आजचं मार्केट – २० मे २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ८ – ९ June आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – २० मे २०१९

आज क्रूड US $ ७२.६२ प्रती बॅरल ते US $ ७३.०७ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.४७ ते US $१=Rs ६९.६२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८ तर VIX २१ होता.

आज ऐतिहासिक दिवस होता. गेल्या १० वर्षांमध्ये आजच्या एवढी तेजी झाली नव्हती.आज बँक निफ्टी १३०० पाईंट तर सेन्सेक्स १४०० पाईंट वाढला. निफ्टीच्या रेकॉर्ड हायच्या जवळ पुन्हा एकदा निफ्टी पोहोचला. आजच्या मार्केटचा हुकमी एक्का होता स्टेट बँक ऑफ इंडिया. विदेशी संकेत विसरून जाऊन ट्रेडर्स मैदानात उतरले होते. ५० बेस पाईंट रेट कट होईल असाही मार्केटने अंदाज केला. गेले १०-१२ दिवस मार्केट निराशेच्या गर्तेत होते.काही तुरळक अपवाद वगळता चौथ्या तिमाहीचे निकाल फारसे चांगले आले नव्हते. त्यामुळे शॉर्ट पोझिशनमध्ये ट्रेडर्स पैसा कमवत होते. आज मार्केट मोठ्या गॅपने उघडले आणि ते टिकून राहिले. म्हणून ट्रेडर्सना शॉर्ट पोझिशन्स क्लोज कराव्या लागल्या. दिवस अखेरपर्यंत मार्केट वाढतच राहिले. आलेला प्रत्येक तज्ज्ञ आणि विश्लेषक २००४च्या भारतातील निवडणुकांचे आणी ऑस्ट्रेलियाचे उदाहरण देऊन सावध करण्याचा प्रयत्न करत होते. एक्झिट पोल एक्झॅट असतील असे नाही असे समजावत होते. पण ट्रेडर्स ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.

चीन आणि USA यांच्यातील बोलणी काही काळापुरती थांबतील. आज रुपया मजबूत झाला. आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे.रुपया US $१=Rs ६८ ते US $१=Rs ७१ या रेंजमध्ये राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे IT सेक्टर मंदीत होता. फार्मा सेक्टरही मंदीत होता. ज्या शेअर्समध्ये भरपूर शॉर्ट होते. त्या शेअर्समध्ये शॉर्ट कव्हरिंगची रॅली आली. फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्सने पेटंट नियमांचे उल्लंघन केले म्हणून आयशर मोटर्सवर खटला दाखल केला.

DR रेड्डीजचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. रेव्हेन्यू, ऑपरेटिंग मार्जिन यामध्ये चांगली वाढ झाली. कंपनीने आपल्या कॉमेंटमध्ये असे सांगितले की COPEXON हे औषध २०२० मध्ये लाँच होण्याची शक्यता नाही. तसेच SUBEXON या औषधाच्या बाबतीत स्पर्धा वाढत आहे. तसेच कंपनीवर बरेच खटले दाखल केले आहेत. या सर्व कॉमेंटमुळे DR रेड्डीजचा शेअर तेजीच्या मार्केटमध्ये खाली आला.

सिप्लाच्या इंदोर युनिटच्या USFDA ने केलेल्या तपासणीत कोणतीही त्रुटी आढळली नाही. मुकुंद फायद्यातून तोट्यात आली.. शोभा, EIL, किर्लोस्कर ऑइल, गोकुळदास एक्स्पोर्ट, ITI, कल्याणी स्टील, JK सिमेंट, पुर्वांकारा, हिंद रेक्टिफायर्स, APL अपोलो, PI इंडस्ट्रीज, VRL लॉजिस्टिक्स, श्री सिमेंट, किटेक्स गारमेंट्स, भारत फोर्ज, GSK फार्मा (Rs २० प्रती शेअर लाभांश),राजश्री शुगर, HEG ( नफा कमी,Rs ५० प्रती शेअर लाभांश), झी लर्न, HPCL ( प्रॉफिट, मार्जिन वाढले) यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

खादीम, ज्युबिलण्ट लाईफ, थायरोकेअर, बाळकृष्ण इंडस्ट्रीज, टी व्ही टुडे यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

टाटा मोटर्स चे चौथ्या तिमाहीचे निकाल आले. नफा ४७% ने कमी म्हणजे Rs १११७ कोटी झाला.

नवीन सरकार स्थापन झाल्यावर सिमेंटवरील GST चे दर घटतील असा अंदाज असल्यामुळे सिमेंटचे शेअर्स वाढले.
उद्या परवा दोन्हीही दिवस शॉर्ट पोझिशन्स कव्हर होतच राहतील पण आपण नुसते बघत बसू नये किंवा एवढ्या तेजीच्या मार्केटमध्ये खरेदीही करू नये प्रॉफिट बुकिंग करून ५०%ते ६०% कॅशमध्ये रहावे. शपथविधी एक्स्पायरी सर्व उरकल्यानंतर संधी मिळेल त्याप्रमाणे खरेदी करावी. आता बहुतेक स्मॉल कॅप आणि मिडकॅप मध्ये खरेदी सुरु होईल असा अंदाज आहे.लार्ज कॅपच्या मानाने मिडकॅप शेअर्स खूपच स्वस्तात उपलब्ध आहेत. सिमेंट आणि इन्फ्रा शेअर्स मध्येही तेजी येईल असे वाटते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९३५२ NSE निर्देशांक निफ्टी ११८२८ बँक निफ्टी ३०७५८ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.