आजचं मार्केट – १४ मे २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ८ – ९ June आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – १४ मे २०१९

आज क्रूड US $ ७०.४० प्रती बॅरल ते US $ ७०.४६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.३३ ते US $१= Rs ७०.४५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.३१ तर VIX २७.२६ होते.

सध्या USA आणि चीन यांच्यातील ट्रेड वॉरची सुरु असलेली कथा आजही संपली नाही. USA ने टॅरिफ वाढवले म्हणून USA कडून आयात होणाऱ्या शेतकी मालावरील टॅरिफ चीनने वाढवले. चीनने USA चे सॉव्हरिन बॉण्ड्स विकायला सुरुवात केली. यात भरीत भर युरोपने टाकली. USA त्यांच्या कार्सवरील टॅरिफ वाढवत आहे. त्यामुळे युरोपसुद्धा बदला घेण्याच्या उद्देशाने तयारीत आहे. इराणही सामील आहेच. आता चीन त्यांच्या चलनाचे अवमूल्यन करेल. आपल्याकडे निवडणुकांच्या निकालामुळे अनिश्चितता आहेच. परिणामी मार्केटमध्ये वोलतालीटी शिगेला पोहोचली आहे.

एतिहादने बोलीत कर्जमाफी, ओपनऑफरच्या बाबतीत सवलत मागितली आहे. Rs २००० कोटींपेक्षा जास्त रक्कम देणार नाही असे सांगितले. जेट एअरवेजला कर्ज देणाऱ्या बँकांना या अटी मान्य होत नसल्यामुळे पुन्हा बोली मागवण्याचा या बँका विचार करत आहेत.

बँक ऑफ बरोडाने Rs ११७.६५ प्रती शेअर या भावाने ४.२८ कोटी शेअर्स सरकारला अलॉट केले.

सेरा सॅनिटरीवेअर,मोतीलाल ओसवाल, शेमारू, आयनॉक्स लिजर, युनायटेड बँक,कर्नाटक बँक(Rs ३.५० प्रती शेअर लाभांश), सीमेन्स, गेटवे डिस्ट्रीपार्क ( Rs २८१ कोटी वन टाइमप्रॉफिट ), गोदरेज इंडस्ट्रीज, वोडाफोन (ARPU सुधारले), SRF, मुथूट फायनान्स, शेमारू , MRPL यांचे निकाल चांगले आले.

अडानी ग्रुपचे शेअर्स, IRB इन्फ्रा, DLF,JSPL, सन टी व्ही, सन फार्मा हे राजकीय दृष्ट्या सेन्सिटिव्ह शेअर्स आहेत. निवडणुकीच्या निकालाचा या शेअर्सवर जास्त परिणाम होण्याचा संभव आहे.

बॉम्बे बर्मा, इंडियन ऍक्रिलिक, स्नोमॅन लॉजिस्टिक, LINDE इंडिया या कंपन्या तोट्यातून फायद्यात आल्या.

मदर्सन सुमी, वेदांता, SAIL, JSW स्टील, JSPL, टाटा मोटर्स, टाटा मोटर्स DVR, हिंदाल्को, भारत फोर्ज ह्या कंपन्यांचे शेअर्स ट्रेड वॉरशी संबंधित आहेत.

२८ मे पासून MSCI निर्देशांकाच्या स्मॉल कॅप निर्देशांकात CHALET हॉटेल्स, TCNS क्लोदिंग, महाराष्ट्र स्कुटर्स,लिंडे इंडिया समाविष्ट होतील.

L &T इन्फोटेकने बँकिंग सॉफ्टवेअर सर्व्हिससाठी TEMENOS बरोबर करार केला.

ट्रायडंट ने एका शेअरचे १० शेअर्स मध्ये विभाजन केले.

हनीवेल ऑटोमेशन, पॉली कॅब, नाईल लिमिटेड यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक आले.

भारती एअरटेलने Rs ६४४ कोटींची बँक गॅरंटी द्यायची तयारी दाखवली. DOTआता TDSAT चा सल्ला घेऊन भारती एअरटेल आणी टाटा टेली महाराष्ट्र यांच्या मर्जरला मंजुरी देण्याची शक्यता आहे.

जेट एअरवेजच्या स्लॉटपैकी १०५ इंडिगोला तर स्पाईस जेटला १२५ स्लॉट मिळाले.

शारदा क्रॉपकेम, CYIENT,एडेलवाईस यांचे निकाल ठीक आले.

इंडियन बँक फायद्यातून तोट्यात गेली. NII वाढले. ग्रॉस NPA आणि नेट NPA थोड्या प्रमाणात कमी झाले. प्रोव्हिजन वाढली. प्रोव्हिजन कव्हरेज रेशियो ६५.७२ झाला. बँकेने १५.८% लोन ग्रोथ केली. बँकेला लॉस Rs १९० कोटी झाला.

UCO बँकेचे चौथ्या तिमाहीचे निकाल निराशाजनक आले. लॉस कमी झाला. NII वाढले. PCR ७४.९३ झाला. प्रोव्हिजन Rs २२४३ कोटी केली. NPA थोड्या प्रमाणात कमी झाले.

HDFC AMC आणि कोटक यांना सेबीने FMP (फिक्स्ड मॅच्युरिटी प्लान) चे पैसे वेळेवर दिले नाहीत म्हणून नोटीस पाठवली.

एप्रिल २०१९ साठी WPI ३.०७% होता (मार्चसाठी ३.१८ % होता.)

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७३१८ NSE निर्देशांक निफ्टी ११२२२ बँक निफ्टी २८८२९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.