आजचं मार्केट – ११ एप्रिल २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch २७-२८एप्रिलला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ११ एप्रिल २०१९

आज क्रूड US $७०.८७ प्रती बॅरल ते US $७१.४८ प्रती बॅरल या दरम्यान तर रूपया US $१=Rs ६८.९२ ते US $१= Rs ६९.१५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.९१ तर VIX २१.३९ होते. आता अलनिनोची विवंचना थोडी कमी झाली आहे त्यामुळे आता पाऊस चांगला पडेल असा अंदाज IMD ने वर्तवला आहे.

वेदांताच्या झाम्बिया मधील कोनकोला कॉपर माईन्स या सबसिडीअरीच्या मालकीच्या NCHANGA येथील खाणीविरुद्ध गावकऱ्याना प्रदूषणाबाबत खटला दाखल करण्यासाठी UK च्या सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली. या बातमीमुळे वेदांताचा शेअर पडला.

श्रीराम कॅपिटल आणि श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स या दोन कंपन्यांचे मर्जर होणार आहे. या मर्जरनंतर मर्ज्ड एंटीटी भारतातील सर्वात मोठी हौसिंग फायनान्स रिटेल NBFC बनेल.

सन फार्माच्या दादरा युनिटच्या २२ मार्च ते २९ मार्च २०१९ या दरम्यान केलेल्या तपासणीत USFDA ने ११ त्रुटी दाखवल्या. या त्रुटी प्रामुख्याने क्वालिटी कंट्रोल विषयी आहेत.

रेल विकास निगम या कंपनीच्या शेअर्सचे Rs १९ वर लिस्टिंग झाले

कॉक्स आणि किंग फायनांशियल्स या कंपनीचे Rs ७६ वर लिस्टिंग झाले.

भारती एअरटेलच्या Rs २२० प्रती शेअर्स च्या एकूण Rs २५००० कोटींच्या राईट्स इशूची २४ एप्रिल ही रेकॉर्ड डेट असेल. या राईट्स इशूमध्ये प्रमोटर्सही भाग घेऊ शकतील.

भारती एअरटेल आणि टाटा टेली(महाराष्ट्र) या कंपन्यांच्या मर्जरला DOT ने परवानगी दिली. भारती एअरटेल या कंपनीला स्पेक्ट्रम फी साठी Rs ७५०० कोटींची गॅरंटी द्यावी लागेल.

TCS ला UK च्या AGEAS या कंपनीकडून डिजिटल आणि कोअर सर्व्हिसेससाठी ऑर्डर मिळाली.

मारुतीने आपल्या ALTO K १० या गाडीमध्ये अतिरिक्त सेफ्टी फिचर बसवला आहे. त्यामुळे मारुती या कारची किंमत वाढवेल.

माईंड ट्रीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची १७ एप्रिल २०१९ रोजी फायनल लाभांश आणि स्पेशल लाभांशावर बैठक बोलावली आहे.

स्पाईस जेट ही कंपनी जेट एअरवेजची डिरजिस्टर्ड झालेली विमाने विकत घेऊ शकते. तसेच जेट एअरवेजची ग्राउंड झालेली विमाने लीजवर घेऊ शकते. यासाठी स्पाईसजेटची जेट एअरवेजला कर्ज देणाऱ्या बँकांबरोबर बोली चालू आहेत.

नितीन चुघ हे उज्जीवन फायनान्सियल या कंपनीचे CEO म्हणून चार्ज घेतील.

१२ एप्रिल २०१९ रोजी टी सी एस आणि इन्फोसिस या कंपन्यांचे निकाल आहेत. IIP आणि CPI यांचे आकडेही उद्या येणार आहेत. यामुळे मार्केटने थोडा सावधगिरीचा पवित्रा घेतला.

TCS या कंपनी विरुद्ध डिस्क्रिमिनेशनसाठी केलेली SUIT कंपनी कोर्टाबाहेर सेटल करणार आहे.त्यासाठी त्यांना पुष्कळ खर्च येईल. म्हणून टी सी एस चा शेअर पडतो आहे. पण ट्रेडर्सना वाटते आहे की वार्षिक निकाल वाईट येण्याच्या शक्यतेमुळे पडतो आहे. जरी मार्केट थोडेसे तेजीत बंद झाले असले तरी डोजी कँडल तयार झाली. यामुळे अजूनही अनिश्चितता दिसेल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८६०७ NSE निर्देशांक निफ्टी ११५९६ बँक निफ्टी २९७८६ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.