आजचं मार्केट – १८ एप्रिल २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch २७-२८एप्रिलला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – १८ एप्रिल २०१९

आज क्रूड US $ ७०.८५ प्रती बॅरल ते US $ ७१.६३ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.३४ ते US $१=Rs ६९.७४ या दरम्यान होते. US $निर्देशांक ९७.०१ होता. VIX २२.९६ होता. PCR १.८२ होता.

चीनचे GDP चे आकडे चांगले आले. सगळ्या बाबतीत सुधारणा दिसते आहे. आता ट्रम्पनी मोर्चा जपानकडे वळवला आहे. दरम्यान युरोपियन युनियन आणि USA यांच्यात टॅरिफ विषयी तणातणी चालूच आहे. पण आता मंदीची भीती कमी झाली आहे.

ऑस्ट्रेलियन मेट डिपार्टमेंटने EL NINO कमजोर होत आहे आणि अगदी अल्प काळ टिकेल असे सांगितले.

आज सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात ९५ लोकसभा मतदारसंघातून मतदान पार पडले.

नैसर्गिक वायूचे दर आज ३०% ने कमी झाले. १ वर्षाच्या किमान स्तरावर होते.

माइंड ट्री या कंपनीने Rs ३ प्रती शेअर अंतरिम लाभांश, Rs ४ अंतिम लाभांश आणि Rs २० स्पेशल लाभांश प्रती शेअर जाहीर केला. कंपनीचे वार्षिक आणि चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. कंपनी US $१बिलियन कंपनी झाली तसेच कंपनीला २० वर्षे पुरी झाली म्हणून हा विशेष लाभांश दिला असे कंपनीने सांगितले.अंतरिम लाभांशासाठी २७ एप्रिल ही रेकॉर्ड डेट आहे. अंतिम लाभांश आणि स्पेशल लाभांश वार्षिक सर्वसाधारण सभेत म्हणजे (जुलै २०१९ मध्ये) शेअर होल्डर्सची मंजुरी मिळाल्यानंतर दिला जाईल.

सौदी आरामको ही ऑइल क्षेत्रातील जगातील दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज च्या पेटकेममध्ये २५% स्टेक घेणार आहे.. US $१० ते १५ बिलियन एवढे व्हॅल्युएशन धरत आहेत. हा स्टेक Rs १६२५ प्रती शेअर या भावाने खरेदी केला जाईल. रिलायन्स रिटेल ही कंपनी हैमलीज ही कंपनी खरेदी करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने इथेन व्यवसायातला काही भाग मित्सुई OSK ला विकला.

जेट एअरवेज या कंपनीला इमर्जन्सी फंडिंग न मिळाल्यामुळे कंपनीने आपली ऑपरेशन्स काही काळाकरता स्थगित ठेवली आहेत.

इंडिगो या प्रवासी विमान वाहतूक क्षेत्रातील कंपनीचे स्पेशल ऑडिट होणार आहे. सरकारने विमान प्रवासासाठी सतत वाढत जाणार्या तिकिटांच्या दराबद्दल चिंता व्यक्त केली.

स्टार सिमेंट या कंपनीला सरकारकडून Rs १७४ कोटी सबसिडी मिळाली.

PCR (पुट/कॉल रेशियो) १.८२ झाला आहे. याचा कमाल स्तर १.८८ आहे.

ऍक्सिस बँक मॅक्स लाईफमध्ये स्टेक घेण्याची शक्यता आहे. यामुळे मॅक्स फायनान्सियलच्या शेअरकडे लक्ष ठेवले पाहिजे.
सास्केन कम्युनिकेशन ह्या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची शेअर BUY बॅक वर विचार करण्यासाठी २३ एप्रिल रोजी बैठक आहे.

QUESS कॉर्प ही कंपनी ऑल सॅक कम्युनिकेशनमध्ये मेजॉरिटी स्टेक खरेदी करणार आहे ओपन ऑफर Rs ३२० प्रती शेअर या भावाने येण्याची शक्यता आहे.

