आजचं मार्केट – १० मे २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १० मे २०१९

आज क्रूड US $ ७०.४५ प्रती बॅरल ते US $ ७०.७३ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.८५ ते US $१=Rs ७०.०३ या दरम्यान होते US $ निर्देशांक ९७.४० आणि VIX २५.५० होते.

शुक्रवारपासून म्हणजेच १० मे २०१९ पासून USA चीनमधून आयात होणाऱ्या टॅरीफच्या दरात वाढ करणार असे जाहीर झाले होते. १० मे २०१९ रोजी USA च्या वेळेप्रमाणे रात्री १२ वाजून १ मिनिटांपासून म्हणजेच भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजून ३१ मिनिटांनी USA ने चीनमधून आयात होणाऱ्या US $२०० बिलियन उत्पादनावरील १५% ड्युटी वाढवून २५% केली. चीनने सांगितले की वाटाघाटींनी जर हा प्रश्न सुटला नाही तर आम्ही या दरवाढीला योग्य असे उत्तर देऊ.
या USA आणि चीन यांच्यातील ट्रेड वॉर हमरीतुमरीवर आले असल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत घबराट पसरली.याचा सगळ्यात जास्त प्रतिकूल परिणाम मेटल्सशी संबंधित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्सवर झाला. चालू असलेल्या वाटाघाटींमध्ये काही सकारात्मक निर्णय झाले तर मेटल्सशी संबंधित असलेल्या कंपन्यांचे शेअर्स सुधारतील. USA च्या सॉव्हरिन बॉण्ड्सचे यिल्ड थोड्या प्रमाणात कमी झाले. चीन हा USA चे सॉव्हरिन बॉण्ड विकत घेणारा सर्वात मोठा देश आहे.

ट्रेड वॉर प्रमाणेच USA ने इराणवर घातलेले निर्बंध क्रूडच्या दरावर परिणाम करत आहेत. क्रूडसाठी जागतिक डिमांड वाढत आहे. त्यामुळे क्रूड US $६८ प्रती बॅरल ते US $ ७५ प्रती बॅरल या दरम्यान राहील असा अंदाज वर्तवला जात आहे.

THYSENKRUPP आणि टाटा स्टील यांच्यातील JV रद्द होण्याची किंवा लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. आता ह्या जर्मन कंपनीच्या ELEVETAR डिव्हिजनचे स्वतंत्र लिस्टिंग करण्याची योजना आहे. हे JV रद्द झाल्यास या दोन्ही कंपन्यांना नुकसान होईल. ही बातमी आल्यावर टाटा स्टीलचा शेअर पडला.

NTPC आणि पॉवर ग्रीड या कंपन्यांच्या मदतीने सरकार राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक ३० किलोमीटर अंतरावर एक अशी ४००० चार्जिंग स्टेशन लावणार आहे. या कामासाठी राज्य सरकारांनी १५० नोडल एजन्सीजची घोषणा केली. सरकार Rs १०५० कोटींची सबसिडी देणार आहे.

अलाहाबाद बँकेचा तोटा वाढला. NPA साठी जास्त प्रोव्हिजन करावी लागली. NPA मध्ये सुधारणा झाली. एकंदरीत निकाल निराशाजनक होते.

कॅनरा बँकेचा तोटा कमी झाला ग्रॉस तसेच नेट NPA कमी झाले, प्रोव्हिजनिंग वाढली त्यामुळे निकाल ठीक आले असे म्हणावे लागेल.

SBI तोट्यातून प्रॉफीटमध्ये आली. ग्रॉस NPA आणि नेट NPA यात लक्षणीय सुधारणा झाली. प्रोव्हिजनींग आणि फ्रेश स्लीपेजिस यामध्ये वाढ झाली. हे निकाल भविष्यात सुधारणा दाखवणारे आशावादी म्हणावे लागतील. SBI कार्ड्स आणि

SBI जनरल इन्शुअरन्स यांचे २०२० मध्ये IPO आणून लिस्टिंग होईल.

आयशर मोटर्सचे प्रॉफिट १८% ने वाढले, कंपनीने Rs १२५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

लार्सन & टुब्रोचे प्रॉफिट ८% ने वाढले कंपनीने Rs १८ प्रती शेअर अंतिम लाभांश जाहीर केला.

शक्ती पंप्स, स्ट्राइड्स फार्मा, प्रिसम जॉन्सन ( PAT कमी झाले ), दिलीप बिल्डकॉन, अडवाणी हॉटेल्स, कल्पतरू पॉवर, हिकल केमिकल्स, डाटामाटिक्स यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

नोसिल, VST टिलर्स, वेंकी’ज ( PAT ऑपरेटींग मार्जिनमध्ये लक्षणीय घट) यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

कजारिया सिरॅमिक्स, PVR यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल ठीक आले.

रिलायन्स इंडस्ट्रीजने २५० वर्षांचा जुना ब्रँड ‘हमलीज’ Rs ६२० कोटींना खरेदी केला.

बजाज ऑटोने नवीन अवेंजर स्ट्रीट १६० ( किंमत Rs ८२०००) तर M & M ने नवीन Rs १२ लाखाची XSUV ५०० मार्केट मध्ये आणली.

PNB हौसिंग, MPHASIS, L &T इन्फो ह्या कंपन्यांचे शेअर जून २०१९ पासून F &O मध्ये सामील होतील.
पतंजलीने मागणीच्या प्रमाणात कमी असलेले आपले उत्पादन वाढवले, GST आणि वितरणाचा प्रश्नही सोडवला. त्यामुळे आता पतंजली ही कंपनी HUL आणी कोलगेटचा मार्केट शेअरकाबीज करत आहे असे चित्र दिसत आहे.

टाटा मोटर्सची एकंदरीत JLR विक्री १३.३% ने कमी झाली. चीनमध्ये ४५.७%, युरोपमध्ये ५.५% कमी झाली. लॅन्ड रोव्हरची विक्री १३.१%ने कमी झाली.

लोकांची मानसिकता अशी असते की लोकांना वाढणारा शेअर चांगला वाटतो आणि पडणारा शेअर खराब वाटतो. त्यामुळे वाढत असलेले शेअर्स खरेदी करतात. आणि फसतात हेच टायटन च्या बाबतीत घडते आहे. हा शेअर आता तुलनात्मक दृष्टीने महाग आहे (५५ च्या P/E मल्टिपलवर ). सध्या व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगवर लक्ष द्यावे.

डेल्टा कॉर्पने GST भरणा कमी केला यासाठी डायरेक्टर जनरल ऑफ GST ने कारवाई सुरु केली आहे. त्यामुळे शेअर १५% पडला.

वेध भविष्याचा

१३ मे २०१९ रोजी आंध्र बँक, बाळकृष्ण इंडस्ट्रीज, गोदरेज इंडस्ट्रीज, HDFC, ITC,कर्नाटक बँक, OBC, युनायटेड बँक या कंपन्या आपले चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.
१४ मे रोजी इंडियन बँक, नेस्ले, सीमेन्स, यूको बँक, युनियन बँक,या कंपन्या आपले चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.
१५ मे २०१९ रोजी J &K बँक, करूर वैश्य बँक, ल्युपिन, पेट्रोनेट LNG ह्या कंपन्या आपले चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७४६२ NSE निर्देशांक निफ्टी ११२७८ बँक निफ्टी २९०४० वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.