आजचं मार्केट – १६ मे २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ८ – ९ June आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – १६ मे २०१९

आज क्रूड US $ ७२.०७ प्रती बॅरल ते US $ ७२.३२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.०२ ते US $१=७०.२७ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.५३ तर VIX २९.०९ होता.

ट्रम्प यांनी आज असे जाहीर केले की USA मधील कंपन्यांनी आपला कच्चा माल तसेच स्पेअर पार्ट्स ज्या देशामधून होणाऱ्या आयातीवरची ड्युटी वाढवलेली नाही अशा देशातून आयात करावा. त्यांचा कटाक्ष ‘HUAWEI’ या मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक स्पेअर पार्ट्स बनवणाऱ्या कंपनीवर होता. ट्रम्प यांनी नॅशनल इमर्जन्सी जाहीर केली. चीनने असे जाहीर केले की जर USA ने ‘HUAWEI’ या कंपनीवर निर्बंध घातले तर USA आणि चीनमधील ट्रेड रिलेशन्स आणखी ताणली जातील.चीनने US$ १० बिलियनचे ट्रेझरी बॉण्ड्स विकले. युरोपमधून आयात होणाऱ्या कार्सवरील ड्युटीतील वाढ USA ६ महिने पूढे ढकलण्याचा विचार करणार आहे. त्यामुळे टाटा मोटर्स, टाटा मोटर्स DVR, मदर्सन सुमी हे शेअर्स वाढले.
एप्रिल २०१९ मध्ये भारताची निर्यात US $ २६.७ बिलियन ( ०.६४% वाढ) या चार महिन्याच्या किमान स्तरावर तर आयात सहा महिन्याच्या कमाल स्तरावर म्हणजे US $ ४१.४ बिलियन (४.४८% वाढ) होती. ट्रेड डेफिसिट US $ १५.३३ बिलियन होती. क्रूड आणि सोने ह्या दोन वस्तूंच्या आयातीत लक्षणीय वाढ झाली.

टाटा ग्रुपने टाटा केमिकल्समधून त्याची फूड डिव्हिजन ( यात मसाले, प्रोटीन फूड, टाटा सॉल्ट टाटा पल्सेस) अलग करून ती टाटा ग्लोबल बिव्हरेजीसमध्ये मर्ज केली नवीन कंपनीचे नाव टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स असेल. यामुळे टाटाचे सर्व चहा, मसाले, प्रोटीन फूड, टाटा सॉल्ट, टाटा पल्सेस, टाटा टी, टाटा संपन्न आणि टेटले हे कन्झ्युमर ब्रॅण्ड्स एका छताखाली येतील. यामुळे रेव्हेन्यू बेनिफिट, कॉस्ट रिडक्शन, सप्लाय चेन ऑपॉर्च्युनिटी, लॉजिस्टिक्स आदी फायदे होतील. टाटा केमिकल्सकडे आता केमिकल आणि फर्टिलायझर बिझिनेस राहतील.

नवी कंपनी टाटा केमिकल्स बरोबर सॉल्ट उत्पादनासाठी दीर्घ मुदतीचा करार करेल. पण या सॉल्टचे मार्केटिंग मात्र टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स करेल. टाटा सॉल्ट हा हाय मार्जिन बिझिनेस आहे या बिझिनेसच्या प्रॉफिट मधील बहुतांश हिस्सा टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सला मिळेल.

टाटा केमिकल्सच्या १शेअरला टाटा ग्लोबल बिव्हरेजीसचा १.१४ शेअर मिळेल. १०० टाटा केमिकल्सच्या शेअर्ससाठी टाटा ग्लोबल बिव्हरेजीसचे ११४ शेअर मिळतील.

गंगवाल आणि भाटिया या इंडिगोच्या दोन मुख्य प्रमोटर्समध्ये काही गंभीर मतभेद निर्माण झाले आहेत. दोन्हीही प्रमोटर्सनी आपल्या ऍडव्होकेटची नेमणूक हे मतभेद सोडवण्यासाठी केली आहे.परिणामी इंडिगोचा शेअर पडला इंडिगोच्या CEO ने कर्मचाऱ्यांना सांगितले आहे की कंपनीचे सर्व लक्ष प्रगती करण्यावर केंद्रित आहे प्रमोटर्स मधील मतभेदांचा कंपनीच्या कारभारावर परिणाम होणार नाही. या अचानक उद्भवलेल्या प्रसंगामुळे जेट एअरवेज बंद पडल्याचा फायदा इंडिगोला घेता येणार नाही.

DOT ने जून २०१९ पासून ‘वाय फाय हॉट स्पॉट इंटरपोर्टेबिलिटीला’ मंजुरी दिली. डॉटने या संबंधित काही अटींमध्ये बदल केले. DOT देशभरात डिसेंबर २०१९ पर्यंत १० लाख हॉट स्पॉट सेंटर. लावेल जर तुम्ही दुसऱ्या नेटवर्कचा उपयोग केला तर तुम्हाला त्याची माहिती द्यावी लागेल. डाटा रोमिंग लायसेन्सही यात सामील असेल. टेलिकॉम कंपन्यांच्या नेटवर्कवर पडणारा ताण या व्यवस्थेमुळे कमी होईल.

गेल ही कंपनी रायगढ़ मधील युनिटमध्ये Rs ८८०० कोटींची गुंतवणूक करणार आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यायची थकबाकी Rs १३२० कोटीवर पोहोचली आहे. ही थकबाकी साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली नाही म्हणुन महाराष्ट्र राज्य सरकारने २८ साखर कारखान्यांना नोटीस पाठवल्या आहेत. साखरेला योग्य भाव मिळत नसल्यामुळे ही थकबाकी परत करू शकत नाही असे साखर कारखान्यांचे म्हणणे आहे.

RBI ने R. K. गांधी यांना येस बँकेत डायरेक्टर म्हणून नॉमिनेट केले.

J & K बँक, मजेस्को,मॅग्मा फिनकॉर्प, DB कॉर्प ( Rs ८ प्रती शेअर लाभांश), सीमेक,KRBL, फिनिक्स मिल्स, P G इलेक्ट्रोप्लास्ट केसोराम इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स ( PAT उत्पन्न AUM ( ऍसेट अंडर मॅनेजमेंट) यांच्यात लक्षणीय वाढ, Rs ६ प्रती शेअर लाभांश) मिंडा इंडस्ट्रीज, या कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

JSW एनर्जी आणि तिजारिया पॉली या कंपन्या तोट्यातून फायद्यात आल्या.

पेट्रोनेट एलएनजी, महिंद्रा हॉलिडेज, हिंदाल्को, अरविंद फॅशन यांचे निकाल असमाधानकारक होते.

बँक ऑफ इंडियाचे (नवीन स्लीपेजिस कमी, NII मध्ये वाढ, NPA मध्ये नगण्य घट, NIM ३.३८) चौथ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक म्हणावे लागतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७३९३ NSE निर्देशांक निफ्टी ११२५७ बँक निफ्टी २८८५५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.