आजचं मार्केट – २ मे २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २ मे २०१९

आज क्रूड US $ ७१.४७ प्रती बॅरल ते US $ ७१.८९ प्रती बॅरल रुपया US $१=Rs ६९.४६ ते US $१=Rs ६९.५९ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.६० होता. VIX २२.७० होता.

आधीच अडचणीत असलेल्या येस बँकेसाठी IL &FS ला दिलेली कर्ज NPA म्हणून जाहीर करायला NCLAT ने दिलेली मंजुरी हा ‘घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडे’असा प्रकार असू शकतो. आधीच बँकेची बॅलन्स शीट स्वच्छ करायची या निर्धाराने CEO रावनीत सिंग गिल यांनी कामाला सुरुवात केल्यामुळे बँकेच्या चौथ्या तिमाहीचे निकाल धक्कादायक लागले. हा घाव मोठा आहे, भरायला वेळ लागेल. Rs १४५ प्रती शेअर ते Rs १२५ प्रती शेअर या भावात गोळा करून परिस्थिती सुधारण्याची वाट पाहावी लागेल. ज्यावेळी भाव वाढू लागेल त्यावेळी प्रत्येक स्तरावर अडकलेल्या लोकांकडून सप्लाय येईल. त्यामुळे भाव हळू हळू वाढेल. Rs १७० ते Rs २०० प्रती शेअर हा भाव मध्यम अवधीत मिळू शकेल.

येस बँकेने जी बॅलन्स शीटची साफसफाई केली त्याला ‘किचन सिंकिंग’ असे म्हणतात. एखादा मोठा प्रसंग समोर असेल तर आपल्याकडील सर्व अस्वच्छता दूर करणे. जे काय दुखः दर्द आहे ते मोकळेपणाने एकाच तडाख्यात सांगून वास्तवतेला सामोरे जाणे याला ‘किचन सिंकिंग’ असे म्हणतात. राजकारणी आणि व्यावसायिक या शब्दांचा वारंवार उपयोग करतात.
सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल समोर उभे असताना आपल्या बॅलन्सशीटमधील सर्व अनियमितता अस्वच्छता दूर करणे हे अगदी योग्य असे ‘किचन सिंकिंग’ झाले. मोठा इव्हेंट पूर्ण झाल्यावर लोकांची स्मरणशक्ती अशक्त असते त्यामुळे ते हे किचन सिंकिंग विसरून जातात आणि संपूर्ण नव्या परिस्थितीला सामोरे जातात. भूतकाळातील किचन सिंकिंगची उदाहरणे म्हणजे SBI बरोबर झालेले त्यांच्या असोसिएट बँकांचे मर्जर झाल्यानंतर २०१७ डिसेंबर तिमाहीत Rs २४१६ कोटीचा तोटा दाखवला होता, तसेच TESCO नी मल्टी बिलीयन GBP ची पेन्शन डेफिसिट जाहीर केली.

कॉर्पोरेट निकालांचा हा काळ आहे. ब्रिटानियाचे चौथ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेप्रमाणे आले नाहीत. त्यामुळे मार्केटची निराशा झाली. TVS मोटर्सचे ऑपरेटिंग मार्जिन कमी झाले. त्यामुळे सगळ्या ब्रोकर्सनी टार्गेट कमी केले.
अंबुजा सिमेंटचे मार्जिन कमी झाले. प्रॉफिट वाढले पण यात वन टाइम गेन आहे. टॅक्सेस कमी भरावे लागले.
इंडियन हॉटेल्सचा निकाल चांगला आला.

एप्रिल २०१९ मधील ऑटो विक्रीचे आकडे आले. मारुतीची १७% ने, आयशर मोटर्सची एनफील्ड विक्री १७%ने तर एस्कॉर्टस ची विक्री १४% नी कमी झाली. या कंपन्यांचे विक्रीचे आकडे खराब येतील असे अनुमान होते पण अनुमानापेक्षा विक्री कमी झाली. TVS मोटर्सच्या विक्रीमध्ये ५% तर निर्यातीमध्ये १३% वाढ झाली. अशोक लेलँड आणि बजाज ऑटोची (मार्केट शेअर मिळवण्याच्या नादात मार्जिन कमी होत आहे.) विक्री वाढली. SML ISUZU ची विक्री २०.१% ने वाढली. NBFC ची लिक्विडीटीची समस्या सुटली तर त्याचा फायदा टू व्हीलर वाहनांना होईल पण ही समस्या सुटण्यासाठी अजून ६ महिने जावे लागतील.

