आजचं मार्केट – १६ एप्रिल २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch २७-२८एप्रिलला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – १६ एप्रिल २०१९

आज क्रूड US $७०.८८ प्रती बॅरल ते US $ ७१.०८ प्रती बॅरल या दरंयान तर रुपया US $ १=Rs ६९.४७ ते US $ १= Rs ६९.६६ या दम्यान होते. US $निर्देशांक ९६.८८ ते ९७.०६ च्या दरम्यान होते.

आज मार्केटने सेन्सेक्स आणि निफ्टीची कमाल पातळी गाठली. ११५५० ते ११७६० ही निफ्टीची ट्रेडिंग रेंज निफ्टीने १२ ट्रेडिंग सेशननंतर ओलांडली. येणारा पैसा, मान्सूनची कमी झालेली काळजी, चांगला ट्रेड डेटा, अपेक्षेप्रमाणे चांगले येऊ लागलेले कॉर्पोरेट निकाल आणि स्थिर सरकार येण्याची शक्यता ही कारणे यामागे आहेत. त्याच बरोबर टेक्निकल चार्ट प्रमाणे निफ्टीने गोल्डन क्रॉस फॉर्म केला. म्हणजेच ५० DMA (दिवसांच्या मूव्हिंग ऍव्हरेजच्या) पातळीने २०० DMA ला वरच्या दिशेने क्रॉस केले आणि ट्रेडिंग व्हॉल्युम सुद्धा जास्त होते. निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी २५ शेअर्समध्ये असे गोल्डन क्रॉस फॉर्मेशन झाले आहे. त्यामुळे लोकांनी २०१९ मध्ये निफ्टी १२८०० ते १३००० पर्यंत जाईल अशी आशा बाळगली आहे.
USA मध्ये गोल्डमन सॅक्स आणि सिटीचे निकाल मार्केटला फारसे आवडले नाहीत.

DR रेडीजच्या हैदराबाद युनिटला USFDA ने ११ त्रुटी दाखवल्या होत्या. पण पुनर्तपासणीमध्ये VA (VOLUNTARY ACTION NEEDED) दिले.

हल्ली राधाकृष्ण दमानींच्या ब्राईट स्टार या फंडांनी कोठे गुंतवणूक केली याकडे ट्रेडर्सचे लक्ष असते. या फंडांनी काल मेट्रोपोलीस हेल्थकेअरचे ७ लाख शेअर्स खरेदी केले. या आधी त्यांच्या फंडांनी ‘फूड आणि इन्’ या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती.

CYIENT या कंपनीने 5G साठी बरेच प्रॉडक्टस तयार केले आहेत.

मे २०१९ मध्ये MSCI रीबॅलन्स होण्याची शक्यता आहे. यामध्ये HDFC लाईफ आणि ICICI लोंबार्ड चा या निर्देशांकात समावेश होण्याची शक्यता आहे.

दीपक फर्टिलायझरने दाहेजमध्ये Rs ५५० कोटी गुंतवणूक करून प्लांट लावला होता या प्लांटमध्ये कमर्शियल प्रॉडक्शन चालू झाले. या शेअरमध्ये लक्षणीय वाढ झाली.

आज पॉली कॅब या वायर आणि केबल्स बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्सचे Rs ६३३( IPO प्राईस Rs ५३८) वर लिस्टिंग झाले. आता वाढत्या मार्केटमध्ये लिस्टिंग गेन्स चांगले होऊ लागले आहेत.

गॉडफ्रे फिलिप्स लहान आकारात सिगारेट्स बाजारात आणणार आहे. या सिगारेट्सचे टेस्टिंग झाले आहे.

स्पाईस जेट ही कंपनी ५ Q 400 विमाने US $ १७० कोटींना खरेदी करणार आहे. ही विमाने कंपनी डोमेस्टिक कनेक्टिव्हिटीसाठी वापरेल.

नेस्ले या कंपनीची २५ एप्रिल रोजी वार्षिक सर्वसाधारण मीटिंग आहे. या दिवशी कंपनीचे वार्षिक निकाल जाहीर होतील. या मीटिंग मध्ये कंपनी देत असलेल्या रॉयल्टीवर विचारविमर्श होईल.

कॉर्लिना आणि INDRIA यांनी PC ज्युवेलर्स मध्ये २.६९% स्टेक खरेदी केला.

जेट एअरवेजसाठी गोयलनी दिलेली बोली मागे घेतली. स्टेट बँकेने आपली बँक जेटच्या रेझोल्यूशन वर विचार करत आहे असे सांगितले. जेट एअरवेजची ऑपरेशन्स तात्पुरती स्थगित ठेवण्यात येतील.

मास्टेक या IT क्षेत्रातील कंपनीचा वार्षिक निकाल ठीक लागला. कंपनीने Rs ५ प्रती शेअर्स लाभांश जाहीर केला.
DCB चे निकाल खराब येतील असे बोलले जाते. गेल्या ४ तिमाहीमध्ये निकाल चांगले येत होते. त्यामुळे बेस मोठा झाला. कॉस्ट ऑफ फंडिंग वाढली आहे. IL&FS ला एक्स्पोजर आहे अशी वार्ता आहे. कॅनफिना होम्स आणि LIC हौसिंग चे शेअर पडले. बँक आणि NBFC च्या मर्जरची हवा असल्याने भावी मर्जरच्या आधी गुंतवणूकदार बाहेर पडत आहेत असे वाटते.
विप्रोचे प्रॉफिट YOY ३८% ने वाढले. Rs २४८३ कोटी झाले. विप्रो आपल्या पेड अप शेअर कॅपिटलच्या ५.३५% शेअर्स म्हणजे ३२.३ कोटी शेअर्स Rs ३२५ प्रती शेअर या भावाने BUY बॅक करेल. कंपनीने नोव्हेंबर २०१७ मध्ये Rs ३२० प्रती शेअर या भावाने ११००० कोटी शेअर्सचा BUY बॅक केला होता. विप्रोच्या काही कर्मचाऱ्यांच्या खात्यात गडबड दिसली. नेटवर्कमध्ये असामान्य गतिविधी दिसली. या सर्व गोष्टीचा विप्रो तपास करत आहे.

मार्च २०१९ महिन्यात भारताची निर्यात ११% वाढून US $ ३२.५५ बिलियन झाली. यात प्रामुख्याने फार्मा, केमिकल्स आणि इंजिनीअरिंग क्षेत्रांचा सहभाग आहे. भारताची आयात १.४४%ने कमी होऊन US $ ४३.४४ बिलियन झाली. ट्रेड गॅप US $ १०.८९ बिलियन राहिली.

आज DLF F &O च्या बॅन मधून बाहेर आला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९२७५ NSE निर्देशांक निफ्टी ११७८७ बँक निफ्टी ३०५३१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

5 thoughts on “आजचं मार्केट – १६ एप्रिल २०१९

 1. Devendra Bagul

  कृपया, Wipro च्या buyback ऑफर विषयी सविस्तर माहिती सांगा, म्हणजे acceptance ratio किती असेल वा कितपत फायदेशीर असेल.

  देवेंद्र

  Reply
  1. surendraphatak

   अजून acceptance ratio किंवा record date जाहीर झाली नाही तुम्ही 2 लाखाच्या आत असाल तर तुम्ही retail इन्व्हेस्टर ठराल

   Reply
 2. भास्कर

  मडम, म्युचवल फंड कोणामार्फत घ्यायचे.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.