आजचं मार्केट – ९ एप्रिल २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch २७-२८एप्रिलला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ९ एप्रिल २०१९

आज क्रूड US $७०.९३ प्रती बॅरल ते US $७१.३२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.२९ ते US $१=Rs ६९.७५ या दरम्यान होते. US $निर्देशांक ९७.०० होता. VIX २०.४३ होता.

इराणवर घालण्यात आलेल्या निर्बंधातून काही देशांना सवलती देण्यात आल्या होत्या. या सवलतीवर विचार करण्यासाठी मे महिन्यात बैठक होईल. ओपेकची मीटिंग जून ऐवजी मेमध्ये होणार आहे. लिबियामध्ये सत्तापालट होत आहे. ओपेक आपल्या उत्पादनात १२ लाख बॅरल प्रती दिन एवढी कपात करेल. US बॉण्ड यिल्ड २.५२ झाले आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे क्रूड US $८० प्रती बॅरल जाईल असा अंदाज आहे.

सन फार्माचा आदित्य मेडीसेल्स बरोबरचा करार तोडल्यामुळे विक्री आणि प्रॉफिटवर परिणाम होईल असे व्यवस्थापनाने सांगितले.

क्रूडचे भाव वाढले तरी मार्च महिन्याच्या मध्यापासून निवडणुकीच्या तोंडावर OMC (ऑइल मार्केटिंग कंपनी) ने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले नाहीत.ग्राहकांकडे क्रुडच्या दरातील वाढ पास ऑन केली नाही. त्यामुळे OMC च्या प्रॉफिट मार्जिनवर विपरीत परिणाम होईल. याचा परिणाम HPCL, BPCL, चेन्नई पेट्रो यांच्यावर होईल. ज्या उद्योगात क्रूड कच्चा माल म्हणून वापरले जाते अशा पेंट्स टायर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर परिणाम होईल. म्हणून एशियन पेंट्स हा शेअर पडला.

क्रूडच्या दरातील वाढीचा फायदा ONGC, HOEC, ऑइल इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज यांना होईल.

डेल्टा कॉर्पचा निकाल चांगला आला.

येस बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक फंड रेजिंगवर विचार करण्यासाठी २६ एप्रिल २०१९ रोजी होईल.

पॅनासिया बायोटेकमध्ये पिरामल, बेन कॅपिटल फंड, असे मोठे फंड Rs ९०० कोटींची गुंतवणूक करणार आहेत.
पॉली कॅबचा IPO ५२ वेळेला ओव्हरसबस्क्राईब झाला.संस्थागत निवेशकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला पॉली कॅबच्या IPO ला मिळणारा रिस्पॉन्स बघता या कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग होईपर्यंत याच क्षेत्रात असलेल्या फिनोलेक्स केबल्स, HPL इलेक्ट्रिक, KEI इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या शेअर्सवर लक्ष ठेवा.

जेटला कर्ज देणार्या बँकांनी आणखी ४ विमानांचे रजिस्ट्रेशन रद्द कारण्यासाठी अर्ज दिला असे DGCA यांनी सांगितले.
मॅक्स फायनान्सियल्सने २३ लाख शेअर्स तर मॅक्स इंडियाने १२ लाख शेअर्स तारण ठेवले.

ऑरोबिंदो फार्माच्या युनिट १६ च्या २२ फेब्रुवारी ते १ मार्च २०१९ या काळात केलेल्या तपासणीत ११ त्रुटी दाखवल्या. कामगारांना ट्रेनिंगचा अभाव, क्वालीटी कंट्रोल डिपार्टमेंटचे नियमांकडे दुर्लक्ष आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रक्रियेत गडबड असे या त्रुटींचे स्वरूप आहे.

टाटा मोटर्सने भारतात रेंज रोव्हर VELAR चे उत्पादन सुरु केले. या कारची किंमत Rs ७२ लाखांच्या पुढे असेल. मे २०१९ पासून या कार्सची भारतात विक्री सुरु होईल.

टेक महिंद्रा ही IT क्षेत्रातील कंपनी इन्फोटेक सॉफ्टवेअर मधील १८% स्टेक आणि VITARAN मधील १८% स्टेक Rs १३ कोटींना खरेदी करेल.

अडानी एंटरप्रायझेसला ऑस्ट्रेलियामध्ये युनिट उभारण्यासाठी पर्यावरणाची मंजुरी मिळाली.

पेपर उद्योगाच्या कच्च्या मालाच्या किमती ३महिन्याच्या किमान स्तरावर असल्यामुळे पेपर शेअर्समध्ये तेजी होती. निवडणुकांमुळे पेपरसाठी मागणी वाढली, कच्च्या मालाच्या किमती कमी झाल्या मार्जिन वाढल्यामुळे पेपर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे निकाल चांगले येतील अशी अपेक्षा आहे.

GSFC चे बडोद्याला असलेले अमोनिया युनिट मेंटेनन्ससाठी बंद ठेवण्यात आले आहे.

सरकारचे वित्तीय घाट्याचे लक्ष्य ३.४% हे पूर्ण झाले.

आजपासून जेट एअरवेजसाठी EOI (एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट) सादर करण्याची मुदत सुरु झाली. कतार एअरवेज, एथिहाद, एअर फ्रान्स, डेल्टा एअरलाईन्स या प्रक्रियेत भाग घेतील अशी अपेक्षा आहे.

लक्ष्मीविलास बँक आणि इंडिया बुल्स हौसिंग फायनान्स यांच्या मर्जरमध्ये अडचणी येतील असा अंदाज व्यक्त झाल्यामुळे लक्ष्मी विलास बँकेच्या शेअरला आज लोअर सर्किट लागले.

इंडिया बुल्स हौसिंग फायनान्स ही कंपनी या मर्जरमध्ये रिअल इस्टेट बिझिनेसशी संबंधित असल्यामुळे अडथळे येणार असतील तर इंडिया बुल्स रिअल स्टेटमधून ही कंपनी प्रमोटर म्हणून बाहेर पडेल असा मार्केटचा होरा आहे. म्हणून इंडिया बुल्स रिअल इस्टेट हा शेअर वाढला

सध्या मार्केट गोंधळलेल्या मनःस्थितीत आहे. मार्केट पडल्यानंतर मागणी येते. पण वरच्या भावाला लोक प्रॉफिट बुक करत आहेत. बहुतेक अशीच स्थिती महिनाभर सुरु राहील असे वाटते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८९३९ NSE निर्देशांक निफ्टी ११६७१ बँक निफ्टी ३०११३ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – ९ एप्रिल २०१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.