आजचं मार्केट – २८ मार्च  २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch २७-२८एप्रिलला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – २८ मार्च  २०१९

आज क्रूड US $ ६७.५९ प्रती बॅरल ते ६७.७३ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६८.९० ते US $१=Rs ६९.०४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.८२ ते ९७.०५ या दरम्यान होता.

RBI ४ एप्रिल २०१९ रोजी आपले द्विमासिक धोरण जाहीर करेल. या धोरणाचा पवित्रा बदललेला असेल असा अंदाज वर्तवला जात आहे. गेल्या पॉलिसीमध्ये कॅलिबरॅटिव्हचा NEUTRAL स्टान्स केला आणि आता NEUTRAL वरून अकॉमोडिटीव्ह स्टान्स केला जाईल. एप्रिलच्या वित्तीय धोरणात RBI पुन्हा ०.२५% रेट कट जाहीर करेल असा तज्ज्ञाचा अंदाज आहे.

चीनच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा दिसत आहे. त्यांनी कमी व्याजाच्या दराने कर्ज दिले होते त्याचा परिणाम दिसत आहे.
UK मध्ये ब्रेक्झिटच्या प्रश्नावर ब्रेक्झिट उद्यावर येऊन पोहोचले तरी कोणत्याही प्रकारचे डील UK च्या संसदेत मंजूर होत नसल्यामुळे आता UK च्या पंतप्रधानांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.

GSK फार्माच्या चेअरमन पदावरून दीपक पारेख यांनी राजीनामा दिला. रेणू सूद कर्नाड यांची नवी चेअरमन म्ह्णून नियुक्ती केली.

हवामान खात्याने या पावसाळ्यात चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला. जुलै महिन्यानंतर पावसात सुधारणा होईल असाही अंदाज व्यक्त केला.

१ एप्रिल २०१९ पासून महिंद्रा आणि महिंद्रा या कंपनीने आपल्या गाड्यांच्या किमती २.७% ने वाढवल्या. किमती Rs ५०००पासून Rs ७३००० पर्यंत किमती वाढवल्या.

सरकारने साखर कारखान्यांना एप्रिल ३० २०१९ पर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देणे असलेली बाकी देण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांकडे रोडमॅप पाठवला. सरकारने या शेतकऱ्यांना ७५% रक्कम ३० एप्रिल २०१९ पर्यंत देण्यास सांगितले.
मारुतीने ‘CIOZ’ चे नवीन १.३लिटर आणि १.५ लिटर डिझेलचे मॉडेल लाँच केले.

इन्फोसिसने ABN AMRO च्या सबसिडीअरीमध्ये ७५% स्टेक घेण्यासाठी करार केला.

फ्युचर रिटेलने २६ मार्चला ७४ लाख शेअर्स गहाण ठेवले.

पिरामल आणि बेअरिंग हे DHFL मध्ये मेजॉरिटी स्टेक घेणार आहेत अशी बातमी होती.

सरकार बँक ऑफ बरोडा मध्ये Rs ५०४२ कोटी प्रेफरन्स शेअर्सच्या माध्यमातून घालणार आहे.
NBCC ला Rs १००३ कोटींच्या ऑर्डर्स मिळाल्या.

एम्बसी REIT चे १ एप्रिल २०१९ रोजी लिस्टिंग होईल.

नजीकच्या भविष्यात येणारे IPO

मेट्रो पोलीस हेल्थकेअर हा IPO ३ एप्रिल २०१९ ते ५ एप्रिल २०१९ या दरम्यान दर्शनी किंमत Rs २ आहे. मिनिमम लॉट १७ शेअर्सचा. प्राईस बँड Rs ८७७ ते Rs ८८० आहे.IPO Rs १२०४ कोटींचा आहे.

MT EDUCARE त्यांचा स्टेक विकून पैसा उभा करणार आहेत.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८५४५ NSE निर्देशांक निफ्टी ११५७० आणि बँक निफ्टी ३०४२० वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.