आजचं मार्केट – १३ मे २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १३ मे २०१९

आज क्रूड US $ ७०.८० प्रती बॅरल ते US $ ७१.९० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.९१ ते US $ १= ७०.३८ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.३३ आणि विक्स २७.५२ होता.

चीन आणि USA यांच्यातील टॅरिफ संबंधित वाटाघाटींमधून काहीही निष्पन्न झाले नाही. चीनची करन्सी युआन घसरली. दोन्ही राष्ट्रांनी चर्चा चालू ठेवायला संमती दिली पण जास्त काही आशादायक घडेल असे वाटत नाही.

जेट एअरवेजमध्ये मायनॉरिटी स्टेक खरेदी करण्यासाठी एतिहादने बोली लावली आहे. पण मेजॉरिटी पार्टनर कोण असेल याकडे ध्यान द्यायला हवे.

USA मधील लोकांनी USA मधील कोर्टात अर्ज केला आहे. हा अर्ज ४५ राज्यानी २० कंपन्यांविरुद्ध दाखल केला आहे. या कंपन्या चढ्या किमतीला औषधे विकत आहेत अशी तक्रार आहे. या कंपन्यात ल्युपिन, WOCKHARDT, ऑरोबिंदो फार्मा, ग्लेनमार्क फार्मा, DR रेड्डीज यांचा समावेश आहे. ही बातमी आल्यावर फार्मा सेक्टरमधील कंपन्यांचे शेअर्स पडायला सुरुवात झाली.

ऑटो सेक्टर मध्ये मंदी आहे एप्रिल २०१९ या महिन्यात पॅसेंजर वाहनांची विक्री २०%ने तर टू व्हिलर्स विक्री १६.४% ने आणि कमर्शियल वाहनांची विक्री ६% ने कमी झाली.

हिरो मोटोने आज MEASTRO EDGE १२५ आणि प्लेजर +११० टू व्हीलर बाजारात आणल्या. GSK कंझ्युमरचे निकाल चांगले आले. त्यांचे ऑपरेटिंग मार्जिन वाढले, व्हॉल्युम वाढले.

D -मार्टच्या चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. QIP रूटच्या माध्यमातून प्रमोटर्स आपला स्टेक कमी करणार आहेत.

टेक्सरेल, जिनस पॉवर, P & G हेल्थ, MERCK , विनती ऑर्गनिक्स (ब्यूटाईल फिनाईल चा नवीन प्लांट जुलै मध्ये उत्पादन सुरु करेल,FY २० साठी व्हॉल्युम ग्रोथ ३०% ते ४०%च्या दरम्यान असेल असे कंपनीने सांगितले.) ओबेराय रिअल्टीज,HDFC यांचे तिमाही निकाल चांगले आले.

OBC, CHALET हॉटेल, मंगलम सिमेंट, या कंपन्या तोट्यातून फायद्यात आल्या ( टर्न अराउंड झाल्या.)

इक्विटास होल्डिंग या कंपनीचा चौथ्या तिमाहीचा निकाल असमाधानकारक आला . लो कॉस्ट डिपॉझिट कमी झाली, कॉस्ट ऑफ फंडिंग वाढली, स्प्रेड कमी झाला.

PC ज्युवेलर्स आपला एक्स्पोर्ट बिझिनेस वेगळा काढणार आहेत.

L &T चे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. शेअरची २०० DMA Rs १३४५ च्या आसपास आहे. कंपनीला शेअर बाय बॅक साठी मंजुरी मिळाली तर Rs १०० ते Rs १५० चा फायदा मिळेल. टाटा स्टील आणि THYSENKRUPP यांच्यातील जॉईंट व्हेंचर युरोपियन युनियनने रद्द केले. टाटा स्टीलने सांगितले की आम्ही यूरोपमधील बिझिनेससाठी नवीन पार्टनरच्या शोधात आहोत. टाटा स्टीलचा शेअर पडला

IIPचे नेगेटिव्ह नंबर आणी FMGC कंपन्यांचे व्हॉल्युम ग्रोथ मधील अपयश, याचे आश्चर्य वाटते. कारण निवडणुका आणि रोजच्या गरजेच्या वस्तूंची खरेदी यांचा काही संबंध असेल हे पटत नाही. NBFC ना सुद्धा हल्ली कठीणच दिवस आले आहेत. DEBT मार्केटमध्ये लिक्विडीटी crunch असल्यामुळे होलसेल फंडिंग सहजगत्या उपलब्ध होत नाही

RITES मध्ये ८७.४% तर IRCON मध्ये सरकारचा ८९.१८% शेअर आहे. या दोन्ही कंपन्यात OFS च्या माध्यमातून सरकार आपला स्टेक कमी करण्याची शक्यता आहे

बेअरिंग एशिया फंडाने NIIT टेकमध्ये ०.७५% स्टेक .OFS च्या माध्यमातून खरेदी केली.

ITC चे चेअरमन YC देवेश्वर यांचे अलीकडेच निधन झाले.त्यांना श्रद्धांजली.ITC च्या जडणघडणीत आणि डायव्हरसीफिकेशनमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या जागी आज ITC ने संजीव पुरी यांना चेअरमन म्हणून नियुक्त केले.ITC चे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. सर्वच शाखांनी म्हणजे सिगारेट, पेपर, हॉटेल्स, FMCG आणि ऍग्री प्रगती केली. कंपनीने Rs ५.७५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

WOCKHARDT च्या दमण आणि कडॆया युनिट चालू ठेवण्यासाठी UK च्या रेग्युलेटरी ऑथॉरीटीने मंजुरी दिली. GMP ( गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस) चे प्रमाणपत्र दिले.

सध्या FII च्या हातात सर्व काही आहे. त्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर चालू आहे. आज मार्केटमध्ये वोलतालिटी शिगेला पोहचली ऑप्शनचा प्रीमियम महाग झाला आहे. .

सातत्याने ९ व्या दिवशी मार्केट पडले. गेल्या ८ वर्षात प्रथमच सलग ९व्या दिवशी मार्केट मंदीत होते.प्रत्येक मतदानाच्या दुसर्या दिवशी मार्केट कोसळते किती मतदान झाले यावरून नवीन अंदाज बांधले जातात, जुने अंदाज बदलले जातात कां ? जसा जसा सार्वत्रीक निवडणुकींच्या निकालाचा मेगा इव्हेंट जवळ येत आहे तसे तसे सर्वजण विशेषतः FII प्रॉफिट बुकिंग करत आहेत.

ज्या लोकांनी शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे किंवा ज्यांना करायची आहे त्यांनी थोडी थोडी गुंतवणूक करावी ४०% कॅशमध्ये राहावे सतत पडणाऱ्या मार्केटमध्ये स्ट्रॉन्ग आणि क्वालिटी शेअर्समध्ये गुंतवणूक करावी.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७०९० NSE निर्देशांक निफ्टी १११४८ बँक निफ्टी २८६६० वर बंद झाले
भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.