आजचं मार्केट – ४ एप्रिल २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch २७-२८एप्रिलला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ४ एप्रिल २०१९

आज क्रूड US $६९.०१ प्रति बॅरल ते US $ ६९.३९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६८.५३ ते US १=Rs ६९.०७ या दरम्यान होते. VIX १९.३२ होते. USA $ निर्देशांक ९७.१८ होता.

AI बेस्ड चॅट प्लॅटफॉर्म हैप्टिक ही कंपनी Rs ७०० कोटींना रिलायन्स इंडस्ट्रीजने खरेदी केली.

SRF च्या दाहेज प्लाण्टला पोल्युशन कंट्रोल बोर्डाने परवानगी दिली. आजपासून येथे उत्पादन सुरु होईल.

HDFC बँक २० एप्रिल २०१९, ऍक्सिस बँक २५ एप्रिल तर इन्फोसिस आणि टी सी एस आपले वार्षिक निकाल १२ एप्रिल २०१९ रोजी जाहीर करतील.

फोर्स मोटर्सची विक्री ८.९% ने कमी झाली. ४११७ युनिट्स विकली गेली. टाटा मोटर्सची USA मधील JLR ची विक्री ०.२% वाढली तर जाग्वार ची विक्री १.८% ने वाढली.

२०२९ या वर्षीय ७.२६% बॉण्ड्सचे यिल्ड ७.३१% झाले.

आज RBI ने आपली द्वैमासिक वित्तीय धोरण जाहीर केले. RBI च्या MPC ( मॉनेटरी पॉलिसी कमिटी) ६ सदस्यांपैकी ४ सदस्यांनी रेट कट करावा असे मत दिले तर दोन सदस्यांनी आहे तीच परिस्थिती कायम ठेवावी असे मत दिले. सर्वसाधारण लोकांच्या अपेक्षेप्रमाणे RBI ने आपले रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट ०.२५% ने कमी केले . RBI ने रेपो रेट ६.२५% वरून ६% तर रिव्हर्स रेपो रेट ६% वरून ५.७५ % केला. CRR ४% वर कायम ठेवला. तसेच आपला स्टान्स न्यूट्रल ठेवला.RBIने २% जादा SLR लिक्विडीटी कव्हरेज रेशियोसाठी वापरण्यास संमती दिली. त्यामुळे लिक्विडीटी वाढेल. RBI ने वित्तीय वर्ष २०२० साठी GDP ग्रोथ ७.२% तर वित्तीय वर्ष २०२१ मध्ये GDP ग्रोथ ७.४% राहील असा अंदाज वर्तवला.RBI ने महागाईचा दर वित्तीय वर्ष २०२० साठी ३.८% तर वित्तीय वर्ष २०२१ साठी ४.१ % राहील असा अंदाज वर्तवला.RBI हौसिंग फायनान्स सिक्युरिटायझेशनवर विचार करण्यासाठी एक समिती नेमेल. या समितीचा अहवाल ऑगस्ट २०१९ या महिन्यात प्रसिद्ध केला जाईल. यामुळे हौसिंग कंपन्या त्यांची कर्जे विकू शकतील आणि त्यांची लिक्विडीटी वाढेल.कॉर्पोरेट बॉण्ड साठी RBI एक टास्क फोर्स संगठीत करेल.तसेच कर्जासाठी सेकंडरी मार्केट डेव्हलप करण्यावर विचार करण्यासाठी एक समिती नेमेल. सुप्रीम कोर्टाच्या १२ फेब्रुवारी २०१८ च्या परिपत्रकाविषयीच्या निर्णयाचा अभ्यास करून लवकरच या विषयावर RBI आपले नवे परिपत्रक जाहीर करेल.

RBI ने केलेला रेट कट ( ०.५०% म्हणजे ०.२५ फेब्रुवारी २०१९ आणि ४ एप्रिल २०१९ प्रत्येकी ०.२५%) खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील बँकांनी ग्राहकापर्यंत पोहोचवावा म्हणून RBI या बँकांचा पाठपुरावा करत आहे. पण शेवटी प्रत्येक

आपल्या ALM ( ऍसेट लायबिलिटी मॅनेजमेंट) च्या धोरणानुसार निर्णय घ्यायचा आहे असे RBI गव्हर्नर यांनी सांगितले. आपण केलेला रेट कट नव्या वर्षाच्या म्हणजे गुढी पाडव्याच्या आधी केला असल्याने बँकांनी तो ग्राहकांपर्यंत लवकर पोहोचवावा असे आवाहन केले

स्टेट बँक ऑफ इंडियाने असे जाहीर केले की ते १ मे २०१९ पासून हा रेट कट त्यांच्याकडे असलेल्या ठेवींवर आणि कर्जाच्या दरात बदल करून आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवेल.

RBI च्या MPC ची पुढील बैठक ३ ४ आणि ६ जून २०१९ रोजी होईल. RBI आपले पुढील द्वैमासिक वित्तीय धोरण ६ जून २०१९ रोजी जाहीर करेल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८६८४ NSE निर्देशांक निफ्टी ११५९८ बँक निफ्टी २९९०४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.