आजचं मार्केट – ८ मे २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ८ मे २०१९

आज क्रूड US $ ६९.९७ प्रती बॅरल ते US $ ७०.२६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.४३ ते US $१=Rs ६९.६१ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.४७ होता.

चीनच्या उपाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली चीनचे शिष्टमंडळ ९ मे २०१९ आणि १० मे २०१९ या दिवसांत USA बरोबर पुन्हा टॅरिफच्या संदर्भात वाटाघाटी करेल. चीनमध्ये बॉण्ड डिफॉल्टची खबर आहे. USA चे कर्ज वाढत आहे. ट्रेड वॉरचा तिढा लवकर सुटेल असे सध्या तरी वाटत नाही.त्यामुळे जागतिक अर्थकारणात मंदीचे ढग येण्याची शक्यता आहे. १० मे २०१९ ला होणाऱ्या व्दिपक्षीय वाटाघाटीचे काही फलित आले नाही तर USA ने सांगितल्याप्रमाणे चीनमधून होणाऱ्या आयातीवरील ड्युटीच्या दरात वाढ होईल.

ज्या कंपन्यांना खूप कर्ज आहे किंवा ज्या कंपन्यांचा राजकारणाशी संबंध आहे त्या कंपन्यांपासून दूर रहा. उदा :- अडानी ग्रुप, ADAG ग्रूप

या वर्षी भारतात साखरेचे ३३५ लाख टन उत्पादन होईल असा अंदाज आहे. या पैकी ५० लाख टन साखर निर्यात करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले होते. साखर निर्यात करण्यासाठी सरकारने सवलती, सबसिडी देऊ केल्या होत्या. पण आजपर्यंत ३० लाख टन साखरच निर्यात झाली. त्यामुळे सरकार साखर उत्पादक कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्याची शक्यता आहे. यात सबसिडी रोखणे, साखरेचा साठा जप्त करणे इत्यादींचा समावेश असू शकतो. पण निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे निर्णय नवीन सरकार घेईल. पण या बातमीमुळे साखर उत्पादक कंपन्यांचे शेअर्स पडले.

पडत्या मार्केटमध्ये सरंक्षणात्मक गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स , FMCG क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स खरेदी करतात. पण हे शेअर्स आता महाग झाले आहेत, जाहीर झालेल्या निकालाप्रमाणे व्हॉल्युम ग्रोथ कमी होत आहे.USA ची भारतीय फार्मा उद्योगाप्रती असलेली नाराजी यामुळे आणि USFDA च्या रेग्युलेटरी एक्शनमुळे फार्मा शेअरमध्येही तेजी दिसत नाही. उदा :- फायझर, DR रेड्डीज ग्लेनमार्क फार्मा. त्याच कारणामुळे IT क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्येही नवनवीन प्रश्न उद्भवत आहेत. नोकरींमध्ये USA मधील स्थानिकांना महत्व, HIB व्हिसाचे नियम कडक करणे आणि फी वाढवणे.

ट्रेडर्स आता टर्नअराउंड होणाऱ्या कंपन्यांकडे लक्ष देत आहेत. उदा धनलक्ष्मी बँक, ग्रॅनुअल्स

DHFL ला आधार हौसिंगमधील स्टेक विकण्यासाठी मंजुरी मिळाली.

एस्सेल प्रोपॅक, ग्लोबल स्पिरिट्स, ब्रिगेड एंटरप्राइझेस, MAS फायनान्सियल्स, श्री कलाहस्ती पाईप्स, अलेम्बिक या कंपन्यांचे उत्पन्न, नफा वाढला मार्जिनमध्ये सुधारणा दिसली.

टाटा सन्सची GST च्या अधिकाऱ्यांनी चौकशी चालू केली आहे. या कंपनीला Rs १५०० कोटी
GST आकारला जाण्याची शक्यता आहे.

ICRA ने MACLEOD RUSEL या कंपनीचे रेटिंग A बदलून BBB – केले. (डाऊनग्रेड केले)
निओजेन केमिकल्सची लिस्टिंग Rs २५१ वर झाले.( IPO प्राईस Rs २१५). त्यामुळे ज्या अर्जदारांना शेअर्स अलॉट झाले त्यांना लिस्टिंग गेन्स मिळाले.

ICRA ने कॅन फिना होम्स चे रेटिंग AA वरून AA + केले. आऊटलुक निगेटिव्हवरून स्टेबल केले.

आता थोडे मदर्सन सुमी या ऑटो अँसिलरी क्षेत्रातील कंपनीविषयी. या कंपनीला BMW कडून ५ % ऑर्डर मिळते BMW कंपनीचे प्रॉफिट ७८% कमी झाले, PORSHE कडून ५% ऑर्डर मिळते PORSHE कंपनीला युरॊ ५३.५ कोटी दंड झाला, DAILMER या कंपनीकडून १५% ऑर्डर मिळते DAILMER कंपनीचे प्रॉफिट ३७% ने कमी झाले, रेनॉल्ट या कंपनीकडून ५% ऑर्डर मिळते पण रेनॉल्ट कंपनीची भारत, इराण, आफ्रिकेमधील विक्री कमी झाली. भारतात मारुतीकडून ५% ऑर्डर मिळतात पण मारुतीची विक्री कमी झाली. वर दिलेल्या विश्लेषणावरून या कंपनीला मिळणाऱ्या ऑर्डर्समध्ये घट झाली.कारण या कंपनीला ऑर्डर देणार्या कंपन्या अडचणीत आहेत. त्यामुळे मदर्सनसुमीचा शेअर सतत मंदीत आहे.
धनलक्ष्मी बँक तोट्यातून फायद्यात आली.

टायटन या कंपनीचे चौथ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेप्रमाणे आले. उत्पन्न Rs ४६७१ कोटी, स्टॅण्डअलोन नफा Rs २९५ कोटी झाला. कंपनीने Rs ७० कोटींचा एकमुश्त घाटा दाखवला आहे. कंपनीने Rs ५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.ऑपरेटिंग मार्जिन ७.९% होते.

RBL बँक, HDFC लाईफ, ICICI प्रु आणि SBI लाईफ इन्शुरन्स या कंपन्यांचा समावेश MSCI निर्देशांकात होण्याचा संभव आहे.

फिअर आणि ग्रीड मीटर आज ३५ ते ३८ या पातळीवर पोहोचले. ही लेव्हल ओव्हरसोल्ड लेव्हल असते. शॉर्ट टर्म मध्ये रिलीफ रॅली अपेक्षित असते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७७८९ NSE निर्देशांक निफ्टी ११३५९ बँक निफ्टी २८९९४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.