आजचं मार्केट – ७ मे २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ७ मे २०१९

आपल्याला अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा. आपली संपत्ती स्वास्थ्य समाधान यश अक्षय वाढत राहो.

आज क्रूड US $ ७१.०४ प्रती बॅरल ते US $ ७१.३२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.३१ ते US $१=Rs ६९.३८ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.५८ होता. VIX २५.८९ होते. पुट/कॉल रेशियो १.०३ होता.

USA ने भारताला स्वस्तात क्रूड देण्यास असमर्थता दाखवली. त्यामुळे OMC चे शेअर्स पडले.

USA HIB व्हीसासाठी आकारली जाणारी फी वाढवण्याचा विचार करत आहे. या बातमीमुळे IT क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स पडले.जसे जसे २३ मे २०१९ तारीख जवळ येऊ लागली आहे तसे तसे प्रॉफिट बुकिंग सुरु झाले आहे. आज मार्केटने निफ्टी ११५५० ही महत्वाची सपोर्ट पातळी सोडली. सध्या निर्देशांक ‘मेक ऑर ब्रेक’ लेव्हलला आले आहेत.

G E शिपिंग ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली.

WOCKHARDT, हेस्टर बायोसायन्सेस,महिंद्रा लॉजिस्टिक चे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

भारती एअरटेलचा निकाल चांगला आला. कंपनी तोट्यातून फायद्यात आली.

ज्योती लॅबचे उपन्न वाढले. PAT कमी झाले. मार्जिनही घटले. Rs ३ लाभांश जाहीर केला

काया या कंपनीचे उपन्न वाढले, तोटाही वाढला.

VIP चे उत्पन्न वाढले. प्रॉफिट कमी झाले.

RCF ला एकमुश्त नफा Rs २३.४ कोटी झाला. एकूण नफा Rs ४८ कोटी झाला.

एस्कॉर्ट या कंपनीला चौथ्या तिमाहीसाठी Rs १२१.३५ कोटी प्रॉफिट झाले. रेव्हेन्यू Rs १६३१ कोटी झाला. प्रॉफिट आणि उत्पन्न वाढले.

CEAT कंपनीच्या उत्पन्नात वाढ झाली. प्रॉफिट कमी झाले. कंपनीला एकमुश्त तोटा Rs ४०.५ कोटी झाला. कंपनीने Rs १२ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

ABB या कंपनीला Rs ११६ कोटी फायदा झाला. उत्पन्न Rs १८५० कोटी झाले. EBITDA Rs १४५.५ कोटी झाला. ऑपरेटिंग मार्जिन ७.९% होते.

BSE चे चौथ्या तिमाहीचे निकाल ठीक आले. BSE Rs ६८० प्रती शेअर या भावाने ६८लाख शेअर BUY बॅक करेल.
धनलक्ष्मी बँकेत FII चे होल्डिंग ११% आहे. प्रमोटर्सचे होल्डिंग फार कमी आहे. ही बँक अक्विझिशनसाठी योग्य टार्गेट वाटते.

CG पॉवरने येस बँकेकडे कर्जासाठी तारण ठेवलेले ८.१ कोटी शेअर्स बँकेने आपल्या ताब्यात घेतले. .

ब्रेक सिस्टीममध्ये दोष राहिल्याने ७००० बुलेट आणि बुलेट इलेक्ट्रा गाड्या आयचर मोटर्सने कॉल बॅक केल्या.
UK मधील JLR ची विक्री ११.५% ने वाढली.

जून २०१९ पासून 5G साठी ट्रायल रन सुरु होतील. या ट्रायल रनसाठी डॉटकडून (१) रिलायन्स जियो सॅमसंग (२) भारती एअरटेल आणि नोकिया (३) आयडियावोडाफोन आणि एरिक्सन यांना तीन महिन्यांसाठी लायसन्स देण्यात आले.
वेदांताचे चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले. PAT Rs २६१५ कोटी झाला. झिंक आणि कॉपर यांच्या वाढलेल्या मागणीमुळे आणि किमतीमुळे भारतातील खाणी बंद झाल्याचा फारसा परिणाम निकालावर दिसत नाही. ऑपरेशन्स पासून रेव्हेन्यू Rs २३०९२ कोटी झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८२७६ NSE निर्देशांक निफ्टी ११४९७ बँक निफ्टी २९२८८ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.