आजचं मार्केट – २३ एप्रिल २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch २७-२८एप्रिलला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – २३ एप्रिल २०१९

आज क्रूड US $ ७४.३५ प्रती बॅरल ते US $ ७४.५२ प्रती बॅरल या दरम्यान रुपया US $१=Rs ६९.६४ ते US $१=Rs ६९.७७ या दरम्यान होते. US $निर्देशांक ९७.३५ होता. VIX २५.१३ होता.पुट/कॉल रेशियो १.३६ होता

USA चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले की ३ मे २०१९ पासून इराणवरील क्रूड निर्यातीसंबंधीत निर्बंधातून काही देशांना दिलेली सूट रद्द केली आहे. या त्यांच्या घोषणेमुळे इराणमधून होणारी क्रूडची निर्यात ७५% ने कमी होईल. या घोषणेनंतर क्रूडच्या भावामध्ये तेजी आली. भारत आणि चीन हे इराणकडून सर्वात जास्त क्रूड आयात करतात.
यानंतर भारताच्या तेल मंत्रालयाने जाहीर केले की रिफायनरीजसाठी आवश्यक असलेले क्रूड दुसऱ्या देशांकडून मागवण्यात येईल.

सौदी अरेबियाने असे जाहीर केले की क्रूडच्या पुरवठ्यात जी घट होईल ती आम्ही भरून काढू. त्यामुळे अशी आशा आहे की क्रूडच्या वाढत्या किमती ही एक अल्प काळासाठी घटना असेल.

RBI ने आजपासून US $ स्वॅप विंडो उघडली. याचा परिणाम बँकांच्या शेअर्सवर होईल.

NSE कडून आज जाहीर करण्यात आले की जून २८ २०१९ पासून खालील कंपन्यांचे शेअर वायदा बाजारातून वगळले जातील. हे पाऊल या कंपन्यांच्या किमतीमध्ये रोज होणाऱ्या जोरदार आणि वादळी चढ उतारांपासून गुंतवणूकदारांचे संरक्षण करण्यासाठी उचलण्यात आले असे NSE ने सांगितले.
(१) BEML (२) सिंडिकेट बँक (३) अलाहाबाद बँक (४) GSFC (५) इंडियन बँक (६) अजंता फार्मा (७) कॅन फिन होम्स (८) CEAT (९) CG पॉवर (१०) चेन्नई पेट्रो (११) DCB (१२) गॉडफ्रे फिलिप्स (१३) गोदरेज इंडस्ट्रीज (१४) IDFC (१५) IFCI (१६) इंडिया सिमेंट (१७) इन्फीबिम (१८) IRB इन्फ्रा (१९) जेट एअरवेज (२०) जैन इरिगेशन (२१) कावेरी सीड्स (२२) कर्नाटक बँक (२३) MRPL (२४) NHPC (२५) OBC (२६) PC ज्युवेलर्स (२७) रेपको होम फायनान्स (२८) साऊथ इंडियन बँक (२९) रिलायन्स पॉवर (३०) सुझलॉन (३१) टाटा कम्युनिकेशन (३२) टी व्ही ब्रॉडकास्टींग (३३) V गार्ड इंडस्ट्रीज (३४) WOCKHARDT

एस्सेल प्रोपॅकमध्ये ब्लॅकस्टोननी ५१% स्टेक घेतला. २६% स्टेक खरेदी करण्यासाठी Rs १३९ प्रती शेअर या भावाने ओपन ऑफर येईल. यामुळे झी एन्टरटेनमेन्टचा शेअर वाढला.

२५ एप्रिल २०१९ रोजी बायोकॉन या फार्मा कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोनस इशू वर विचार करण्यासाठी बोलावली आहे.

स्पाईस जेट दिल्ली आणि मुंबईसाठी २८ नवीन प्रवासी वाहतूक सेवा सुरु करणार आहे.

तेजस नेटवर्क, AU स्मॉल फायनान्स बँक, LUX इंडस्ट्रीज यांचे निकाल चांगले आले.

भारत सीट्सचा नफा उत्पन्न कमी झाला.

स्टरलाईट टेक्नॉलॉजीचा निकाल अपेक्षेपेक्षा चांगला आला. कंपनीला Rs १७० कोटी फायदा झाला. कंपनीने Rs ३.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

IL & FS चे विंड प्रोजेक्ट GAIL या कंपनीने Rs ४८०० कोटीना खरेदी केले.

३० एप्रिल २०१९ रोजी शॉपर स्टॉप आपले निकाल जाहीर करतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८५६४ NSE निर्देशांक निफ्टी ११५७५ बँक निफ्टी २९४७९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.