आजचं मार्केट – १७ मे २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ८ – ९ June आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – १७ मे २०१९

आज क्रूड US $ ७२.४८ प्रती बॅरल ते US $ ७३.०४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.०३ ते US $१=Rs ७०.२६ या दरम्यान होत. US $निर्देशांक ९७.८३ तर VIX २८.६३ होते.

क्रूडचे दर वाढत आहेत. सौदी अरेबियाच्या क्रूड वाहून नेणाऱ्या पाईप लाईनवर ड्रोनच्या सहाय्याने हल्ला झाल्यापासून मध्यपूर्वेतील देशात तणाव वाढला आहे.क्रूडच्या लढाईत सीरिया, लिबिया, इराक, इराण, सौदी अरेबिया या सर्व देशांना पुढे करून रशिया आपली खेळी करत आहे. चीनच्या पाठीमागे राहून USA वर दबाव आणत आहे. याचा फायदा ड्यूक ऑफशोअर, ऑइल कंपनी टॅब्यूलर, डॉल्फिन ऑफशोअर या कंपन्यांना होईल

आज मार्केटने विदेशी संकेतांकडे दुर्लक्ष केले आणि पुढील आठवड्यात येणारे एक्झिट पोल आणी निवडणुकांचे निकाल याकडे लक्ष वेधले. निकालांचा अंदाज येत नसल्यामुळे शॉर्ट पोझिशन्स कव्हर केल्या असे जाणवले. एक्झिट पोल च्या आधी बुल्सनी जोरदार मुसंडी मारून बेअर्सना एक्झिटचा रस्ता दाखवला.

निफ्टीच्या डेली चार्टमध्ये काल हरामी पॅटर्न तयार झाला होता त्यानुसार आज तेजी होती.गेले काही दिवस मार्केट १०० DMA चा सपोर्ट घेत होते. आता यानंतर ५० DMA चा रेझिस्टन्स ११४७० वर आहे. तर आज साप्ताहिक पॅटर्नमध्ये .हॅमर पॅटर्न तयार झाला. यामुळे मार्केटमधील तेजी एक दोन दिवस सुरु राहील असे वाटते.

ज्या NBFC चे ऍसेट्स Rs ५००० कोटीपेक्षा जास्त आहेत त्या NBFC ना आता चीफ रिस्क ऑफिसरची नेमणूक करावी लागेल.

नितीन चुग यांना उज्जीवनचे MD आणि CEO म्हणून तीन वर्षांकरता नेमण्यात आले.

M T EDUCARE चे प्रमोटर्स OFS च्या रुटने आपला ७.७% स्टेक विकणार आहेत. या OFS ची फ्लोअर प्राईस Rs ७६ असेल.

ऍक्शन कन्स्ट्रक्शन Rs १२५ प्रती शेअर या भावाने शेअर BUY बॅक करणार आहे.

PNB आपला PNB हौसिंग मधील स्टेक

जनरल अटलांटिक आणि VAARDE पार्टनर्स यांना Rs ८५० प्रती शेअर्स या भावाने विकणार होती. पण मार्केटमधील मंदीचा प्रभाव लक्षात घेऊन PNB ने हा करार रद्द झाला आहे असे जाहीर केले.

NCLAT ने JP इंफ्राच्या कर्ज देणाऱ्या संस्थाचे वोटिंग पुन्हा घेण्यास सांगितले.

गोदरेज इंडस्ट्रीजकडून ‘नेचर्स बास्केट’ स्पेन्सर्स रिटेल खरेदी करेल. हा व्यवहार ६० दिवसात पूर्ण केला जाईल.

CESC, DR रेड्डीज, अजमेरा रिअल्टीज, विंध्या टेलिलिंक्स, IOC ( PAT १७% वाढले) युनिव्हर्सल केबल, प्राज इंडस्ट्रीज, GIPCL, किर्लोस्कर इंडस्ट्रीज, CLARIANT केमिकल्स, ग्रोअर अँड वेल, सिटी युनियन बँक यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

UPL चे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. कंपनीने Rs ८ प्रती शेअर लाभांश दिला. कंपनीने तुमच्याजवळ २ शेअर्स असतील तर १ शेअर बोनस म्हणून देण्याचे जाहीर केले.

बजाज ऑटोचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. चौथ्या तिमाहीमध्ये २१% PAT वाढले. Rs ३४२ कोटी इतर उत्पन्न ( २००७ ते २०१४ या दरम्यान पेड केलेली ड्युटी परत मिळाली.) झाले. कंपनीने Rs ६० प्रति शेअर लाभांश जाहीर केला.
अरविंद, CESC व्हेंचर्स यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

JTEKT या कंपनीचे चौथ्या तिमाहीचे निकाल ठीक होते.

रिलायन्स निपॉन लाईफ ऍसेट मॅनेजमेंट JV मध्ये रिलायन्स कॅपिटल आणि NIPPON लाईफ ASSET मॅनेजमेंट यांचा प्रत्येकी ४२.८८% स्टेक आहे.रिलायन्स कॅपिटलचा २७% स्टेक Rs ४५०० कोटींना NIPPON खरेदी करेल सध्या त्यांचा स्टेक ४३% आहे तो आता ७०% पर्यंत वाढेल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७९३० NSE निर्देशांक निफ्टी ११४०७ तर बँक निफ्टी २९४५० वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – १७ मे २०१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.