आजचं मार्केट – ९ मे २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ९ मे २०१९

आज क्रूड US $ ६९.६६ प्रती बॅरल ते US $ ७०.४६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.७१ ते US $१=Rs ७०.०२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.५८ VIX २६.३६ आणि पुट /कॉल रेशियो १.०४ होता.

चीन आणि USA यांच्यातील व्दिपक्षीय ट्रेड वाटाघाटी सुरु झाल्या. USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी मात्र चीनने आम्हाला फसवले असे सांगून १० मे २०१९ पासून आधी घोषणा केलेली (१५% पासून २५%) ड्युटी वाढ आकारण्यास सुरुवात होईल असे सांगितले. यावर चीनच्या वाणिज्य मंत्र्यांनी USA चा निर्णय एकतर्फी आहे असे सांगून आम्ही त्याचा विरोध करतो असे सांगितले. पण त्यांनी असे सांगितले की आम्ही वाटाघाटीमधून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. चीन आणि USA यांच्यात चाललेल्या ट्रेडवॉरमध्ये भारताचे प्रत्यक्ष असे नुकसान नाही पण आता जागतिकीकरणामुळे जर जागतिक अर्थकारणात मंदी आली तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवरही होईल. दोन हत्तीच्या लढाईत आजूबाजूला असलेल्या लोकांना त्रास होतो तसेच काहीतरी.

क्रूडच्या किमती वाढत आहे. पण सार्वत्रिक निवडणुका चालू असल्यामुळे पेट्रोल आणि डिझेल यांचे भाव वाढवण्यास सरकार परवानगी देत नाही त्यामुळे OMC चे मार्जिन कमी होत आहे.

टाटा कम्युनिकेशनचे (कंपनी फायद्यातून तोट्यात गेली) चौथ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक आले.

GILLET, JK पेपर ( पल्पचा साठा असल्यामुळे फायदा झाला), EID पॅरी (ह्या साखर उत्पादक कंपनीचे निकाल चांगले आल्यामुळे इतर साखरउत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली) HUHTAMAAKEE PPL, ग्रॅन्युअल्स ( फायदा Rs ६४ कोटी, उत्पन्न Rs ६१३ कोटी, ऑपरेटिंग मार्जिन १५.९%), सुंदरम फासनर्स, सोलार इंडस्ट्रीज यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

रेमंड्स ( Rs १४० कोटी फायदा, Rs ४ प्रती शेअर लाभांश), सारेगम, ICRA ( Rs ३० प्रती शेअर लाभांश) अपोलो टायर्स ( Rs १०० कोटी एकमुश्त घाटा, PAT Rs ८४ कोटी) सतलज टेक्सटाईल्स, HT मेडिया, PNB हौसिंग (PAT Rs ३७१ कोटी, उत्पन्न वाढले), HCL टेक (Rs २ लाभांश, २४ मे रेकॉर्ड डेट) या कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल ठीक आले.

एशियन पेंट्स ला PAT Rs ४८७ कोटी, उत्पन्न Rs ५०१८ कोटी, मार्जिन १६.४% चौथ्या तिमाहीत राहिले. कंपनीने Rs ७.६५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. कंपनीच्या डेकोरेटिव्ह पेंट्स बिझिनेसमध्ये १०% वाढ झाली.

टी सी एस ने रिलायन्स इंडस्ट्रीजला मार्केट कॅपमध्ये मागे टाकले. कंपनेची मार्केट कॅप ८.२० लाख कोटी मार्केट कॅप झाली. ‘मॉर्गन स्टॅनले’ ने रिलायन्स इंडस्ट्रीजचे रेटिंग ‘ओव्हरवेट’ वरून ‘इक्वलवेट’ रेटिंग दिले. टार्गेट Rs १३४९ ठेवले. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप ३ मे २०१९ पासून Rs ९०,००० कोटींनी कमी झाली.

झी एंटरटेनमेंट मधील शेअर्स रिलायन्स म्युच्युअल फंडांनी विकले. झी एन्टरटेनमेन्ट ने खुलासा केला की स्टॅन्डअलोनआणि कन्सॉलिडिटेड फायनान्सियल स्टेटमेंटचे ऑडिट डेलॉइट करत आहे. २७ मेला बोर्ड मीटिंग आहे. एस्सेल ग्रुप स्टेक सेल करण्याच्या प्रयत्नात आहे. वाटाघाटी ऍडव्हान्स स्टेजला आहेत. ह्या कंपनीच्या निवेदनानंतर शेअरमध्ये थोडी तेजी आली.
IL & FS मध्ये जे एक्स्पोजर असेल ते तिमाही फायनान्सियल स्टेटमेंटमध्ये जाहीर करण्याची सक्ती करणारे २४ एप्रिल २०१९ रोजीचे सर्क्युलर मागे घेतले.

फ्युचर लाईफ स्टाईल, इमामी, इरॉस यांच्या प्रमोटर्स शेअर्स तारण म्हणून ठेवले. या पडत्या मार्केट मध्ये जास्त कर्ज असलेल्या कंपन्या आणि ज्या कंपन्यांच्या प्रमोटर्सनी आपले शेअर्स तारण म्हणून ठेवले आहेत त्या कंपन्यांपासून दूर राहा.”STAY OUT WHEN YOU ARE IN DOUBT” हा कानमंत्र लक्षात असू द्या. उदा ADAG ग्रुप, अजंता फार्मा, अपोलो टायर्स , जैन इरिगेशन, U फ्लेक्स, डिश टीव्ही, JK टायर

जेट एअरवेजच्या बाबतीत कॉर्पोरेट मंत्रालयाने SFIO ( सिरीयस फ्रॉड इन्वेस्टीगेशन ऑफिस ) तपास करण्याचे आदेश दिले.

एप्रिलमध्ये मारुतीचे उत्पादन ९.६% ने घटून १.४७ लाख युनिट्स झाले.

१५ वा वित्तीय आयोग आणि बँका यांच्यातली मीटिंग आज सुरु झाली.

वेध उद्याचा

उद्या IIP चा डाटा येईल. लार्सन & टुब्रो, अलाहाबाद बँक, कॅनरा बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आयशर मोटर्स GSK कन्झ्युमर, कजरिया सिरॅमिक्स, MERCK,PVR,वेंकीज, IDFC फर्स्ट बँक आपले चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.
उद्या चीन आणि USA च्या वाटाघाटीत काय निष्पन्न झाले हे समजेल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७५५८ NSE निर्देशांक निफ्टी ११३०१ बँक निफ्टी २८८८४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.