RBL बँकेने आज आपले चौथ्या तिमाहीचे आणि वार्षिक निकाल जाहीर केले. NPA मध्ये बदल झाले नाहीत. फायदा Rs १८० कोटींवरून Rs २४७ कोटी झाला.RBL बँकेने Rs २.७० प्रती शेअर अंतिम लाभांश दिला.

DCB या बॅंकेने आपले वार्षिक निकाल जाहीर केले. NII ( नेट इंटरेस्ट इन्कम) Rs ३०० कोटी झाले. फायदा Rs ६४ कोटींवरून Rs ९६ कोटी झाला. NPA १.९२ वरून १.८४ झाले.

आज ICICI लोंबार्ड या कंपनीचे निकाल ठीक आले. कंपनीने Rs ३.५० प्रती शेअर अंतिम लाभांश जाहीर केला.

आज रिलायन्स इंडस्ट्रीजने आपले चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले.

कंपनीला उत्पन्न Rs १.३८ लाख कोटी झाले. फायदा Rs १०३६२ कोटी झाला. EBITDA Rs २०८३२ कोटी झाले. EBITDA मार्जिन १५.०२% आहे. कंपनीला अन्य उत्पन्न Rs ३१५० कोटी झाले. कंपनीच्या बॅलन्सशीटमध्ये १.३३ लाख कोटी रोख कॅश आहे. कंपनीने Rs ६.५ प्रती शेअर अंतिम लाभांश जाहीर केला.

रिलायन्स जिओला वार्षिक नफा Rs २९६४ कोटी झाला. रिलायन्स जिओचे सबस्क्रायबर्स ३१ कोटींच्या आसपास पोहोचले. ARPU (ऍव्हरेज रेव्हेन्यू पर यूजर) Rs १२६.२ होता.

पेटकेम उत्पन्न Rs ४२४१४ कोटी तर EBITDA Rs ७९७५ कोटी झाले. GRM US $ ८.२ BBL राहिले. एकंदरीत पाहता रिलायन्स इंडस्ट्रीजने सर्वांगीण प्रगती केली असे म्हणावे लागेल

आज राणे ग्रुपचे राणे मद्रास, राणे ब्रेक्स,राणे होल्डिंग हे शेअर वर होते

नजीकच्या भविष्यातील IPO

NEOGEN CHEMICALS या कंपनीचा Rs १३२.३५ कोटींचा IPO २४ एप्रिल २०१९ रोजी ओपन होईल आणि २६ एप्रिल रोजी बंद होईल. प्राईस बँड Rs २१२ ते २१५ प्रती शेअर आहे. मिनिमम लॉट ६५ शेअर्सचा आहे. शेअरची दर्शनी किंमत Rs १० आहे. ही कंपनी BROMINE आणि लिथियम बेस्ड स्पेशालिटी केमिकल्स बनवते.या कंपनीच्या शेअर्सचे ८ मे २०१९ रोजी लिस्टिंग होईल. हा इशू ओपन असताना आरती इंडस्ट्रीज, अतुल इंडस्ट्रीज, नवीन फ्ल्युओरीन, विनती ओर्गानिक्स, पौषक केमिकल्स या कंपन्यांच्या शेअर्सकडे लक्ष ठेवावे.

वेध पुढील आठवड्याचा

पुढील आठवड्यात खालील महत्वाचे निकाल जाहीर होतील.

  • २० एप्रिल २०१९ HDFC बँक
  • २२ एप्रिल २०१९ AU स्माल फायनान्स बँक, गोवा कार्बन, लक्स इंडस्ट्रीज
  • २३ एप्रिल २०१९ टाटा ग्लोबल बिव्हरेजीस,
  • २४ एप्रिल २०१९ हेक्सावेअर, IBULSHSG फायनान्स, ICICI PRU
  • २५ एप्रिल २०१९ ऍक्सिस बँक, बायोकॉन, मारुती, नेस्ले, SBI लाईफ
  • २६ एप्रिल २०१९ HDFC AMC, हिरोमोटो कॉर्प, येस बँक

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९१४० NSE निर्देशांक निफ्टी ११७५२ बँक निफ्टी ३०२२३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.