आजचं मार्केट – ३ मे २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ३ मे २०१९

आज क्रूड US $७०.२५ प्रती बॅरल ते US $ ७०.४७ प्रती बॅरल तर रुपया US $१=Rs ६९.२२ ते Rs ६९.३३ या दरम्यान होते.US $ निर्देशांक ९७.८३ होता.

आज गेल्या २० वर्षातील भयंकर वादळाने (फनी नावाच्या) ओरिसाच्या किनार्यावर धडक मारली. त्यामुळे अतिवृष्टी आणि अतिशय वेगाने वाहणारे वारे यानी जनजीवन अस्ताव्यस्त केले. या वादळाच्या कार्यक्षेत्रात पुढील उद्योग येतात. बालासोर ऍलॉईज, IMFA ( इंडियन मेटल फेरो अलाइज) कोल इंडिया, NALCO, NMDC, JSPL, IOC.

कॉगनिझंट या IT क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय दिग्गज कंपनीने पुढील वर्षांसाठी ‘गायडन्स’ कमी केला. याचा योग्य तो बोध घेऊन मार्केटमध्ये IT क्षेत्रातील कंपन्यांमध्ये ट्रेडर्सनी प्रॉफिट बुकिंग केले. त्यामुळे सर्व IT कंपन्यांच्या शेअर्स मध्ये मंदी आली.

आज ITC ची मार्केट कॅप Rs ३६४९२१ कोटी झाली. या कंपनीने HUL ला मागे टाकले

३ मे २०१९ आणि ५ मे २०१९ रोजी स्टॅंडर्ड लाईफ आपला १.७८% स्टेक ओपन ऑफरच्या माध्यमातून Rs ३९० प्रती शेअर या (फ्लोअर प्राईस) भावाने विकेल. ही फ्लोअर प्राईस CMP ला ६.५% डिस्कॉउंटने आहे.

पेपर क्षेत्रातील इंटरनॅशनल पेपर या कंपनीचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. म्हणून आज या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.

क्लास ८ ट्रक साठी मागणी ५७% ने घटली याचा परिणाम भारत फोर्ज या कंपनीवर झाला.

एप्रिल २०१९ मध्ये USA मधील JLR सेल्स १०% ने वाढले.

लॉरस लॅब आणि एवरेस्ट इंडस्ट्रीज (सिमेंट) यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल ठीक आले.

ब्ल्यू स्टार या कंपनीचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. उत्पन्न +V, प्रॉफिट +V आणि मार्जिनमध्ये सुधारणा झाली.
AB सन लाईफ म्युच्युअल फंडाने PVR मधील २.२% स्टेक ३० एप्रिल रोजी विकला.

डाबरने असे सांगितले की थंडी जास्त काळ सुरु राहिल्याने ज्यूसची विक्री कमी झाली. जी विक्री चौथ्या तिमाहीत व्हायला हवी होती ती आता पहिल्या तिमाहीत होईल. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात स्लो-डाऊन आहे. कर्मचाऱ्यांवरचा खर्च वाढला. विशेष लाभांश दिला होता. कंपनीने गुडविल ‘राईट ऑफ’ केले.सेल्स प्रमोशनवर खर्च केला. पण व्हॉल्युम ग्रोथ कमी झाली.त्यामुळे ‘डाबर’चा निकाल अपेक्षेच्या मानाने कमी आला.

किर्लोस्कर फेरस मेटल या कंपनीचा चौथ्या तिमाहीचा निकाल चांगला आला. प्रॉफिट वाढले मार्जिनमध्ये सुधारणा झाली.
गोदरेज कन्झ्युमरने चौथ्या तिमाहीत Rs ५३५ कोटींचा टॅक्स रिफंड आहे. त्यामुळे फायदा खूप दिसतो. व्हॉल्युम ग्रोथ कमी झाली.

EPC इंडस्ट्रीज या कंपनीने आपले नाव बदलून महिंद्र EPC इरिगेशन असे केले.

HSIL आणि लुडलो ज्यूट या कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. PAT उत्पन्न आणि मार्जिन यात सुधारणा झाली.

प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या सर्व माणसांनी सार्वजनिक जीवनात वावरताना किती सावधगिरी बाळगावी लागते हे ब्रिटानिया इंडस्ट्रीजच्या उदाहरणावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले.(नसली वाडियांच्या मुलाला जवळ ड्रग्स बाळगल्याबद्दल जपानी कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली.) या घटनेमुळे कंपनीच्या बिझिनेसवर फारसा परिणाम होईल असे वाटत नाही. हे तात्कालिक कारण आहे पण आज तीन दिवस झाले शेअर सतत पडतो आहे. आणि ही पडझड थांबल्यानंतर शेअर कन्सॉलिडेट होईल. हे प्रकरण लोक विसरल्यावर पुन्हा ब्रिटानियाचा शेअर मूळ किमतीला येईल अशी आशा करायला हरकत नाही.

पुढील आठवड्यात ६ मे रोजी ICICI बँक आपल्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करेल

७ मे २०१९ रोजी वेदांता आपले निकाल जाहीर करेल त्यामुळे या कंपन्यांच्या शेअर्सकडे लक्ष ठेवावे.

अपोलो टायर्स, एशियन पेंट्स, HCL टेक ९ मे २०१९ रोजी तर कॅनरा बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया,१० मे २०१९ रोजी आपले चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील

आज HUL या FMCG क्षेत्रातील दिग्गज कंपनीने आपले चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. PAT (YOY) १४% नी वाढून Rs १५३८ कोटी झाले. रेव्हेन्यू (YOY) ८.९४% वाढून Rs ९८०८ कोटी झाला. व्हॉल्युम (YOY) ७% ने वाढले. Rs १३ प्रती शेअर अंतिम लाभांश जाहीर केला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८९६३ NSE निर्देशांक निफ्टी ११७१२ बँक निफ्टी २९९५४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.