आजचं मार्केट – १५ मे २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ८ – ९ June आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – १५ मे २०१९

आज क्रूड US $ ७०.७३ प्रती बॅरल ते US $७१.०९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७०.१९ ते US $१=Rs ७०.३४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.५० होता. VIX २८.६१ होते.

आज USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितले की USA ची अर्थव्यवस्था मजबूत आहे. USA ला चीनबरोबर चालू असलेल्या ट्रेड डील पासून फायदा होईल. फेडला रेट कट करण्याची आवश्यकता आहे असे मत व्यक्त केले.

आज सौदी अरेबियाच्या क्रूड वाहून नेणाऱ्या पाईप लाईनवर ड्रोनने हल्ले करण्यात आले. त्यामुळे १२०० किलोमीटर पाईप लाईन मधून पुरवठा बंद झाला. या वर्षात क्रूडची मागणी वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. USA, इराण, सौदी अरेबिया या सर्वांच्या क्रूड उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. या सहा महिन्यात क्रूड US $ ७० प्रती बॅरल ते US $ ७५ प्रती बॅरल असे राहील असा अंदाज वर्तवला जात आहे.

स्कायमेटने पाऊस सरासरीपेक्षा कमी आणि उशिरा सुरुवात होईल असा अंदाज व्यक्त केला. महाराष्ट्राच्या विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेशचे काही भाग यात पाऊस कमी पडेल. अंदमानमध्ये २२ मे २०१९ रोजी तर केरळामध्ये ४ जून २०१९ रोजी पाऊस पोहोचेल असे सांगितले. अल निनो च्या डेव्हलपमेंटमध्ये फारसा फरक नाही. त्यामुळे तपमान उष्ण राहील असा अंदाज व्यक्त केला.

वित्त मंत्रालयाने अंदाजपत्रक तयार करण्याच्या दृष्टीने पुढील आठवड्यापासून वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रांसाठी बैठका आयोजित केल्या आहेत. २९ मे २०१९ रोजी टेक्सटाईल, ३० मे २०१९ रोजी इन्शुअरन्स २३ मे २०१९ रोजी रिअल इस्टेट, २४ मे रोजी FICCI बरोबर, २२ मे २०१९ रोजी ऑटो, २७ मे २०१९ रोजी सिमेंट, २४ मे जेम्स अँड ज्युवेलरीज, ३ जून २०१९ रोजी पेपर उद्योगाबरोबर मीटिंग होतील.

जेट एअरवेजचे CEO विनय दुबे, CFO अमित अगरवाल आणि HRD चीफ राहुल तनेजा या टॉप मॅनेजमेन्टटीमने राजीनामा दिल्यामुळे आता जेट एअरवेजचे पुनरुज्जीवन लवकर होईल ही आशा मावळली.

गोव्याचे राज्य सरकार कॅसीनो चालवण्यावर गोवा राज्यात बंदी घालण्याची शक्यता आहे अशी बातमी आल्यामुळे डेल्टा कॉर्प हा शेअर पडला

नेस्ले या कंपनीचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. त्यांनी बरीच नवी प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये आणली. व्हाल्यूमही वाढत आहे.

HOECच्या नवीन फॅसिलिटीमध्ये कमर्शियल उत्पादन चालू झाले. कंपनीचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. ड्यूक ऑफशोअर आणि एन्ड्युअरन्स टेक्नॉलॉजि यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले.

पीडिलाइट या कंपनीचे सेल्स व्हॉल्युम कमी झाले. चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. कंपनीने गायडन्स चांगला दिला.
आरती ड्रग्स, वॉन्डरेला हॉलिडेज, डिशमन फार्मा, AB फॅशन, ज्युबीलण्ट फूड्स, यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

करून वैश्य बँकेचे PAT, NII, अन्य उत्पन्न वाढले. पण ग्रॉस NPA वाढले. बँकेची लोन ग्रोथ ८.४% झाली.
अमर राजा बॅटरी या कंपनीचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

युनियन बँक, झुआरी अग्रो, ल्युपिन यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक आले.

विनंती ओर्गानिक्स, PI इंडस्ट्रीज,आरती इंडस्ट्रीज , UPL या अग्रिकेमिकल्स उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये तेजी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टाटा केमिकल्सचा कन्झ्युमर व्यवसाय डीमर्ज करून टाटा ग्लोबल बिव्हरेजीस मध्ये मर्ज करण्याचा टाटा ग्रुप विचार करत आहे.

१६ मे २०१९ रोजी बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व, बँक ऑफ इंडिया,हिंदाल्को या कंपन्या

तर १७ मे २०१९ रोजी बजाज ऑटो, कॉर्पोरेशन बँक, DR रेड्डीज, इंजिनिअर्स इंडिया, PI इंडस्ट्रीज, शोभा, UPL या कंपन्या आपले चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७११४ NSE निर्देशांक निफ्टी १११५७ बँक निफ्टी २८६१६ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – १५ मे २०१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.