Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका
आजचं मार्केट – ३० एप्रिल २०१९
आज क्रूड US $ ७१.८६ प्रती बॅरल ते US $७२.२९ प्रति बॅरल आणि रुपया US $१=Rs ६९.७६ ते US $१=Rs ६९.८३ या दरम्यान होते. डॉलर निर्देशांक ९७.८९ होता. VIX २२.७७ होते.
मतदानाची चौथी फेरी पार पडली. या मध्ये विक्रमी म्हणजे ५५.१% मतदान झाले. यामुळे एक्झिट पोलच्या अंदाजामध्ये फरक पडू शकतो.
USA मध्ये क्रूडचे उत्पादन वाढल्यामुळे आज क्रूडचा दर कमी झाला. त्यामुळे रुपयाही सुधारला.पण या सगळ्याचा सकारात्मक परिणाम मार्केटवर झाला नाही.
येस बँकेच्या आणि हिरो मोटो कॉर्पच्या निकालांमुळे मार्केट पडणार हे निश्चित झाले होते. बँका आणि NBFC नी या मंदी मध्ये भर घातली. RBI ने सगळ्यांना सांगितले होते की या वेळच्या निकालांमध्ये प्रत्येकी कंपनीने IL &FS आणि सुपरटेक रिअल्टीमध्ये किती एक्स्पोजर आहे हे सांगितले पाहिजे.या कंपन्यांमध्ये ज्या कंपन्यांचे एक्स्पोजर आहे त्या सगळ्या कंपन्यांचे शेअर्स पडले. येस बँक आणि इंडिया बुल्स हौसिंग फायनान्स हे दोन्ही शेअर्स पडले.
येस बँकेच्या नव्या व्यवस्थापनाने सफाई अभियान सुरु केले आहे. पण RBI चे जे म्हणणे होते आणि RBI चा जो NPA विषयीचा अंदाज होता आणि येस बँकेच्या जाहीर केलेल्या NPA मध्ये डायव्हर्जन्स आहे अशी बाचाबाची चालू होती. त्यामध्ये आता RBI च्या निरीक्षणात तथ्य होते असे दिसते. विवादास्पद कंपन्यांमध्ये अजूनही एक्स्पोजर उघड होण्याची शक्यता आहे. अजून जसजसा काळ जाईल तसतसे आणखी किती NPA बाहेर येतील याची भीती मार्केटला आहे. शिवाय येस बँक कॉर्पोरेट फायनान्सिंगमधून बाहेर पडून रिटेल बँकिंग मध्ये शिफ्ट होत आहे. म्हणून येस बँकेची बॅलन्सशीट सुधारायला बराच कालावधी जावा लागेल असे वाटते.
येस बँकेनी Rs १०,०००/- कोटींची कर्ज वॉचलिस्ट मध्ये ठेवली आहेत. पण ही कर्जे NPA म्हणून जाहीर केली नाहीत. Rs ९५० कोटींचा फायदा होईल असे वाटत होते त्याऐवजी Rs १५०० कोटी तोटा जाहीर केला.
PNB, बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक यांचे मर्जर होणार अशी अफवा असल्यामुळे तिन्हीही बँकांचे शेअर ५% पडले.
वाडिया ग्रुपचा वारस नेस वाडिया याला जपानमधील कोर्टाने ड्रग्ज जवळ बाळगल्याबद्दल २ वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यामुळे बॉम्बे डायिंग, बॉम्बे बर्मा, ब्रिटानिया, नॅशनल पेरॉकसाईड हे शेअर पडले.
गार्डनरीच शिपबिल्डर्स हा शेअर Rs ११२ या कमाल किमतीला पोहोचला. त्यांनी भारतीय सरकारबरोबर ८ ASW SWALLOW वॉटर क्राफ्टची बांधणी आणि डिलिव्हरी साठी Rs ६३.११ बिलियन करार केला.
६३ मून आणी NSEL यांच्या मर्जरला सुप्रीम कोर्टाने मनाई केली.
इंडिया बुल्सचे प्रमोटर्स इंडिया बुल्स रिअल इस्टेटमधला स्टेक पूर्णपणे किंवा अंशतः किंवा एकेक करून विकणार आहेत. DLF, गोदरेज, शापूरजी पालनजी, ब्लॅकस्टोन आणि ब्रूकफील्ड यांनी त्यात स्वारस्य दाखवले आहे.
ADAG ग्रुपच्या कंपन्यांचे रेटिंग घटवले. म्हणून या ग्रुपच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स पडले.
HDFC लाईफचे IL &FS मध्ये Rs ६५ कोटींचे एक्स्पोजर आहे. यासाठी ५०% प्रोव्हिजन केली आहे. दोन नवीन प्रॉडक्ट्स लाँच केल्यामुळे त्यांचा मार्केट शेअर वाढायला मदत होत आहे.
ग्रीव्हज कॉटनची २ मे २०१९ रोजी शेअर BUY BACK आणि निकालावर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे. प्रमोटर्स आपल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करत आहेत
BASF या कंपनीचा नफा वाढला पण उत्पन्न घटले.
फिलॅटेक्स या कंपनीचा निकाल चांगला आला पण मार्जिनमध्ये मामुली घट झाली.
गोदरेज प्रॉपर्टीज आणि EXIDE यांचे निकाल चांगले आले.
IL &FS ला एक्स्पोजर असल्यामुळे NBFCज ना भांडवल उभारणी करणे कठीण जाईल. त्यामुळे PSU बँकांसाठी ही चांगली संधी आहे.
मारुतीने नवीन एर्टिगा मार्केटमध्ये लाँच केली. या कारची किंमत Rs ९.८६ आणि त्याच्या पुढे आहे.
थोडे तांत्रिक विश्लेषण
निफ्टी दिवसाच्या हाय पाईंटला बंद झाला. हीच निफ्टीची ओपनिंग लेव्हल होती.त्यामुळे दैनिक चार्टवर ‘ड्रॅगनफ्लाय दोजी’ हा पॅटर्न तयार झाला होता. मार्केट दिवसभर वेगवेगळ्या बातम्यांमुळे पडत होते. पण दिवसअखेरीस मार्केट जवळजवळ पूर्ण सुधारले. प्रॉफिट बुकिंग आहे त्याच बरोबर ‘BUY ऑन डिप्स सुरु आहे ‘ हे समजते पण प्रेडिक्टिव्ह व्हॅल्यू कमी आहे.शॉर्ट टर्म ट्रेण्ड साईडवेज आहे हे दिसते. ट्रेडिंग रेंज वाईड झाली आहे.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९०३१ NSE निर्देशांक निफ्टी११७४० बँक निफ्टी २९७६४ वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!