Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका
आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ८ – ९ June आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!
आजचं मार्केट – ३० मे २०१९
आज क्रूड US $ ६९.४० प्रती बॅरल ते US $६९.६८ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.७२ ते US $१=Rs ६९.८८ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.१७ तर VIX १६.४१ होते.
USA आणि चीन मधील ट्रेड वॉर संबंधात घोषणाबाजी सुरूच आहे. चीनने USA ला सांगितले की आम्ही तुमचा विविध धातूंचा पुरवठा बंद करू. जपान आता HUVEI ऐवजी नोकियाबरोबर 5G साठी करार करू पाहत आहे.आय फोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या धातूचे ८०% उत्पादन चीनमध्ये होते.
USA ने HUVEI वर निर्बंध लादल्यापासून जगातील USA स्थित कंपन्यांनी ‘HUVEI’ला होणाऱ्या शिपमेंट थांबवल्या आहेत.US $शी तुलना करता युआन ६.९२१७ प्रती US $ होता. तो ७ ची लिमिट क्रॉस करेल असा अंदाज आहे.
FACT आणि मद्रास फर्टिलायझर्स या कंपन्यांचे सरकारने पुनर्वसन करायचे ठरवले आहे.या कंपन्यांसाठी केंद्र सरकार एक पॅकेज जाहीर करेल. या दोन कंपन्यांच्या कर्जावरचे व्याज माफ केले जाईल. फॅक्टकडे ४५० एकर जमीन आहे या जमिनीचे मॉनेटायझेशन केले जाईल. या बातमीनंतर या दोन शेअर्स मध्ये तेजी आली.
सरकार रिअल्टी सेक्टरसाठीही पॅकेज तयार करत आहे. रेंटल पॉलिसीच्या अंतर्गत या कंपन्यांना रेंट म्हणून मिळणाऱ्या उत्पन्नावर १० वर्षेपर्यंत आयकरामध्ये सूट दिली जाईल.
इराणमधून क्रूड आयात करण्यावर चर्चा सुरु आहे. इन्शुरन्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल. इराणच्या बँकेत पैसे जमा केले जातील.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात अंदाजपत्रक सादर केले जाईल असा अंदाज आहे.
निरव मोदींना UK मधून EXTRADITE करण्यासाठी कोर्टात केस चालू झाली आहे . त्यामुळे PNB आणि इतर सरकारी बँकांमध्ये थोडी तेजी होती.
सरकार एअर इंडियामधील ९८% स्टेक विकण्याचा विचार करत आहे. यासाठी सरकारची मंजुरी आवश्यक आहे.
वेस्ट कोस्ट पेपर ही कंपनी इंटरनॅशनल पेपर ह्या कंपनीतील ५१% ते ६०% स्टेक प्रमोटर्सकडून Rs २७५ प्रती शेअर या भावाने खरेदी करणार आहे. मायनॉरिटी शेअर होल्डरसाठी टेंडर पद्धतीने Rs ४५० प्रती शेअर या भावाने ओपन ऑफर आणली जाईल. इंटरनॅशनल पेपर या कंपनीने आंध्र पेपर ही कंपनी Rs ५४४ प्रती शेअर या दराने खरेदी केली होती. वेस्ट कोस्ट पेपरसाठी हा फायद्याचा सौदा आहे.त्यामुळे ह्या कंपनीचा शेअर वाढत होता.
TTK हेल्थकेअर, MMTC, गॉडफ्रे फिलिप्स,HDIL,IDBI बँक, HDIL, रेपको फायनान्स ,यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.
BEL, वोल्टाम्प, पॉवर ग्रीड, SJVN, APAR, टुरिझम फायनान्स IOL, स्टार पेपर,अपोलो हॉस्पिटल्स, अलकेम लॅब या कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
MSTC, एक्सेल कॉर्प या कंपन्या तोट्यातून फायद्यात आल्या.
GMR आणि मॅक्स या कंपन्या फायद्यातून तोट्यात गेल्या.
हायड्रो पॉवर सेक्टरमधील कंपन्यांकडे लक्ष ठेवा.कारण या वेळेला या कंपन्यांचे निकाल चांगले आले आहेत
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९८३१ NSE निर्देशांक निफ्टी ११९४६ बँक निफ्टी ३१५७१ वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!