आजचं मार्केट – ३ एप्रिल २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch २७-२८एप्रिलला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ३ एप्रिल २०१९

आज क्रूड US $६९.७० प्रती बॅरल ते US $ ६९.७८ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६८.४२ ते US $१=Rs ६८.७५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.०९ होता तर VIX १८.४३ ते १८.८० च्या दरम्यान होता.

DEVELOPED मार्केटमधील बॉण्ड यील्ड कमी झाली तर भांडवल इमर्जिंग मार्केटमध्ये यायला सुरुवात होते.या कारणामुळेच FPI (फॉरीन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर) भारतामध्ये गुंतवणूक वाढवत आहेत.

आज निफ्टी २८ ऑगस्ट २०१८ नंतर प्रथमच ११७६१ वर पोहोचला. १४६ सत्रानंतर मार्केट या स्तरावर पोहोचले.
CNG च्या किमती Rs १.५० ने वाढवायला सरकारने परवानगी दिली.

आज स्कायमेट या संस्थेने मान्सून विषयी आपले अनुमान दिले. जून २०१९ ते सप्टेंबर २०१९ या काळात मान्सून सामान्यापेक्षा कमी राहील. ९३% सरासरी पाऊस पडेल. जूनमध्ये ७५% तर जुलैमध्ये ५५% पाऊस पडेल.मे २०१९ आणि जुलै २०१९ या महिन्यात अलनिनोचा प्रभाव ६६% राहील.  पाऊस सामान्यपेक्षा कमी राहिला तर AC बनवणाऱ्या कंपन्यांना फायदा होईल. AC साठी जो गॅस लागतो तो नवीन फ्लोरो बनवतात.

जेटची आज आणखी १५ विमाने ग्रॉउंड झाली. आता त्यांची एकूण ६१ विमाने ग्राउंड झाली आहेत.

IGL ला ७ ठिकाणी गॅस डिस्ट्रिब्युशनचे काम मिळाले.

काल सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे जेटच्या तातडीच्या रिकन्स्ट्रक्शन पॅकेजला खीळ बसल्यासारखी झाली. स्टेट बँक लीडर असलेल्या बँकांच्या कन्सॉरशियमने याबाबत पुनर्विचार करावा लागेल असे सांगितले.या बँकांच्या कन्सॉरशियममध्ये एका बँकेचा सहभाग ३०% पेक्षा जास्त असू शकणार नाही.आता Rs १५०० कोटी बँकांकडून मिळायला उशीर लागेल अशी चिन्हे दिसत आहेत. त्यातच सिविल एव्हिएशन सचिवांनी घोषणा केली की जेट एअरवेजची विमाने आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी योग्य आहेत की नाही याची तपासणी करावी लागेल. ४ एप्रिलला होणाऱ्या बँकांच्या बैठकीत या सर्व परिस्थितीवर विचार केला जाईल.

अमर राजा बॅटरी या कंपनीने १९९७ पासून असलेला JC( जॉन्सन कंट्रोल) मॉरिशस, JC(जॉन्सन कंट्रोल) BATTERY ग्रुप आणि गाला परिवाराबरोबरचा शेअर होल्डिंग करार रद्द केला. जॉन्सन कंट्रोल ही कंपनी अमर राजा बॅटरी या कंपनीला टेक्निकल नॉलेज पुरवत होती.जॉन्सन कंट्रोल या कंपनीने ब्रूकलीनला आपला पॉवर सोल्युशन बिझिनेस विकला POWER FRAME टेकनॉलॉजी लायसेन्स करारानुसार अमर राजा कंपनीला पूर्णपणे टेक्निकल KNOWHOW ट्रान्स्फर झाला आहे.आणि बॅटरी उत्पादन करण्यासाठी आवश्यक असलेली टेक्नॉलॉजि अमलात आणण्यासाठी कंपनीने सगळी खबरदारी घेतली आहे.तसेच कराराप्रमाणे आणखी काही दिवस जॉन्सन कंट्रोल ही कंपनी अमर राजा बॅटरीला टेक्निकल नॉलेज पुरवेल. जॉन्सन कंट्रोल या कंपनीकडे अमर राजा या कंपनीतील सुमारे २५% हिस्सा होता. हा हिस्सा आता ब्रूकलिनला ट्रान्स्फर होईल. त्यामुळे हे आंतरराष्ट्रीय डील पुरे होईपर्यंत अमर राजा बॅटरीच्या शेअरमध्ये मंदी येण्याची शक्यता आहे. तसेच अमर राजा बॅटरीला नवीन टेक्निकल कोलॅबोरेटर शोधावा लागेल.