पावसाळा जवळ येत आहे आणि पावसाचे अनुमान मेट आणि स्कायमेट यांने चांगले दिले आहे. त्यामुळे ट्रॅक्टर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्सकडे लक्ष ठेवायला पाहिजे.

रेमंडच्या ब्रँडेड टेक्सटाईल्स मध्ये वूलच्या किमती वाढल्यामुळे आणि शर्टींग मध्ये इन्व्हेन्टरी करेक्शनमुळे मार्जिनवर परिणाम दिसला.

बंधन बँकेचा चौथ्या तिमाहीचा निकाल चांगला आला. PAT Rs ६५१ कोटी, NII Rs १२५८ कोटी, लोन ग्रोथ ३८.४६% NIM १०.६९% , नेट NPA ०.५८% तर ग्रॉस NPA २.०४% (कमी झाले). बंधन बँकेने Rs ३ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. बँकेचा शेअर वाढला.

MRF टायर्स या कंपनीचे उत्पन्न वाढले पण PAT कमी झाले. कंपनीने Rs ५४ प्रती शेअर लाभांश जाहीर केला

ग्रीव्हज कॉटन या कंपनीचा निकाल ठीक आला. कंपनीने Rs १७५ प्रती शेअर या भावाने टेंडर ऑफर पद्धतीने शेअर BUY BACK जाहीर केला. कंपनी या BUY बॅक साठी Rs २४० कोटी खर्च करेल.

डाबर चा चौथ्या तिमाहीचा निकाल अपेक्षेपेक्षा कमी आला. PAT Rs ३७० कोटी, ( यात वन टाइम लॉस Rs ७५ कोटी) व्हॉल्युम ग्रोथ ४.३% तर मार्जिन २१.५% राहिले. कंपनीने Rs १.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला. कंपनीने श्री मोहित मल्होत्रा याची कंपनीचे CEO म्हणून नेमणूक केला. मार्केटला हे निकाल पसंत न आल्याने शेअर पडला

अरविंद स्मार्ट स्पेसेस चा निकाल चांगला आला.

कन्साई नेरोलॅक या पेंट बनवणाऱ्या कंपनीचे PAT कमी झाले, उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले. कंपनी मुख्यत्वे मारुती लिमिटेडला ऑटो पेंट्स पुरवत असते. या पेंट्सची मागणी कमी झाली आणि डेकोरेटिव्ह पेंट्सच्या मागणीत लक्षणीय वाढ न झाल्याने निकाल अपेक्षेपेक्षा कमी आले. कंपनीने Rs २.६० प्रती शेअर लाभांश जाहीर केला. या कंपनीच्या निकालांचा परिणाम एशियन पेंट्स आणि बर्गर पेंट्स या कंपन्यांच्या शेअर्स वर झाला. हे ही शेअर्स पडले.

रेडीको खेतान या कंपनीचा निकाल ठीक आला. PAT Rs ३९ कोटी तर उत्पन्न ५१० कोटी होते.

कंपनीने Rs १.२० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

हिंदुस्थान झिंक या कंपनीचे चौथ्या तिमाहीचे निकाल अनुमानापेक्षा कमी आले. PAT Rs २०१० कोटी, उत्पन्न Rs ५३८४ कोटी ऑपरेटिंग मार्जिन ४९.८% आले.

IL &FS ला दिलेली कर्ज NPA म्हणू जाहीर करण्यास NCLAT ने मंजुरी दिली. त्यामुळे आता या कंपनीला एक्स्पोजर असलेल्या बँकांना या कंपनीला दिलेल्या कर्जासाठी प्रोव्हिजन करावी लागेल.उदा SBI

स्पाईस जेटने मुंबईला जोडणाऱ्या १९ नवीन प्रवासी विमान सेवा चालू केल्या.

अपोलो हॉस्पिटल्स या कंपनीने सिक्युरिटी म्हणून ठेवलेले ४८लाख शेअर्स सोडवले.

MT EDUCARE ही झी ग्रुपची कंपनी ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्म ROBOMATE साठी IPO आणणार आहे.

USFDA ने सन फार्माच्या दादरा युनिटला VAI ( व्हॉलंटरी एक्शन इंडिकेटेड) या कॅटेगरीमध्ये टाकले.

PNB हौसिंग, MPHASIS, आणि L &T इन्फोटेक ह्या कंपन्या जून सीरिज पासून F &O मार्केटमध्ये समाविष्ट होतील

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८९८१ NSE निर्देशांक निफ्टी ११७२४ बँक निफ्टी २९७०८ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.