आजचं मार्केट – २६ मार्च  २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch २७-२८एप्रिलला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – २६ मार्च  २०१९

आज क्रूड US ६७.२७ प्रती बॅरल ते US $ ६७.८८ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६८.७८ ते US $१= Rs ६७.९३ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.५६ होता.

ICICIPRU मधील आपला २.६% स्टेक Rs ३०० फ्लोअर प्राईसने OFS च्या माध्यमातून ‘PRU’२६ मार्च २०१९ आणि २७ मार्च २०१९ रोजी विकणार आहे . जर या OFS ला चांगला प्रतिसाद मिळाला तर आणखी १.१% स्टेक विकणार आहे. लिस्टिंग नॉर्म्सची पूर्तता करण्यासाठी हा स्टेक विकत आहे. या OFS मधून Rs १५९८ कोटी मिळतील.

गॅसची किंमत US $ ३.८ एवढी वाढवली जाणार आहे. याचा फायदा HOEC, ONGC, OIL, आणि RIL यांना होईल. याचा तोटा सिरॅमिक आणि टाईल्स कंपन्यांना होईल.

स्टेट बँक ऑफ इंडिया जेट एअरवेजला दोन महिन्यासाठी इंटरीम फंडिंग आणि Rs १५०० कोटी १० वर्षांकरता देईल. एप्रिल महिन्याच्या अखेर पर्यंत बँकांनी ही कंपनी खरेदी करण्यासाठी बोली मागवल्या आहेत. मे महिन्यापर्यंत ही प्रक्रिया पुरी होईल असा अंदाज आहे.जेट एअरवेजची समस्या सुटण्याच्या मार्गावर आहे असे दिसल्याबरोबर जेट एअरवेजच्या शेअरमध्ये तेजी आली तर जेट समस्याग्रस्त झाल्यामुळे इंडिगो आणि स्पाईसजेट हे शेअर्स वाढत होते त्यांच्यातील तेजी कमी झाली.

भारताने USA आणि युरोप मधून आयात होणाऱ्या ‘ACETONE’ वर अँटी डम्पिंग ड्युटी लावली.

ITC चा ‘जॉन फ्लेवर’ हा ब्रँड रिलायन्स इंडस्ट्रीजने खरेदी केला.

ONGC ने Rs १ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.याची रेकॉर्ड डेट २७ मार्च आहे.

CCL प्रॉडक्ट्स ने Rs १.७५ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.

SBI लाईफने आज Rs २ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला

DLF QIPच्या मार्फत १७.३ कोटी शेअर्स Rs १८३ या भावाने विकून Rs ३००० कोटी उभारणार आहे. या QIP ईशूची प्रोसिड्स कर्ज फेडण्यासाठी वापरली जातील. DLF ही विक्री प्रमोटर्सचा स्टेक ७५ % ठेवण्यासाठी विकणार आहे.

AURINPRO या कंपनीचा शेअर BUY बॅक Rs १८५ प्रती शेअर या भावाने सुरु झाला.

पेन्नार इंडस्ट्रीज ही कंपनी FY २० मध्ये २० रिटेल स्टोर्स उघडणार आहे

LIC ने आपला ACC या कंपनीतील स्टेक १ फेब्रुवारी २०१९ ते २२ मार्च २०१९ दरम्यान ३.१%ने कमी केला.

सन फार्माच्या प्रमोटर्सनी ४० लाख शेअर्स १५ मार्च रोजी गहाण ठेवले.

१४ मे २०१९ ते २७ मे २०१९ दरम्यान लार्सन अँड टुब्रो माईंड ट्रीमधील ५.१३ लाख कोटी ( ३१% शेअर्स) शेअर्ससाठी Rs

९८० प्रती शेअर या भावाने ओपन ऑफर आणेल. L & T या ऑफरसाठी Rs ५०३० कोटी खर्च करेल.

माईंड ट्री या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बैठकीत शेअर BUY BACK मागे घेण्याचा निर्णय झाला. तसेच L & T च्या ओपन ऑफरवर सर्वांगाने विचार करण्यासाठी डायरेक्टर्सची एक समिती नेमण्याचे ठरले.

रेल विकास निगम या सार्वजनिक क्षेत्रातील मिनिरत्न सरकारी कंपनीचा IPO २९ मार्च २०१९ ते ३ एप्रिल २०१९ या दरम्यान Rs १७ ते Rs १९ या प्राईस बँड मध्ये येत आहे. शेअरची दर्शनी किंमत Rs १० असून मिनिमम लॉट ७८० शेअर्स चा असेल. या कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग ११ एप्रिल २०१९ रोजी होईल. रिटेल इन्व्हेस्टर आणि कर्मचाऱ्याना Rs ०.५० डिस्कॉउंट ठेवला आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८२३३ NSE निर्देशांक निफ्टी ११४८३ आणि बँक निफ्टी २९८८२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.