आजचं मार्केट – १० एप्रिल २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch २७-२८एप्रिलला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – १० एप्रिल २०१९

आज क्रूड US $७०.६१ प्रती बॅरल ते US $७१.२० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.१३ ते US $१=Rs ६९.१६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.०१ होता. VIX २०.९० होता.

व्हेनिझुएला, लिबिया या देशांमधील राजकीय अस्थिरता, इराणवर USA घातलेले निर्बंध, तसेच इराक मधून होणाऱ्या क्रूडच्या पुरवठ्यात अडथळे येत आहेत. USA मध्ये क्रूडचे उत्पादन आणि साठा वाढला आहे. त्यातच रशियाने कारणाशिवाय वाढणाऱ्या क्रूडच्या किमतीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या मुळे जरी आता क्रूडचा भाव वाढत असला तरी काही दिवसांनी त्यात घट होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

USA मध्ये आता कंपन्यांच्या वार्षिक निकालांचा सिझन चालू झाला आहे. चीन बरोबरच्या ट्रेड वॉरचा परिणाम कंपन्यांच्या निकालात प्रतिबिंबित होईल अशी भीती असल्यामुळे USA ची मार्केट्स मंदीत होती. आता USAचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन युनियन मधून आयात होणाऱ्या मालावर ड्युटी लावू असे जाहीर केल्याने एक वेगळेच टॅरिफ वॉर छेडले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ब्रेक्झिटच्या संदर्भात आज युरोपियन युनियनची मह्त्वाची मीटिंग आहे.

आज फेड आपल्या मार्चमधील मीटिंगची मिनिट्स जाहीर करेल.

आता सुट्ट्यांचा सिझन सुरु होत आहे तसेच देशात चालू असलेल्या वेवेगळ्या खेळातील स्पर्धांमुळे स्पोर्ट टुरिझम जोरात आहे. त्यामुळे हॉटेल कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी येण्याची शक्यता आहे. यात ताज GVK, रॉयल ऑर्चिड्स, कामत हॉटेल्स, इंडियन हॉटेल्स, महिंद्रा लाइफस्पेस, ITDC यांचा समावेश आहे.

राफेल खटल्यात सुप्रीम कोर्टाने तक्रार दाखल करून घेऊन पुन्हा सुनावणीचे निर्देश दिले.

IDBI बँक, रिलायन्स पॉवर, DLF, PC ज्युवेलर्स, WOCKHARDT या कंपन्यांच्या शेअर्समध्ये F &O मार्केटमध्ये नवी पोझिशन घेण्यावर बॅन लावला आहे.

आज मार्केट सुरु होताच HDFC बँक आणि ICICI बँक या दोन शेअर्स मध्ये मोठी डील्स झाली . स्कायमेट या संस्थेने मान्सून लेट चालू होईल उन्हाळा कडक असेल असे भाकीत केले आहे. पाऊसाची सुरुवात अडखळत होईल असे भाकीत केले आहे. कोणतेही सरकार आले तरी ग्रामीण क्षेत्राला चांगलाच फायदा होईल असे दिसते. या पार्श्वभूमीवर कूलर, पंप्स, AC बनवणार्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत असतील.

IMF ने वेगवेगळ्या देशात चालू असलेल्या ट्रेड वॉरमुळे जागतिक अर्थव्यवस्थेच्या ग्रोथचा वेग मंदावेल अशी भीती व्यक्त केली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा ग्रोथ रेट ३.६% ऐवजी ३.३% राहील असा सुधारित अंदाज जाहीर केला
IMF ने भारताच्या अर्थव्यवस्थेच्या ग्रोथचे २०१९-२०२० साठी अनुमान ७.५% वरून ७.३% केले. तर FY २०२१ चे अनुमान ७.५% केले. यामुळे आज मार्केट पडले

आजपासून वोडाफोन आयडिया या कंपनीचा Rs २५००० कोटींचा राईट्स इशू ओपन झाला.

