आजचं मार्केट – २५ मार्च  २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch २७-२८एप्रिलला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – २५ मार्च  २०१९

आज क्रूड US $६६.६६ प्रती बॅरल ते US $६६.९१ प्रती बॅरल या दम्यान तर रुपया US $१=Rs ६८.७८ ते US $१=Rs ६९.१३ या दरम्यान होते .US $ निर्देशांक ९६.६२ होता. फीअर आणि ग्रीड मीटर ४३ होते.

UK मध्ये २९ मार्च २०१९ चार दिवसांवर आली तरी ब्रेक्झिट डीलवर UK च्या संसदेचा काहीच निर्णय झालेला नाही. त्यामुळे याबाबतची अनिश्चितता आणि गोंधळ वाढत आहे.

ओपेक क्रूडचे उत्पादन कमी करण्यावर भर देत आहे तर नॉन -ओपेक देश क्रूडचे उत्पादन वाढवण्यावर भर देत आहेत.
जून जुलै ह्या महिन्यात हॅरिकेन म्हणजे वादळे येण्याचा सिझन असतो. या काळात एक्स्प्लोरेशन बंद असते. त्यामुळे क्रूडचे भाव वाढतील. मेटने याआधीच अलनिनोच्या संभाव्य आगमनाची आणि त्याच्यामुळे होणाऱ्या हवामान आणि पाऊस यांच्यावरील परिणामांची सूचना दिली आहे.

चीन, USA ,तसेच युरोप येथे मागणी सर्व सामान्यरित्या कमी होत असल्याने जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी येण्याचे भाकीत करण्यात येत आहे. ३ जानेवारी २०१९ नंतर USA च्या मार्केट मध्ये मंदी आली. २००७ नंतर प्रथमच USA मध्ये शॉर्ट टर्म ट्रेजरी बिलांवरील यिल्ड १० वर्षाच्या ट्रेजरी बिलांपेक्षा जास्त झाले. हे मंदी क्षितिजावर दिसु लागली याचे चिन्ह असते.

भारती एअरटेल आणि टाटा टेली यांच्या मर्जरला NCLAT बरोबरच DOT (डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन) मंजुरी देईल. मात्र यासाठी काही गॅरंटीज द्याव्या लागतील.

आज जेट एअरवेजच्या बोर्ड मीटिंग मध्ये नरेश गोयल आणि अनिता गोयल यांनी डायरेक्टर्स म्हणून राजीनामे दिले. कर्ज देणार्या बँका Rs १५०० कोटी घालणार आहेत. एतिहादचा स्टेक २४% वरून १२% तर गोयलचा स्टेक ५१% वरून २५.५% राहील कर्ज देणार्या बँकांचा स्टेक ५०.५% असेल.

वरुण बिव्हरेजीस या कंपनीला पेप्सिकोचे फ्रँचाइज राईट्स घ्यायला CCI ( कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया) ने परवानगी दिली.

टेक महिंद्रचा शेअर BUY बॅक प्रती शेअर ९५० या भावाने टेंडर पद्धतीने आज पासून सुरु झाला हा BUY बॅक ५ एप्रिल २०१९ पर्यंत ओपन राहील.

आर्थीक घोटाळे कमी व्हावेत म्हणून लिस्टेड कंपन्यांचे अकौंट्स तपासण्याचा आणि डायरेक्ट कारवाई करण्याचे अधिकार सेबीला मिळाले .

सन फार्माच्या बसका युनिटच्या USFDA ने २८ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०१९ या दरम्यान केलेल्या तपासणीत १ त्रुटी दाखवली.

ज्युबिलण्ट फूड्समला श्री लंका, नेपाळ आणि बांगला देश मध्ये आपली युनिट्स उघडायला परवानगी मिळाली बांगलादेशमध्ये त्यांना चांगला प्रतिसाद असून विक्री चांगली होत आहे. IPL सुरु झाल्यामुळे क्रिकेट प्रेमींकडून ज्युबिलण्ट फूड्स उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.आता ज्युबिलण्ट फूड्सने लेट नाईट डिलिव्हरी सुरु केली आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७८०८ NSE निर्देशांक निफ्टी ११३५४ आणि बँक निफ्टी २९२८१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.