आजचं मार्केट – १ एप्रिल २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch २७-२८एप्रिलला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – १ एप्रिल २०१९

आज क्रूड US $ ६७.८५ प्रती बॅरल ते US $ ६८.७३ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१ =Rs ६९.१४ ते US $१=Rs ६९.२१ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.०७ होता.

आज मार्केट सुरुवातीला ४०० पाईंट वाढले. आज मार्केट रेकॉर्ड क्लोजिंग देईल असे वाटत असतानाच मार्केट हळू हळू पडायला सुरुवात झाली. बँक निफ्टी रेड मध्ये बंद झाला. निफ्टी ११७०० च्या स्तरावर टिकू शकला नाही.
आज पुर आला पण लवकरच ओसरला सेन्सेक्सने ३९००० चा स्तर पार केला. पण नंतर प्रॉफिट बुकिंग आल्यामुळे कमी झाला.

सिप्ला कुरकुंभ युनिटच्या USFDA ने ११ मार्च २०१९ ते २० मार्च २०१९ या दरम्यान केलेल्या तपासणीत ८ त्रुटी दाखवल्या.
पोल्युशन कंट्रोल बोर्डाने SRF कंपनीला त्यांचे दाहेज युनिट बंद करायला सांगितले आहे.

DR रेड्डीज च्या दुआडा युनिटला जर्मन रेग्युलेटरने क्लीन चिट दिली.

जेट एअरवेजच्या वैमानिकांनी त्यांचा संप मागे घेतला. त्यांना डिसेंबर महिन्यासाठीचे पगार दिले आहेत.

५ एप्रिलला पंतप्रधान मोदींवर आधारलेला चित्रपट रिलीज करण्यासाठी निवडणूक आयोगाने परवानगी दिली. तसेच १२ एप्रिलला ‘ताश्कंद फाईल्स’ हा चित्रपट रिलीज होत आहे. त्यामुळे PVR, इनॉक्स लिजर, मुक्ता आर्ट्स, यांच्या शेअर्स कडे लक्ष ठेवा.

चीनची अर्थव्यवस्था सुधारते आहे असे दिसते. PMI ५०.०३ आला. यामुळे धातू क्षेत्राशी संबंधित शेअर्स सुधारले.
दक्षिण भारतामध्ये पावसाळ्यापूर्वीची सिमेंटची मागणी वाढत आहे. सिमेंटचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण भारतातील सिमेंट उत्पादक कंपन्यांचे शेअर वाढतील.

ICRA या रेटिंग एजन्सीने रिलायन्स कॅपिटलचे रेटिंग कमी केले.

दार्जिलिंग चहाच्या उत्पादनाचे आकडे फारसे चांगले आले नाहीत. त्यामुळे चहाची किंमत वाढेल. त्याबरोबरच चहा उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स वाढतील.

लायका लॅब या कंपनीने बँक ऑफ महाराष्ट्रकडून घेतलेले कर्ज फेडले नव्हते. पण आता त्यांनी सेटलमेंट केली. Rs ११लाख कर्ज आणि Rs ३ लाख फीही भरली. त्यामुळे आता तारण म्हणून ठेवलेले शेअर सुटतील.

KKR ही इक्विटी फर्म HDFC मधील स्टेक विकणार आहे.

ICICI सिक्युरिटीजच्या CEO आणि MD शिल्पाकुमार यांनी राजीनामा दिला. ७ मे २०१९ पासून विजय चंडोक हे कंपनीचा चार्ज घेतील.

ICICI बँकेनी MCLR चे रेट ०.०५% घटवले.

