आजचं मार्केट – ६ मे २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ६ मे २०१९

आज क्रूड US $ ६९.२७ प्रती बॅरल ते US $ ६९.५१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.३४ ते US $१=Rs ६९.४० या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.६० होता. VIX २६.३२ होता.

आज क्रूडच्या भावात सुधारणा आढळून आली. ही भारतासाठी चांगली गोष्ट आहे. USA मध्ये रेकॉर्ड स्तरावर क्रूडचे उत्पादन होत आहे. इराणवरील निर्बंध आणि त्यातून ७ देशांना दिलेली सूट रद्द करणे या सर्व घटना आता क्रूडच्या दरात समाविष्ट झाल्या आहेत.

USA आणि चीन हे दोन्ही देश वेगवेगळ्या कमोडिटीजचे उत्पादक आणि उपभोक्ताही आहेत. त्यामुळे त्यांचा परस्परातील आयात निर्यात व्यापार मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही धोरणातील बदलाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होतो.

USA चीन यांच्यातील टॅरिफविषयी बोलणी खूपच धीम्या गतीने चालू असल्यामुळे USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केले की १० मे २०१९ पासून चीनमधून USA मध्ये आयात होणाऱ्या US $२०० बिलियन किमतीच्या मालावरील ड्युटी १०% ने वाढवण्यात येईल. जर यानंतरही चीनकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर आणखी US $३२५ बिलियन चीनमधून आयात होणाऱ्या मालावरील ड्युटी १०% ने वाढवण्यात येईल. चीनने मात्र असे जाहीर केले की टॅरिफ वाटाघाटींसाठी चीनचे शिष्टमंडळ ठरल्याप्रमाणे USA ला भेट देईल. ट्रम्प यांच्या या पवित्र्यानंतर जगभरातील मार्केट कोसळली. कारण जागतिक आर्थीक मंदीची भीती व्यक्त केली जात आहे.

या जगातील मार्केटमधील पडझडीचा थोडाफार असर भारतीय शेअर मार्केटवर पडला. मेटल, बँकिंग, आणि जागतिक घडामोडिंचा ज्यांच्या बिझिनेस वर परिणाम होतो असे शेअर्स पडले. उदा मदर्सन सुमी, भारत फोर्ज.

भारत आणि चीन यांच्या परस्परांशी असलेल्या व्यापारात सुधारणा होत असल्यामुळे भारतासाठी हा परिणाम मर्यादित किंवा काहीसा फायदेशीरही ठरेल . भारताची चीनला होणारी निर्यात वाढली आहे. व्यापारातही तूट कमी झाली आहे. उदा. RAW कॉटन आणि मासळी

निफ्टी आज ११६०० ची लेव्हल पकडून ठेवू शकला नाही. निफ्टी गॅप डाऊनने ओपन झाला. निफ्टीने आज ५, १३ , २०, SMA तोडली. डोजी कँडल फॉर्म झाली. निफ्टी अपेक्षेप्रमाणे रिकव्हर होऊ शकला नाही.

IDBI बँकेचा शेअर आपल्या १५ वर्षातील किमान भावावर पोहोचला.

फेडरल बँकेचे चौथा तिमाहीचे निकाल चांगले आले. प्रॉफिट वाढले. कॅशमध्ये वसुली झाल्यामुळे NPA कमी झाले. केरळात मध्यन्तरी आलेल्या पुराचा प्रतिकूल परिणाम आम्ही मागे टाकला असे बँकेने सांगितले. बँकेचा ROA १च्या वर गेला.
दीपक नायट्रेट, AB कॅपिटल, PTC फायनान्सियल्स, भारत बिजली, महिंद्र CIE यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

ICICI बँकेच्या चौथ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेनुसार आले नाहीत. NII Rs ७६२० कोटी, नेट प्रॉफिट Rs ९६९ कोटी झाले NIM ३.७२% राहिले. NPA साठी प्रोव्हिजन Rs ५४५१ कोटी केली. बँकेने ठेवींवर दिलेल्या व्याजखर्चात झालेल्या वाढीचा परिणाम प्रॉफिटवर झाला. ग्रॉस NPA ६.७% होते.

मेरिकोची विक्री Rs १६०९ कोटी ( ८.७१% वाढ) तर प्रॉफिट Rs ४०५ कोटी वजा Rs १८८ कोटी टॅक्स राईट बॅक म्हणजे Rs २१७ कोटी (१८%वाढ) झाले. कंपनीने मध्यम कालावधीसाठी टॉप लाईन ग्रोथ साठी १३% ते १५% आणि व्हॉल्युम ग्रोथ ८% ते १०% राहील असा अंदाज दिला.

कंपनीचे निकाल ठीक लागले. खोबऱ्याची कमी होत असलेली किंमत आणि करडीच्या तेलाच्या भावातील घट यामुळे मेरीकोचा उत्पादन खर्च कमी झाला.

फर्स्ट सोर्स इन्फॉर्मेशन या कंपनीचा निकाल ठीक आला. Rs २ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

कॅडीला हेल्थकेअरच्या मोरया प्लांटच्या २२ एप्रिल २०१९ ते ३ मे २०१९ या दरम्यान USFDA ने केलेल्या तपासणीत १४ त्रुटी दाखवल्या.

स्ट्राइड्स फार्माच्या पुडुचेरी युनिटसाठी OAI( ऑफिसिअल एक्शन इनिशिएटेड) प्रमाणपत्र मिळाले.

टाटा मोटर्स आपल्या छोट्या डिझेल गाड्यांचे उत्पादन बंद करणार आहे. BS IV नियम लागू झाल्यावर कंपनीला काही अपग्रेडेशन्स आणि काही जास्त उपकरणे बसवावी लागतील. त्यामुळे या गाड्यांची कॉस्ट Rs १ लाख ते Rs १.५० लाख वाढेल असे कंपनीने सांगितले.

जेट एअरवेज ही कंपनी खरेदी करण्यासाठी कोणीही बायर मिळत नाही.

फानी तुफान बंगालमध्ये WEAK झाले. रस्त्यावर जे मासे विकत होते ते काही दिवस मासेमारीसाठी समुद्रात जाणार नाहीत. स्पर्धा कमी झाली. माशांच्या किमती वाढल्या. याचा फायदा IFB ऍग्रोला होईल.

ICRA ने कॅनरा बँक, येस बँक, रिलायन्स कॅपिटल यांचे रेटिंग डाऊनग्रेड केले. त्यामुळे हे शेअर्स पडले.

HUL च्या ७% व्हॉल्युम ग्रोथने निराश केले. मार्जिन फ्लॅट राहिले. पाऊस जर अनुमानाप्रमाणे चांगला पडला नाही तर ग्रोथमध्ये सुधारणा होणे कठीण आहे.

MACLEOD रसेल आणि EVEREADY या WILLIAMSON MAGOR ग्रुपच्या कंपन्या आर्थीक अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या कर्जापेक्षा त्यांची मार्केट कॅप कमी आहे . MACLEOD रसेल ही कंपनी आपल्या चहाच्या बागा विकून पैसे उभे करण्याचा प्रयत्न करीत आहे. कामगारांना नियमित पगार मिळत नाही. ICRA ने या कंपन्यांची रेटिंग डाऊनग्रेड केली आहेत. हे दोन्ही शेअर गेल्या महिन्यात ५०% पडले आहेत.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८६०० NSE निर्देशांक निफ्टी ११५९८ बँक निफ्टी २९६१८ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

3 thoughts on “आजचं मार्केट – ६ मे २०१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.