आजचं मार्केट – १५ एप्रिल २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch २७-२८एप्रिलला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – १५ एप्रिल २०१९

आज क्रूड US $७१.१६ प्रती बॅरल ते US $७१.२८ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.०७ ते US $१=Rs ६९.३६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.८७ होता. VIX २२.२४ होते.

गेल्या तीन चार दिवसात VIX वाढत आहे सामान्यतः निवडणुका, राजकीय अस्थिरता, अंदाजपत्रकाचे सादरीकरण आणि मार्केटमध्ये अधून मधून होणारी करेक्शन्स यामुळे VIX वाढतो. मार्केट अक्षरशः हेलकावे खात असलेल्या जहाजासारखे खालीवर होते. पण आतापर्यंत निफ्टी आणि VIX यांच्यात परस्परसंबंध आढळून न आल्यामुळे VIX मधील बदलामुळे मार्केटवर होणाऱ्या परिणामाची दिशा किंवा वेग सांगता येत नाही.

अलनिनो चा धोका आता बर्याच अंशी सौम्य झाल्यामुळे या वर्षी मान्सून सामान्य राहील. एवढेच नव्हे तर पावसाचे प्रमाण सर्व भारतभर चांगले राहील. ज्या पिकांना सातत्त्याने पाण्याचा पुरवठा आवश्यक आहे त्यासाठी हा पावसाळा चांगला नसेल कारण पाऊस मध्ये मध्ये विश्रांती घेऊन येईल. त्यामुळे तांदुळाची टंचाई निर्माण होईल, आणि तांदळाला चांगला भाव मिळेल आणि तांदूळ निर्यात करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

WPI (होलसेल प्राईस इंडेक्स) मार्च २०१९ महिन्यात ३.१८% ( फेब्रुवारी २०१९ मध्ये २.९३% होती.) हा निर्देशांक घाऊक मार्केटमधील महागाईचा स्तर दाखवतो.

मेट्रोपोलीस हेल्थकेअरचा शेअर IPO मध्ये Rs ८८० ला दिला होता. आज या शेअरचे लिस्टिंग Rs ९६० वर झाले. त्यामुळे ज्यांना शेअर्स अलॉट झाले त्यांना लिस्टिंग गेन्स झाले.

२०१५ मध्ये जाहीर केलेली न्यू युरिया पॉलिसीची मुदत वाढवली तसेच विस्तार करण्यास मंजुरी दिली. यामुळे चंबळ फर्टिलायझर्स, GSFC, RCF, FACT, मद्रास फर्टिलायझर्स, NFL, GNFC दीपक नायट्रेट्स आणि इतर खत उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर वधारले.

WOCKHARDT च्या औरंगाबाद युनिटला USFDA ने क्लीन चिट दिली.

नवीन TARIF ऑर्डरमुळे आणि यावेळी वोट ऑन अकौंट असल्यामुळे मेडिया सेक्टरच्या निकालावर परिणाम होईल. असे टी व्ही 18 ब्रॉडकास्ट च्या आलेल्या निकालांमुळे वाटले.

JLR ( टाटा मोटर्स) ५००० कर्मचाऱयांची कपात करणार आहे.

१ जून २०१९ पासून इंटरएक्स्चेंज सेटलमेंटसाठी मंजुरी मिळाली.

भारती एअरटेल ने राईट्स इशू Rs २२० प्रती शेअर या भावाने आणला. तुमच्याजवळ ६७ शेअर्स असतील तर तुम्हाला राईट्स इशूमध्ये १९ शेअर्स ऑफर केले जातील. या राईट्स आशूची record date २४ एप्रिल २०१९ आहे.

इन्फोसिस आणि टी सी एस या IT क्षेत्रातील कंपन्यांनी १२/०४/२०१९ रोजी आपले तिमाही निकाल जाहीर केले. पण इन्फोसिसने वर्ष २०२० साठी गायडन्स कमी केला त्यामुळे मार्केटची निराशा झाली. तसेच इन्फोसिसमध्ये H१B व्हिसा मिळवण्यात येणाऱ्या अडचणींमुळे अट्रिशन (कर्मचारी कंपनी सोडून जाण्याचा) रेट वाढलाअसे सांगितले. पण इन्फोसिसचा शेअर जास्त पडणार नाही कारण इन्फोसिसचा शेअर BUY BACK चालू आहे. याउलट टी सी एसचा बेस मोठा असून देखील मार्जिन राखले, मार्केटच्या अपेक्षा पूर्ण केल्या. त्यामुळे टी सी एस चे रेटिंग कायम ठेवून ब्रोकरेज फर्म्सनी त्यांचे टार्गेट वाढवले त्यामुळे टी सी एस चा शेअर इंट्राडे सुमारे Rs १००ने वाढला.

वेध उद्याचा

हा दोन सुट्ट्या असलेला आठवडा आहे. निफ्टी ऑप्शन, बँक निफ्टी ऑप्शन. IT निफ्टी ऑप्शन यांची साप्ताहिक एक्स्पायरी गुरुवारी होईल. त्यामुळे उद्याच्या दिवसभर या निर्देशांकात समाविष्ट असलेल्या शेअर्समध्ये चढ उतार असू शकतो.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८९०५ NSE निर्देशांक निफ्टी ११६९० बँक निफ्टी ३०१०४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – १५ एप्रिल २०१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.