आजचं मार्केट – २२ एप्रिल २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch २७-२८एप्रिलला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – २२ एप्रिल २०१९

आज क्रूड US $७३.६२ प्रती बॅरल ते US $७४.११ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.५५ ते US $१=Rs ६९.६७ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.३७ होता. VIX २४ ते २४.१७ एवढा होता.

आज मार्केटने चांगलाच अपेक्षाभंग केला. रिलायन्स आणि HDFC बँक यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले होते.यामुळे मार्केट तेजीत राहील असे वाटले होते. पण असे घडले नाही. USA चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ३ मे २०१९ पासून इराणकडून क्रूड आयात करण्यासाठी काही देशांना दिलेली सवलत रद्द करून इराणमधून क्रूडच्या निर्यातीवर पूर्णपणे निर्बंध घालणार असल्याची वार्ता होती. भारत आणि चीन हे इराणकडून मोठ्या प्रमाणावर क्रूड आयात करतात. आधीच ओपेकच्या उत्पादनातील कपातीमुळे, आणि लिबिया आणि व्हेनिझुएला या देशातील राजकीय अस्थैर्यामुळे क्रूडचे उत्पादन सतत कमी होत आहे. भारतातील क्रूडसाठी असलेली मागणी वाढत आहे. या सर्व कारणांमुळे आज क्रूड US $७४ प्रती बॅरलच्या पुढे पोहोचले. क्रूडची किंमत नजीकच्या भविष्यात वाढत राहील असा अंदाज सर्वच व्यक्त करत आहेत.

क्रूड वाढू लागल्यामुळे रुपया ढासळतो आणि CAD वर प्रतिकूल परिणाम होतो. मार्केट्मध्ये मंदीला आमंत्रण मिळते. आज अगदी तसेच झाले. जवळ जवळ ५०० पाईंट मार्केट पडले. त्यातच हा एप्रिलचा शेवटचा आठवडा असल्यामुळे एक्स्पायरीचा गोंधळही आहेच. VIX आज २४.१७ ह्या स्तरावर होते श्री लंकेतल्या सिरीयल बॉम्बस्फोटात सुमारे २२५ मृत आणि ६०० च्यावर माणसे जखमी झाली ह्या दुःखद बातमीने भर घातली.या बातमीमुळे बजाज ऑटोचा शेअर पडला.

जेट एअरवेजचा हाय व्होल्टेज ड्रामा आज खूपच रंगला. सरकारने जाहीर केले की एअर इंडिया, स्पाईस जेट आणि इतर कंपन्या जर जेटची विमाने त्यांच्या स्टाफ सकट रेन्टवर घ्यायला तयार असतील तर सरकारची ना नाही. जेट एअरवेजनी जर १० दिवसात कर्ज फेडले नाही तर NCLT मध्ये कॉर्पोरेट इंसॉल्व्हन्सी रेझोल्यूशन प्रोसेस चालू केली जाईल. त्यामुळे आज प्रथम जेट NCLT मध्ये जाईल या भीतीपोटी शेअर पडला. नंतर अफवांना उधाण आले. रिलायन्स जेट घेणार आहे पण अजून त्यांनी EOI दाखल केले नाही. टाटा ग्रूपचे ही लक्ष आहे. यामुळे शेअर वाढला. आजचा लो Rs १३२ तर आजचा हाय Rs १६१ होता.

NGT ( नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल) ने ऑर्डर दिल्यामुळे सिरॅमिक कंपन्या बंद झाल्या. अनऑर्गनाईझ्ड सेक्टरकडून स्पर्धाही कमी झाली. म्हणूनच कजारिया. सेरा, आणि सोमाणी यांना चांगले दिवस येतील. श्रीराम ट्रान्सपोर्ट आणि श्रीराम सिटी युनियन यांचे मर्जर झाल्यास व्हॅल्यू अनलॉक होईल.

सिंजीनची २४ एप्रिल रोजी बोनस शेअर इशू करण्यावर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे.
KPR मिलच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने BUY बॅक ऑफ शेअर्स वर विचार करण्यासाठी २९ एप्रिल रोजी बैठक बोलावली आहे.

आज KPIT TECH Rs ९९ वर लिस्ट झाला.

ECLERK ही कंपनी Rs १६०० प्रती शेअर या भावाने शेअर BUY बॅक टेंडर ऑफर रुटने करणार आहे. अजून रेकॉर्ड डेट ठरवली नाही.

प्रभात डेअरीने जो व्यवसाय विकला त्यामुळे चांगला लाभांश जाहीर करण्याची शक्यता आहे.

सुप्रीम कोर्टाने आज रिलायन्स इन्फ्राने दिल्ली एअरपोर्ट मेट्रोसाठी घेतलेले कर्ज NPA नाही असा निकाल दिला.

हाज यात्रेकरूंसाठी VACCIN बनवण्याचे काम GSK कन्झ्युमर आणि सॅनोफी यांना मिळण्याची शक्यता आहे.

HDFC बँक, मॅजेस्टिक ऑटो यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

महिंद्र लाईफ स्टाईल ( Rs. ६ अंतरिम लाभांश) यांचे निकाल साधारण तर गोवा कार्बन या कंपनीचे निकाल खराब आले उत्पन्न EBITD यांच्यात घट तर कंपनीला लॉस झाला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८६४५ NSE निर्देशांक निफ्टी ११५९४ बँक निफ्टी २९६८७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.