आजचं मार्केट – १२ एप्रिल २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch २७-२८एप्रिलला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – १२ एप्रिल २०१९

आज क्रूड US $ ७१.१० प्रती बॅरल ते US $ ७१.४२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.०४ ते US $ १=Rs ६९.३७ आ दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.०२ तर VIX २१.३० होता.

आज जेट एअरवेजसाठी EOI सादर करण्याची सुधारित शेवटची डेट आहे या EOI मध्ये एथिहाद भाग घेईल अशी आशा निर्माण झाली आहे. ग्लोबल पार्टनरला स्थानिक पार्टनर लागेल कारण ग्लोबल पार्टनर ४९% पेक्षा जास्त शेअर्स घेऊ शकत नाही. नरेश गोयलही आपले EOI सादर करण्याची शक्यता आहे. जेट एअरवेजचे तारण ठेवलेले ५.१९% शेअर्स SBI कॅपिटलने घेतले. जेट एअरवेज च्या स्टाफ असोसिएशनने जेट एअरवेज विरुद्ध गेले काही महिने पगार देत नसल्यामुळे FIR दाखल करण्याची नोटीस दिली.

फूड & इन् या कंपनीत राधाकृष्ण दमाणींच्या कंपनीने ७ लाख शेअर्स Rs १८४ प्रती शेअर या भावाने खरेदी केले. कोणत्या म्युच्युअल फंडाने किंवा कोण्यत्या कंपनीने एखाद्या कंपनीत गुंतवणूक केली हे पाहून किरकोळ गुंतवणूकदाराला एक दिशा मिळते.

अदानी ट्रान्समिशन ने २.८% तारण म्हणून ठेवलेले शेअर्स सोडवले.

मेघमणी ऑर्गनिक्स या कंपनीने ICICI बँकेकडे असलेली Rs १०९.० कोटींची बाकीची परतफेड केली.

इनॉक्स लिजरने लखनौमध्ये ४ स्क्रीनचे मल्टिप्लेक्स सुरु केले.

मार्च २०१९ मध्ये CPI २.८६% (फेब्रुवारी २०१९ मध्ये २.९९%) होता.

फेब्रुवारी २०१९ मध्ये IIP ०.०१% ( जानेवारी २०१९ मध्ये २.३५%) होता

आज TCS या IT क्षेत्रातील कंपनीचे वार्षिक निकाल जाहीर झाले. वर्ष २०१८-२०१९ नेट प्रॉफिट २१.९% वाढून Rs ३१४७२ कोटी झाले. उत्पन्न १९% वाढून Rs १४६४६३ कोटी झाले. चौथ्या तिमाहीत उत्पन्न Rs ३८०१० कोटी झाले. US $ उत्पन्न US $ ५३९७ मिलियन . झाले. EBIT Rs ९५३७ कोटी,EBIT मार्जिन २५.१% होती. चौथ्या तिमाहीत UK विक्री २१.३% तर युरोप विक्री १७.५% झाली. प्रॉफिट Rs ८१२६ कोटी झाले, इतर उत्पन्न ११९३ कोटी झाले. उत्पन्नात २.८% वाढ झाली. प्रॉफिटमध्ये १७.७०% वाढ झाली. ऑर्डर बुक वाढले आणि डील पाईपलाईन चांगली आहे. कंपनीने Rs १८ प्रती शेअर अंतिम लाभांश जाहीर केला. BFSI मध्ये ११.६% आणि डिजिटल ३१% वाढ झाली.

इन्फोसिस ने आपले वार्षिक निकाल जाहीर केले. चौथ्या तिमाहीत उत्पन्न Rs २१५३९ कोटी झाले. US $ उत्पन्न US $ ३०६० मिलियन झाले. प्रॉफिट Rs ४०७८ कोटी झाले.(१०.५१%वाढ) QUARTER ON QUARTER बॉटम लाईन १२.६%ने वाढली.कंपनीने वित्तीय वर्ष २०१९-२०२० या वर्षांसाठी गायडन्स कमी केला. कंपनीने Rs १०.५० प्रती शेअर अंतिम लाभांश जाहीर केला. हा लाभांश २२ जूनला होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत शेअर होल्डर्सनी मंजूर केल्यावर दिला जाईल.

वेध उद्याचा

पुढील आठवड्यात खालीलप्रमाणे कॉर्पोरेट निकाल जाहीर होतील.

  • १५ एप्रिल टी व्ही १८, टाटा मेटलीक्स,
  • १६ एप्रिल रोजी मास्टेक, विप्रो,
  • १७ एप्रिल क्रिसिल, माईंड ट्री,
  • १८ एप्रिल DCB, ICICI लोम्बार्ड, जय भारत मारुती, RBL बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा स्पॉन्ज
  • १९ एप्रिल टाटा कॉफी,
  • २० एप्रिल HDFC बँक

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८७६७ NSE निर्देशांक ११६४३ बँक निफ्टी २९९३८ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

3 thoughts on “आजचं मार्केट – १२ एप्रिल २०१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.