आजचं मार्केट – २ एप्रिल २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch २७-२८एप्रिलला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – २ एप्रिल २०१९

आज क्रूड US $६९.०८ प्रती बॅरल ते US $६९.२० प्रती बॅरल तर रुपया US १=Rs ६९.१८ ते US $१= Rs ६९.३८ या दरम्यान होते. US $निर्देशांक ९७.२९ होता. VIX १८.२३ होता. PCR १.४८ होता.

क्रूड आज ५ महिन्यांच्या कमाल स्तरावर आहे. मे २०१९ या महिन्यात USA त्यांनी इराणवर घातलेले निर्बंध आणखी कडक करणार आहे. इटली ग्रीस आणि तैवान यांना या निर्बंधाबाबतीतली सूट मागे घेणार आहे. क्रूडसाठी असलेली मागणी सतत वाढत आहे. त्यामुळे अल्प मुदतीसाठी तरी क्रूडमध्ये तेजी राहील असे दिसते.

चीन आणि USA यांच्यातील टॅरिफ वाटाघाटी प्रगतीपथावर आहेत.

UK मध्ये ब्रेक्झिटवरील पंतप्रधान थेरेसा मे यांचे डील UK संसदेने तिसऱ्यांदा फेटाळले. त्यामुळे आता ब्रेक्झिट विषयी पूर्णपणे अनिश्चिततेची परीस्थिती आहे.

USA मध्ये मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टीव्हीटीमध्ये सुधारणा झाली. चीनमध्येही सुधारणा दिसत आहे. भारतातही नैराश्य नाहीसे होऊन मार्केटमध्ये नको तेवढी उत्तेजना दिसत आहे. RSI वरून सुद्धा मार्केट ओव्हरबॉट स्थितीत आहे हे दिसते. RSI ७४.२५ आहे RSI( RELATIVE STRENGTH INDEX ) ७० पेक्षा जास्त असेल तर ओव्हरबॉट आणि ३० पेक्षा कमी असेल तर ओव्हरसोल्ड स्थिती असते.

पॅनला आधार लिंक करण्याची तारीख ३०सप्टेंबर २०१९ पर्यंत वाढवली.

पॉलीकॅब या( ही कंपनी वायर्स आणि केबल्स बनवते) कंपनीचा IPO ५ एप्रिल २०१९ पासून ओपन होईल. या शेअर्सची दर्शनी किंमत Rs १० असून प्राईस बँड Rs ५३३ ते ५३८ असून मिनिमम लॉट २७ शेअर्सचा आहे.

झी एंटरटेनमेंट मधील आपले स्टेक एस्सेल ग्रुपमधील एंटिटीजनी १३ फेब्रुवारी २०१९ आणि २९ मार्च २०१९ रोजी विकले.

२६ ऑक्टोबर २०१८ पासून मार्केट १६३९ पाईंट वाढले.निफ्टी १२००० ते १२२०० पर्यंत जाईल असे वाटते

निवडणुकीच्या आधी प्रॉफिटमध्ये असाल तर प्रॉफिट बुक करा. भांडवलाचे रक्षण करा. किंवा तुम्ही F &O मध्ये ट्रेडिंग करत असाल तर प्रोटेक्टिव्ह पुट स्ट्रॅटेजि वापरा त्याचा विम्यासारखा उपयोग होईल.

BSNL आणि MTNL या दोन सरकारी कंपन्या पुनरुज्जीवित करण्यासाठी आता PMO प्रयत्न करत आहे. सरकारला आता DOT त्यांचा रिव्हायव्हल प्लॅन सादर करील. यात 4स्पेक्ट्रम चे अलोकेशन, भांडवल घालणे, कर्मचाऱयांसाठी VRS, इत्यादींचा समावेश असेल.

टाटा मोटर्स २०२० वर्षात इलेक्ट्रिक जॅग्वार I- PACE मार्केटमध्ये आणणार आहे. तसेच या वर्षात भारतातही हायब्रीड मॉडेल्स मार्केटमध्ये आणेल.

भारती एअरटेलने सुप्रीम कोर्टात सांगितले शारदा चिटफंडविषयीच्या खटल्यात आम्ही CBI ला आवश्यक ती माहिती देत आहोत. तसेच आम्ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार CBI ला सहकार्य करत आहे.

PAY tm लवकरच शेअर ट्रेडींग कारभार सुरु करणार आहे. यासाठी त्यांना आवश्यक ती परवानगी सेबी कडून मिळाली आहे.

१२ फेब्रुवारी २०१८ रोजी RBI ने एक परिपत्रक काढले होते.त्यानुसार कर्जाच्या वसुलीत जरी एक दिवस जरी उशीर झाला तरी त्या अकौंटला NPA करावे. हे परिपत्रक सुप्रीम कोर्टाने असंवैधानिक आणि RBI साठी अल्ट्राव्हायर्स ठरवून रद्द केले. पॉवर कंपन्यांची अडचण होती की कधी कोळसा तर कधी गॅस यांची टंचाई. कधी राज्य सरकारची पेमेंट करण्यात होणाऱ्या दिरंगाईमुळे त्यांना वसुलीचे वेळापत्रक पाळता येत नाही. सुप्रीम कोर्टाने आता हे परीपत्रक रद्द केल्यामुळे बँकांचे NPA वाढणे कमी होईल. तसेच पॉवर कंपन्यांना दिलासा मिळेल. आता बँकाही पॉवर कंपन्यांसाठी रिस्ट्रक्चरिंग पॅकेज मंजूर करू शकतील. हा निर्णय आल्यावर पॉवर कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली.

भारत रोड या कंपनीने Rs ३२३ कोटींचा दावा जिंकला.

BEL आणि टाटा मोटर्स यांनी अनुक्रमे Rs १०० आणि Rs २०० च्या किमतीचा टप्पा ओलांडला तर SBI ने ५२ आठवड्यांचा कमाल स्तर ओलांडला.

बजाज ऑटोच्या विक्रीत १८% वाढ झाली

अडानी गॅसला ७ जिल्ह्यांमध्ये गॅस डिस्ट्रिब्युशनचे काम मिळाले.

स्ट्राईड फार्माच्या सिंगापुर युनिटला USFDA कडून क्लीन चिट मिळाली.

ल्युपिनला त्यांच्या पिथमपूर यूनिटसाठी ८ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर २०१८ या दरम्यान झालेल्या तपासणीत USFDA ने क्लीन चिट दिली

आयशर मोटर्सचे CEO म्हणून विनोद दसारी ( आधी अशोक लेलँडचे CEO होते.) यांनी पदभार स्वीकारला.

ENIL ने ९१.९EM हे रेडिओ स्टेशन उज्जैनला सुरु केले.

DR रेड्डीज च्या सब्सिडियरीनें डर्मा ब्रॅण्डच्या USA मधील डिस्ट्रिब्युशनचे आणि मार्केटिंगचे हक्क ENCORE DERMATOLOGY या कंपनीला विकले.

वेध उद्याचा

  • ४ फेब्रुवारी २०१९ रोजी RBI आपले द्विमासिक वित्तीय धोरण जाहीर करेल.०.२५% रेट कट होईल असे मार्केटने गृहीत धरले आहे .
  • इन्फोसिस आणि TCS आपले वार्षिक निकाल १२ एप्रिल २०१९ रोजी जाहीर करतील.
  • GM ब्रुअरीज ४ एप्रिलला तर डेल्टाकॉर्प आपले वार्षिक निकाल ८ एप्रिल रोजी जाहीर करतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९०५६ NSE निर्देशांक निफ्टी ११७१३ बँक निफ्टी ३०३५४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.