आजचं मार्केट – ८ एप्रिल २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch २७-२८एप्रिलला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ८ एप्रिल २०१९

आज क्रूड US $ ७०.५९ प्रती बॅरल ते US $ ७०.७४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.३९ ते US $१=Rs ६९.६७ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.३६ होता. VIX २०.४३ होते.

लिबियामध्ये तणाव वाढला म्हणून क्रूडचे भाव वाढले. रुपया घसरला. VIX ने २० ची पातळी ओलांडली. या सगळ्यामुळे मार्केटमध्ये वोलॅटिलिटी वाढली आणि प्रॉफिट बुकिंग चालू झाले. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बँका आणि NBFC अणे OMC चे शेअर्स पडले.

LVB (लक्ष्मी विलास बँक) आणि IBFL (इंडिया बुल्स हौसिंग फायनान्स) यांचे मर्जर RBI च्या विचाराधीन आहे. अजून या मर्जरला परवानगी दिली नाही. पूर्वीपासूनच रिअल इस्टेट आणि ब्रोकरेज कंपन्यांना बँकिंग लायसेन्स देण्यासाठी RBI फारशी अनुकूल नाही. RBI कडे अर्ज केल्यापासून परवानगी मिळायला सुमारे १महिना लागतो. अजून तरी RBI कडे अशी रीतसर विचारणा केली नाही असे LVB ने सांगितले. RBI चा एक नॉमिनेटेड डायरेक्टर LVB च्या बोर्डवर आहे. याचा अर्थ परवानगी दिली असा होत नाही. नॉमिनेटेड डायरेक्टरला मतदानाचा हक्क नसतो. बँकिंग लायसेन्ससाठी IBFL ने यापूर्वी २०१३ मध्ये प्रयत्न केला होता. पण यश आले नव्हते. LVB सुद्धा QIP करून कॅपिटल ADEQUACY रेशियो सुधारून योग्य पार्टनरच्या शोधात होती . मार्चमध्ये Rs४६० कोटींचा QIP करून कॅपिटल ADEQUACY रेशियो सुधारून PCA खाली येऊ नये म्हणून प्रयत्न केला. डिसेंबर २०१८ तिमाही मध्ये LVB ला Rs ६३० कोटी तोटा होता आणि NPA १४% होते. LVB च्या १०० शेअर्स ऐवजी १४ शेअर्स मर्ज्ड एंटिटीचे मिळतील असा रेशियो आहे. या सगळ्यामुळे IBFL चा शेअर पडला आणि LVB चे वॅल्युएशन Rs १३५ ते Rs १३६ पकडले गेले. त्यामुले LVB चा शेअर वाढला

रुपया सतत कमजोर आणि क्रूडचे वाढते भाव यांचा प्रतिकूल परिणाम OMC वर होत आहे. उदा. HPCL, BPCL, IOC,RIL

NIIT TECH मधील प्रमोटर्सचा ( NIIT LTD पवार फॅमिली, थडानी फॅमिली) ३०.६% स्टेक बेअरिंग PE एशिया प्रती शेअर Rs १३९४ या दराने Rs २६२७ कोटींना खरेदी करणार आहे. तसेच २६% स्टेक साठी बेअरिंग PE आशिया ओपन ऑफर आणणार आहे. हेक्झावेअर आणि NIIT TECH चे मर्जर होण्याची शक्यता आहे. यामुळे NIIT LTD चा शेअर वाढला आणि NIIT TECH चा शेअर कमी झाला .

जेट एअरवेजसाठी कर्ज देणाऱ्या बँकांनी EOI (एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट) मागवले आहे. जेट एअरवेज साठी बिडिंग प्रोसेस ८ एप्रिल पासून सुरु होईल. कर्ज देणार्या बँकांनी RBI चे नवीन परिपत्रक येईपर्यंत इमर्जन्सी फंडिंग म्हणून Rs १५०० कोटींऐवजी Rs २०० कोटी देण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे येणारे १५ दिवस जेट एअरवेजसाठी खूपच महत्वाचे आहेत.

USFDA ने टॉरंट फार्माच्या दहेज युनिटमध्ये ५ त्रुटी दाखवल्या.

टाटा स्टीलची भारतामधील विक्री ५६% ने वाढली.

HDFC बँकेने HDFC कडून Rs १९२४ कोटींची गृह कर्जे खरेदी केली. HDFC मधून गृह फायनान्स बाहेर पडले आहे. आता HDFC चे पुढील लक्ष्य DCB आहे अशी अफवा आहे.

११ एप्रिल २०१९ रोजी मतदानाची पहिली फेरी आहे. या फेरीनंतर एक्झिट पोल यायला सुरु होण्याची शक्यता आहे. या निष्कर्षांप्रमाणे मार्केटमध्ये तेजी किंवा मंदी येण्याची शक्यता आहे

१२ एप्रिल २०१९ पासून वार्षिक निकालांचा शुभारंभ IT क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिस आणि टी सी एस करतील. त्यांच्या गायडन्स आणि निकालातूनही मार्केट भविष्याचा वेध घेण्याची शक्यता आहे.

BSE चा निर्देशांक सेन्सेक्स ३८७०० NSE निर्देशांक निफ्टी ११६०४ वर तर बँक निफ्टी २९८४५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.