आजचं मार्केट – २७ मार्च  २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch २७-२८एप्रिलला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – २७ मार्च  २०१९

आज क्रूड US $ ६७.२९ प्रती बॅरल ते US $ ६८.१९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६८.८७ ते US $ १ = Rs ६८.९२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.३७ होता.VIX १७.१४ झाला.

शीला फोमचे प्रमोटर्स आपला ८.६८% स्टेक OFS च्या माध्यमातून विकणार आहेत. या OFS साठी फ्लोअर प्राईस Rs ११०० ठेवली आहे. प्रमोटर्सचा या कंपनीत ८५% स्टेक आहे तो त्यांना कमी करायचा आहे.

सध्या हवामानात फार मोठा बदल होत आहे. दिवसा तपमान जास्त असते आणि रात्री गारवा असतो. यामुळे कोंबड्या मरत आहेत. पण निवडणुकांसाठी चाललेल्या सभांमुळे मागणी खूप आहे. त्यामुळे किंमत Rs ६४ वरून Rs ९२ पर्यंत म्हणजे जवळजवळ ५०% वाढल्या आहेत. त्यामुळे वेंकीजच्या शेअर मध्ये तेजी आली.

वेदांताच्या झारसुगडा युनिटला नाल्कोने त्यांच्या कडे असलेल्या शिलकी अल्युमिनाच्या विक्रीसाठी काढलेल्या टेंडर मध्ये भाग घेण्यासाठी ओडिशा हायकोर्टाने परवानगी दिली. त्यामुळे या युनिटला असलेली कच्च्या मालाची टंचाई दूर होऊन त्यांच्या उत्पादन क्षमतेचा अधिक उपयोग होईल.

भुज, मंगलोर, भोपाळ, औरंगाबाद या ठिकाणी ३१ मार्च जेट एअरवेजची उड्डाणे सुरु होत आहेत.एप्रिल अखेरपर्यंत जेट एअरवेजची ७५ विमाने उड्डाण सुरु करतील जेट एअरवेजमध्ये डेल्टा, कतार, विस्तारा, इंडिगो स्वारस्य दाखवत आहेत.

GMR इन्फ्रा ही कंपनी GMR एअरपोर्टमधील ४०% स्टेक Rs ८००० कोटींना GIC कन्सॉरशियम किंवा टाटा यांना विकणार आहे.

ICICI PRU च्या OFS चौपट प्रतिसाद मिळाला.

WOCKHARDTच्या औरंगाबाद युनिटला हेल्थ प्रोडक्टस रेग्युलेटरी ऑथॉरिटी IRELAND आणि UK MHRA कडून ३ वर्षांसाठी क्लिअरन्स मिळाला.

भारताने अँटी सॅटेलाईट A -SAT मिसाईलने ३०० किलोमीटर लो ऑर्बिट मध्ये असलेल्या लाईव्ह सॅटेलाईटचा वेध घेऊन ते नष्ट केले.भारत स्पेस पॉवर बनला भारत USA चीन रशिया यांच्या पंक्तीत जाऊन बसला. यामुळे संरक्षण संबंधित कंपन्यांचे शेअर्स वाढले. भारत डायनामिक्स. BEL, BEML ,हिंदुस्थान एअरोनॉटिक्स,ASTRA MICROWAVE, वालचंदनगर इंडस्ट्रीज.

कॅडीलाच्या फार्मेझ युनिट मध्ये USFDA ने एक त्रुटी दाखवली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८१३२ NSE निर्देशांक ११४४५ बँक निफ्टी ३००१९ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.