आजपासून बँक ऑफ बरोडा, देना बँक. आणि विजया बँक यांचे मर्जर पूर्ण झाले. विजया बँकेच्या Rs १० दर्शनी किमतीच्या १००० शेअरच्या बदल्यात बँक ऑफ बरोडाचे( Rs २ दर्शनी किमतीचे) ४०२ शेअर्स तर देना बँकेच्या Rs १० दर्शनी किमतीच्या १००० शेअर्सच्या बदल्यात ११० बँक ऑफ बरोडा (Rs २ दर्शनी किमतीचे) शेअर्स मिळतील. BOB ने आज देना बँकेच्या शेअरहोल्डर्सना BOB चे २४.८ कोटी शेअर्स इशू केले तर विजया बँकेच्या शेअरहोल्डर्सना ५२.४० कोटी शेअर्स इशू केले.

आता पुढे PNB, अलाहाबाद बँक, आणि बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांचे मर्जर होईल अशी बातमी आहे.

मार्च २०१९ महिन्यात GST ची वसुली १.०६ लाख कोटींच्या जवळपास गेली.

सरकार NTPC च्या ३.२५% स्टेक OFS च्या माध्यमातून विकणार आहे

JSW एनर्जीने EV बिझिनेसमध्ये पैसे गुंतवण्याचा निर्णय रद्द केला. त्याऐवजी दुसऱ्या कोअर बिझिनेसमध्ये पैसे गुंतवू असे सांगितले.

ATF च्या किमती दर १५ दिवसांनी बदलतात. यावेळी जवळ जवळ Rs ६०० ने किंमत वाढली . IOC ने दिल्लीमध्ये ATF ची किंमत Rs ६७७ ने वाढवली.

हॅवेल्सच्या राजस्थानमधील घिलोत युनिटमध्ये AC चे कमर्शियल उत्पादन सुरु झाले.

एम्बसी REITचे Rs ३०९.५९ वर लिस्टिंग झाले.

मारुतीची मार्च महिन्यातील विक्री १.६% ने कमी झाली.मारुती आपल्या कार्सच्या काही मॉडेल्सच्या किमती वाढवणार आहे.

आयचर मोटर्सच्या CV ची विक्री ७.८% ने कमी झाली.

अतुल ऑटोची मार्च२०१९ मधील विक्री १५.२% ने वाढली.

SML इसुझू ची विक्री मार्च महिन्यात १४.१% वाढली.

कोटक बँक आणि RBI यांच्यातील खटल्याची सुनावणी २२ एप्रिल २०१९ पर्यंत पुढे गेली

धामपूर शुगर च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची शेअर BUY BACK वर विचार करण्यासाठी ५ एप्रिल २०१९ रोजी बैठक आहे.

आता तांत्रिक विश्लेषणाविषयी माहिती

२९ मार्च २०१९ रोजी ‘पिन बार पॅटर्न’ तयार झाला होता.लोअर लेव्हलला खरेदी होत आहे हे पिन बार पॅटर्न दाखवत होता पण त्याच बरोबर सावधगिरीची सूचनाही मिळत होती. पण विक्रीसाठी सिग्नल मिळत नव्हता.

त्यामुळे आजच्या मार्केटकडे लक्ष होते. मार्केट वरच्या स्तराला टिकाव धरत नाही असे दिसताच प्रॉफिट बुकिंगला सुरुवात झाली. हेच आज तयार झालेला ग्रेव्ह स्टोन डोजी पॅटर्न दाखवतो आहे. शार्प रॅली झाल्यानंतर बेअर्स थोडे ऍक्टिव्ह झालेले दिसले. निफ्टी आज लाईफ टाईम हायपासून २२ पाईंट दूर असतानाच मार्केट पडायला सुरुवात झाली. निफ्टीचा ऑल टाइम हाय ११७६० आहे. म्हणून मार्केटने चाल बदलली का ? हे मंगळवारच्या कँडल स्टिक वरून समजेल. आज १ एप्रिल २०१९ रोजी ‘ग्रेव्ह स्टोन डोजी’ पॅटर्न तयार झालेला दिसत आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८८७१ NSE निर्देशांक निफ्टी ११६६९ बँक निफ्टी ३०३२६ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.