आज युरोपियन कार्गोने ऍमस्टरडॅम मध्ये जेट एअरवेजचे विमान जप्त केले.पैसे भरले नाहीत म्हणून हे विमान जप्त करण्यात आले. आज जेटएअरवेजसाठी EOI सादर करण्याचा शेवटचा दिवस आहे. या कंपनीचे प्रमोटर नरेश गोयल हे एअर फ्रान्स KLM ला बरोबर घेऊन ७५% स्टेकसाठी EOI सादर करण्याची शक्यता आहे. एथिहाद आणि NIIF सुद्धा EOI सादर करू शकतात. TPG कॅपिटलचे नावही या संदर्भात घेतले जात होते पण कर्ज देणाऱ्या बँका किती हेअरकट घ्यायला तयार आहेत याचा अंदाज घेऊन TPG आपले EOI द्यायचे की नाही हे ठरवेल.

PNB ची भिकाजी कामा ही मुंबईत केंद्रस्थानी असलेली बिल्डिंग Rs ६०० कोटींना खरेदी करायला CBDT ला (सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस) सरकारने परवानगी दिली.

इंडिया बुल्स ग्रुपमध्ये सध्या बरीच हालचाल चालू आहे. IBHF( इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स) आणि LVB(लक्ष्मी विलास बँक) यांच्या मर्जरमध्ये इंडिया बुल्स रिअल इस्टेट या कंपनीचा अडथळा (रिअल इस्टेटशी संबंधित असल्यामुळे) येण्याची शक्यता असल्यामुळे IBHF ग्रुप ही कंपनी विकून टाकण्याचा विचार करण्याचा संभव आहे. इंडिया बुल्स रिअल इस्टेट ची आर्थीक परिस्थिती आणि एकंदरच इन्व्हेन्टरी आणि लँड बँक चांगली असल्यामुळे या कंपनीसाठी बोली यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे इंडिया बुल्स रिअल इस्टेटचा शेअर वाढत आहे. IBHF आणि LVB चे मर्जर होऊन जर बँकिंग लायसेन्स मिळाले तर ग्रुपच्या इतर कंपन्या इंडिया बुल्स व्हेंचर्स आणि इंडिया बुल्स सर्व्हिसेस या कंपन्यांना मुबलक आणि स्वस्त कर्ज पुरवठा होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे एकंदरच ग्रुप कंपन्यांचे शेअर्स वाढत आहेत.

प्राज इंडस्ट्रीज या साखर कारखान्यांसाठी मशीनरी बनवणार्या कंपनीने USA च्या ZEBO या कंपनी बरोबर ATF ( एअर टर्बाईन फ्युएल) बनवण्यासाठी करार केला.

फोर्ड आणि महिंद्रा आणि महिंद्रा यांच्या जॉईंट व्हेंचर होणार आहे. महिंद्रा आणि महिंद्रा फोर्डच्या कार्स भारतात विकायला सुरुवात करण्याची शक्यता आहे.

L &T फायनान्सियल होल्डिंग या कंपनीच्या डिबेंचर इशुला चांगला प्रतिसाद मिळाला.

विप्रोच्या शेअर BUY बॅकला सेबी ची परवानगी मिळाली. विप्रो Rs ३२० प्रती शेअर या भावाने शेअर BUY बॅक करेल. विप्रो आपले वार्षिक निकाल १६ एप्रिल रोजी जाहीर करेल.

सौदी कंपनी आरामकोच्या बॉण्ड इशुलाही जबरदस्त प्रतिसाद मिळाला.

श्रीराम पॉवर ट्रान्सपोर्ट आणि श्रीराम सिटी युनियन या कंपन्यांचे मर्जर होण्याची शक्यता आहे.

बंधन बँकेने आपल्या MCLR मध्ये ०.२३% ची कपात केली.

बजाज कंझ्युमर्सच्या प्रमोटर्सनी २.४१% स्टेक तारण म्हणून ठेवला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८५८५ NSE निर्देशांक निफ्टी ११५८४ बँक निफ्टी २९८०३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – १० एप्रिल २०१९

  1. शरद लिंगावार

    शेअर मार्केट बद्दल सुंदर विश्लेषण मिळत आहे तुमच्याकडून त्याबद्दल धन्यवाद अशीच माहिती समोर समोर मिळत राहो

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.