेडिया क्षेत्रातल्या कंपन्यांच्या उत्पन्नावर सकारात्मक परिणाम होईल. आता DB CORP, HT मेडिया जागरण प्रकाशन, सन टी व्ही, या शेअर्स कडे लक्ष ठेवावे लागेल.

निरव मोदी पकडले गेले आणि २९ मार्च २०१९ रोजी त्याला UK मधील कोर्टापुढे सादर करण्यात येईल. या बातमीमुळे PNB आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे शेअर्स वाढले.

माईंड ट्री ने आपला शेअर्स BUY बॅक चा निर्णय २६ मार्चपर्यंत पुढे ढकलला. L & T आणत असलेल्या ओपन ऑफरचा रागरंग बघूनच पुढचे पाऊल उचलावे असा विचार झालेला दिसतो आहे.

USFDA ने ज्युबिलन्ट लाईफच्या म्हैसूर प्लांटची तपासणी केली. पण याचा विक्रीवर फारसा परिणाम होणार नाही.
कॅडीला हेल्थकेअर या कंपनीच्या अहमदाबाद येथील R &D युनिटच्या USFDA ने १८ मार्च २०१९ ते २२ मार्च २०१९ दरम्यान केलेल्या तपासणीत क्लीन चिट दिली.

जेट एअरवेजच्या अडचणी वाढतच आहेत. एका बाजूला कर्ज देणार्या बँकांच्या जेट मध्ये स्टेक घेण्याच्या निर्णयावर बँक कर्मचाऱ्याच्या युनियनने हरकत घेतली आहे. एअरलाईन चालवण्याचे काम बँकांचे नाही. बँकांनी आपण दिलेले कर्ज वसूल करण्यावर लक्ष केंद्रित करावे असे युनियनचे म्हणणे आहे. एका बाजूने दोनतीन महिन्यांचे पगार न मिळाल्यामुळे पायलट आणि इतर कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता आहे. दुसर्या बाजूने स्पाईस जेट आणि इंडिगो या कंपन्या जेटचे पायलट आणि इतर कुशल कर्मचारी यांना आपल्या कंपनीत नोकरी देण्याची बोलणी करत आहेत. तसेच जेटच्या विमानांवरही ह्या एअरलाईन्स लक्ष ठेवून आहेत. तरी जेट एअरवेजचे प्रमोटर नरेश गोयल व्यवस्थापनावरचा आपला ताबा आणि बोर्ड ऑफ डायरेक्टरवरील सीट खाली करण्यास विलंब करत आहेत . त्यामुळे दिवसेंदिवस जेट एअरवेजची स्थिती बिकट होत आहे.

इंडोनेशियाने भारत रशिया आणि चीनमधून जे आयर्न ओअर इंडोनेशियात येते त्याच्यावर २०% अँटी डंपिंग ड्युटी लावली.

कावेरी सीड्सला आंध्रप्रदेशच्या राज्य सरकारने पुन्हा कॉटन सीड्स साठी लायसेन्स दिले.

सरकार या आठवड्यात बँक ऑफ बरोडा मध्ये Rs ५००० कोटी भांडवल घालेल.

IEX या कंपनीचा BUY BACK आज पासून सुरु झाला.

CPSE ETFचा इशू आजपासून बंद होईल.

ऑटो सेक्टर दुचाकी आणि चार चाकी वाहनासाठीची मागणी कमी झाल्यामुळे ऑटो पार्ट्स बनवणाऱ्या, ऑटो पेंट बनवणार्या कंपन्यांच्या विक्रीवर याचा परिणाम होईल. यामुळे ऑटो आणि ऑटो अँसिलरी सेक्टरमध्ये तसेच प्रामुख्याने ऑटो लोन देणाऱ्या NBFC आणि टायर उत्पादक कंपन्या यांच्या शेअर्स मध्ये मंदी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.उदा मदरसन सुमी, अमर राजा बॅटरी, एक्झाईड, सिएट, JK टायर, कन्साई नेरोलॅक.

FPI (फॉरीन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर) इन्व्हेस्टमेंटची मर्यादा वाढवण्याचा सरकार विचार करत आहे. IPO आणि FPO मध्ये २०% आणि एका कंपनीच्या IPO किंवा FPO मध्ये गुंतवणुक करण्याची मर्यादा वाढण्याची शक्यता आहे. या प्रकारची मागणी USIBC ने ( USA आणि इंडिया बिझिनेस कौन्सील) केली होती.

मार्केटचे निरीक्षण करून आकलन केल्यास प्रत्येक गोष्ट समजते. दोन दिवसांपूर्वी हवामानाचा अंदाज सांगितला होता. अलनिनोचा परिणाम होईल पाऊस नॉर्मलपेक्षा कमी होईल असा अंदाज सांगितला होता. नेहेमी पावसाळ्यात बांधकाम थांबते किंवा कमी होते. पण यावर्षी असे होणार नाही. बांधकाम चालू राहील. सिमेंट आणि इतर रिअल्टी क्षेत्राशी संबंधित असलेल्या शेअर्स मध्ये तेजी येईल असा अंदाज आहे.आज ACC अंबुजा हे शेअर्स तेजीत होते.

MIAL ( मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड) मध्ये GVK पॉवर ने Rs ७७ प्रती शेअर या भावाने १०% स्टेक ACSA GLOBAL कडून खरेदी केला. आता MIAL मध्ये GVK पॉवर चा ७४% स्टेक होईल.

USFDA ने अलकेम लॅबच्या ST. लुइस प्लान्टमध्ये उत्पादन करण्यावर बंदी घातली. या युनिटच्या तपासणीत ८ त्रुटी मिळाल्या. USFDA कडून अंतिम मंजुरी मिळेपर्यंत हे उत्पादन चालू करण्यासाठी परवानगी मिळणार नाही. काही उत्पादनांशी संबंधित त्रुटी दाखवल्या. अलकेम लॅबची ७०% विक्री भारतातच होते. त्यांची बहुतांश उत्पादने OTC (ओव्हर द कॉउंटर) विकणारी आहेत. त्यासाठी डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन लागत माही. त्यामुळे अल्केम लॅबच्या विक्रीवर याचा फारसा परिणाम होणार नाही.

वेध पुढील आठवड्याचा

  • २५ मार्च २०१९ पासून टेक महिंद्रचा BUY BACK सुरु होईल.
  • २६ मार्च २०१९ रोजी RBI ने व्यापारी संघटना आणि रेटिंग एजन्सीची बैठक बोलावली आहे. माईंड ट्रीच्या बोर्ड ऑफ
  • डायरेक्टर्सची शेअर BUY BACK वर विचार करण्यासाठी बैठक आहे.
  • अलाहाबाद बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची बैठक भांडवल उभारण्यासाठी होईल.
  • २९ मार्च २०१९ रोजी MSTC च्या शेअर्सचे लिस्टिंग होईल.
  • ब्रिटानिया निफ्टीमध्ये HPCL ची जागा घेईल.
  • R सिस्टिमची BUY बॅक बंद होईल.
  • ONGC च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची २३ मार्चला दुसऱ्या अंतरिम लाभांशावर विचार करण्यासाठी बैठक आहे

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८१६४ NSE निर्देशांक निफ्टी ११४५६ बँक निफ्टी २९५८२ वर बंद झाले भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.