आजचं मार्केट – ५ एप्रिल २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch २७-२८एप्रिलला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ५ एप्रिल २०१९

आज क्रूड US $ ६९.०५ प्रती बॅरल ते US $ ६९.२७ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.०९ ते US $ १= Rs ६९.२५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.२३ होता. VIX १३.४२ होता

गुजरात पोल्ल्युशन बोर्डाने रॅलीजच्या अंकलेश्वर युनिटला परवानगी दिली त्यामुळे हे युनिट बंद करण्याची वेळ येणार नाही.
मालाला मागणी नाही या कारणासाठी मारुतीने आपल्या उत्पादनात २०% कपात केली.

विप्रोमध्ये एल आय सी ने ०.५% स्टेक Rs २५८ प्रती शेअर या भावाने खरेदी केला.

सेबीने सर्किट फिल्टरमध्ये बदल केले. काही शेअर्सचे फिल्टर ५% वरून १०% तर काही शेअर्सच्या बाबतीत ५% वरून २०% (नेलको, AB मनी, थिरुमलाय केमिकल्स) तर काही कंपन्यांचे १०% वरून २०% केले. (गोवा कार्बन). त्यामुळे मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये तेजी आली.

RBI कडे पूर्वीपासून असलेले शिलकी रिझर्व्हज सरकारला देण्यात काहीच अडचण नाही असे जालन कमिटीशी केलेल्या संवादातून आढळून आले असे सरकारने सांगितले. जर RBI ने हे शिलकी रिझर्व्हज सरकारला दिले तर सरकारी कर्ज कमी करण्यासाठी त्याचा उपयोग करता येईल. सरकारी कर्ज कमी झाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे रेटींग सुधारण्यास मदत होईल. जालन कमिटी आपला अहवाल १५ दिवसात सादर करेल.

बँक ऑफ इंडियाने त्यांचा इन्शुअरन्स JV मधील २५.८५ % स्टेक (फ्लोअर प्राईस Rs १७०.५०) विकण्यासाठी बोली मागवल्या आहेत.

टाटा मोटर्स या कंपनीला इ-बस चा पुरवठा करण्यात उशीर झाल्यामुळे काळ्या यादीत टाकले या बातमीचा टाटा मोटर्सने इन्कार केला. बॅटरीज आयात कराव्या लागत असल्याने हा उशीर झाला असे कंपनीने सांगितले. मार्च २०१९ मध्ये ५०%, एप्रिल मध्ये २५% आणि राहिलेलया २५% इ बसची डिलिव्हरी जूलै २०१९ पर्यंत केली जाईल असे कंपनीने सांगितले.

मुथूट फायनान्स या कंपनीने Rs १२ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला. यासाठी रेकॉर्ड डेट १३ एप्रिल २०१९ ठेवली आहे.

बलरामपूर चिनी ही कंपनी RS १७५ प्रति शेअर या भावाने टेंडर ऑफर पद्धतीने आपले ३.६९% शेअर्स बाय बॅक करेल. यासाठी कंपनी Rs १४८ कोटी खर्च करेल. या BUY BACK साठी १८ एप्रिल ही रेकॉर्ड डेट ठेवली आहे.
GSK कंझ्युमर आणि कोलगेट या दोन कंपन्यांकडून सेन्सोडाइन ह्या टूथपेस्ट सरकारच्या FDA ( फूड आणि ड्रॅग ऍडमिस्ट्रेशन) या संस्थेने जप्त केल्या. या कंपन्या सौन्दर्यप्रसाधनांच्या नावाखाली औषधे विकत आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. कारण या कंपन्यांचा असा दावा आहे की या टूथपेस्टमुळे सेन्सिटिव्हिटी आणि दातांमधील कॅव्हिटीजला आराम पडतो. यासाठी जरूर ती लायन्सेस घेण्याची जरुरी आहे. या दोन्ही कंपन्यांनी आपण सर्व कायदेशीर बाजू पूर्ण करूनच ही टूथपेस्ट मार्केट मध्ये आणली असे सांगितले. या बातमीमुळे कोलगेट आणि GSK कन्झ्युमर हे दोन्ही शेअर्स पडले.

इंडिया बुल्स हौसिंग ही NBFC लक्ष्मी विलास बँकेबरोबर मर्जर करणार आहे अशी अफवा आहे. या बातमीमुळे कर्नाटक बँक, फेडरल बँक, जम्मू आणि काश्मीर बँक यासारख्या छोट्या आणि मध्यम आकाराच्या बँकांचे शेअर्स तेजीत होते. NBFC आणि बँकेचे मर्जर झाले तर बँकेकडे असलेल्या लो कॉस्ट डिपॉझिट आणि त्यांच्या शाखांचे लांबवर पसरलेले जाळे यामुळे NBFCच्या ग्राहकसंपर्कांत आणि रिसोर्समोबिलायझेशनमध्ये लक्षणीय सुधारणा होते.

वेध पुढील आठवड्याचा

  • ७ एप्रिल फ्युचर कंझ्युमर्स ही कंपनी आपले वार्षिक निकाल जाहीर करेल.
  • ८ एप्रिल डेल्टा कॉर्प, टायो रोल्स ह्या कंपन्या आपले वार्षिक निकाल जाहीर करतील.
  • ९ एप्रिल रोजी पॉली कॅब या कंपनीचा IPO बंद होईल.
  • १० एप्रिल व्होडाफोनचा राईट्स इशू ओपन होईल.आणि २४ एप्रिल २०१९ रोजी बंद होईल
  • ११ एप्रिल रोजी रेल विकास निगम या कंपनीचे लिस्टिंग होईल. लोकसभेसाठी असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाची पहिली फेरी पार पडेल.
  • १२ एप्रिल रोजी IIP CPI यांचे आकडे येतील. इन्फोसिस आणि टीसीएस, टिन प्लेट्स, टाटा मेटॅलिक्स आपले वार्षिक निकाल जाहीर करतील.

उद्या गुढीपाडवा म्हणजे आपल्या नूतन वर्षांची सुरुवात. आपल्याला गुढी पाडवा आणि आगामी वर्षात सुख,समाधान, संपत्ती, यश, स्वास्थ्य, भरभरून लाभो ही शुभेच्छा आणि ईश्वरचरणी प्रार्थना.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८८६२ NSE निर्देशांक निफ्टी ११६६५ बँक निफ्टी ३००८४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.