L &T ने कोबेल्को मशिनरी JV मधील पूर्ण स्टेक कोबे स्टील या जपानी कंपनीला Rs ४३.५ कोटीना विकला.

साखर उत्पादक कंपन्यांनी ऑइल कंपन्यांबरोबर २४० कोटी लिटर इथेनॉल विक्रीसाठी करार केला.

लक्ष्मी विलास बँकेच्या प्रमोटर्सनी २.०३% तारण ठेवलेले शेअर्स सोडवले.

सन फार्माने २२ मार्च २०१९ रोजी ७० लाख शेअर्स तारण ठेवले.

ल्युपिनच्या पुणे येथील बायोरिसर्च युनिटला USFDA ची मंजुरी मिळाली.

कॅडीला हेल्थकेअरच्या अहमदाबाद युनिटच्या २५/०३/२०१० ते २/०४/२०१९ दरम्यान केलेल्या तपासणीत USFDA ने १ त्रुटी दाखवली.

येस बँकेने आपल्या MCLR ०.१०% ने कमी केला.

रिलायन्स कम्युनिकेशननी Rs २८० कोटींच्या स्पेक्ट्रम हप्त्याच्या पेमेंटचा डिफॉल्ट केला. १० दिवसांच्या आत कंपनीला ही रक्कम पेनल्टीसकट भरावी लागेल.

रेमंड ही कंपनी ‘रेमंड रिअल्टी’ या नावाने रिअल्टी बिझिनेसमध्ये उतरणार आहे. रेमंड ठाण्यात Rs २५० कोटींची गुंतवणूक करणार आहे. दोन प्रोजेक्ट सुरु करणार आहे.

ZF ही कंपनी Rs ६३१८ प्रती शेअर या भावाने WABCO या कंपनीचे शेअर्स खरेदी करेल.

वेध उद्याचा

 • उद्या RBI आपले द्वैमासिक वित्तीय धोरण जाहीर करेल. या वित्तीय धोरणात ०.२५% रेट कट होईलच अशी शेअर मार्केटची धारणा आहे.
 • उद्या बँक निफ्टी ऑप्शन , निफ्टी ऑप्शन आणि IT निफ्टीऑप्शन ची साप्ताहिक एक्स्पायरी आहे.
 • उद्या GM ब्रुअरीज ही कंपनी आपले वार्षिक निकाल जाहीर करेल.
 • ५ एप्रिलपासून टेकमहिन्द्राचा शेअर BUY बॅक बंद होईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८८७७ NSE निर्देशांक निफ्टी ११६४३ बँक निफ्टी ३००९३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

4 thoughts on “आजचं मार्केट – ३ एप्रिल २०१९

  1. surendraphatak

   Do you mean interested in the classes? If so, please call 9699615507 and we can provide more information

   Reply
 1. Jayant Mendjoge

  Bhagyashri tai
  Namaskar.
  I have read your AJACHA Market report for about various 15 days. I appreciate your knowledge and simplicity in your looks and way you explain. If you permit ,please suggest few shares with price for buying with target price for selling as example .Investors will appreciate this. In a course of time your followers will increase and you will get benefit and money in the process. Will await for action on the suggestion. Thank you.

  Reply
  1. surendraphatak

   Hi Jayant. If you read rest of blog you will realise that I am not in the business of giving tips. I educate people on stock market and like to empower them to take their own decisions.. I am not going to compromise on my principles to get more followers or money. Thanks for your suggestion though.

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.