आजचं मार्केट – २१ मे २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ८ – ९ June आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – २१ मे २०१९

आज क्रूड US $ ७१.८१ प्रती बॅरल ते US $ ७२.२७ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.६८ ते US $१=Rs ६९.७४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.१० VIX २५.३४ होते. OPEC ची जी बैठक जून २०१९ मध्ये होणार होती ती आता जुलै २०१९ मध्ये होईल. इराण आणि USA यांच्यातील तणाव वाढत आहे.

कालच्या मार्केटचे आकडे समाधानकारक आले. इंडेक्स फ्युचर, स्टॉक फ्युचर सगळीकडे FII आणि DII ची खरेदी दिसलीये. ग्रोथ आणि रिफॉर्म पुन्हा सुरु होतील. अर्थव्यवस्थेला स्थैर्य येईल. या अपेक्षेने भरभरून खरेदी दिसली. यामुळे मार्केट आरामात (निफ्टी) १२०००च्या वर जाईल पण प्रत्येकांनी आपापले स्टॉप लॉस आणि टारगेट पाहावे.कारण एक्झिट पोलमध्ये NDA ला ३०० जागा मिळतील असा अंदाज व्यक्त झाला आहे. निकालाच्या दिवशीपर्यंत आणि नंतरही मार्केट सतत वाढत राहील अशी अपेक्षा करु नका. रिस्क रिवॉर्ड रेशियो अनुकूल नाही. निकालांचे वास्तव समजल्यावर कदाचित मार्केट ज्या वेगाने वाढले त्याच वेगाने खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. काल व्हर्टिकल मूव्ह आली आहे. प्रॉफिट बुकिंग करा. ट्रेलिन्ग स्टॉप लॉसचा वापर करा. म्हणजे नंतर हळहळायची वेळ यायला नको.

मार्केटने आज निफ्टी ११८८३ तर बँक निफ्टीने ३०९२६ आणि सेन्सेक्सने ३९५७१ चे इंट्राडे हाय साध्य केल्यावर प्रॉफिट बुकिंग चालू झाले.आणि सरतेशेवटी मार्केट ४०० पाईंट (सेन्सेक्स)पडले. तांत्रिक दृष्ट्या ‘डार्क क्लाउड कव्हर’ डेली चार्टमध्ये फॉर्म झाला. परंतु हायर हाय हायर लो हा पॅटर्न पाचव्या दिवशी सुद्धा सुरु राहिला. ट्रेडर्सना फार मोठ्या चढउताराला सामोरे जावे लागेल.

टाटा मोटर्स खरेदी करताना आर्थीक, राजकीय, तंत्रज्ञानाविषयी असे सर्व प्रकारचे धोके लक्षात घेऊन मगच खरेदी करावी.
युनायटेड ब्रुअरीजचे चौथ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते. उन्हाळा आहे शिवाय निवडणुका चालू आहेत अशा काळात निकाल खराब आले याचे आश्चर्य वाटते. पण निवडणुकांचे वातावरण तापायला एप्रिलपासून सूरूवात झाली. त्यामुळे निवडणुका आणि उन्हाळा यामुळे झालेल्या विक्रीचा परिणाम २०१९- २०२० च्या पहिल्या तिमाहीत दिसेल असा अंदाज आहे. म्हणून सुरुवातीला शेअर पडला आणि नंतर चांगलाच सावरला.

HDFC ग्रूपने आज मार्केट कॅपच्या बाबतीत टाटा ग्रुपला मागे टाकले. HDFC ग्रुपची मार्केट कॅप ११.५० लाख कोटी झाली. HDFC बँकेची मार्केट कॅप ६.६५ लाख कोटींवर पोहोचली.

गेलच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरची बोनसवर विचार करण्यासाठी २७ मे २०१९ रोजी बैठक आहे. . गेलच्या चौथ्या तिमाहीचे निकाल २७ मे २०१९ रोजी जाहीर होतील.

आरती इंडस्ट्रीजच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बोनस, लाभांशवर विचार करण्यासाठी २१ मे रोजी बैठक आहे.
अडाणी ग्रीनचा OFS येत आहे. आजपासून उघडला. फ्लोअर प्राईस Rs ४३ आहे. उद्या रिटेल गुंतवणूकदारांसाठी ओपन होईल.

ज्योती लॅबच्या प्रमोटर्सनी ७१.२० लाख शेअर्स (४.८% स्टेक) १३ मे ते १५ मे २०१९ या कालावधीत तारण ठेवले.
थायरोकेअर ही कंपनी न्यूक्लिअर हेल्थ ह्या कंपनीला Rs १९५ कोटींना विकत घेण्याचा विचार करत आहे. DR रेड्डीज R &D वरील खर्च वाढवणार आहे असे समजताच शेअर वाढायला सुरुवात झाली.

PNB येत्या तीन महिन्यात OBC, आंध्र आणि अलाहाबाद या तीन बँकांचे अधिग्रहण करण्याची शक्यता आहे.

मारुतीच्या बाबतीत डीलर डिस्काउंट नियमांचे उल्लंघन झाले म्हणून CCI चौकशी करण्याची शक्यता आहे.

नाल्कोची डिव्हिडंड हिस्टरी चांगली आहे. हा शेअर Rs ४५ ते Rs ५५ या रेंज मध्ये आहे कंपनी सुमारे Rs ५ लाभांश जाहीर करते. त्यामुळे लाभांश १०% मिळतो.

टेक महिंद्राचे चौथ्या तिमाहीसाठी नफा Rs ११३० कोटी, उत्पन्न Rs ८८९२ कोटी आणी मार्जिन १५.४% राहिले. कंपनीने Rs १४ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

कसिनोजवर GST लावण्याच्या सरकारच्या धोरणात नरमाई येत आहे . लायसेन्स फीवर आता GST लागणार नाही. कसिनोजनी Rs ६००० कोटी GST भरण्यात डिफाल्ट केला असा आरोप आहे. गोवा राज्यात एकूण १६ कसिनोज आहेत.याचा परिणाम डेल्टा कॉर्प या शेअरवर होत आहे.

अल्कली अमाईन्स ( उत्पन्न, वाढले PAT कमी झाले. Rs ८ प्रती शेअर लाभांश) HPCL, BPCL, HPL इलेक्ट्रिकल, टाटा मोटर्स DVR, टाटा मोटर्स, टॉरंट फार्मा, दालमिया भारत शुगर, धामपूर शुगर ( तोट्यातून फायद्यात) यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

सेंचुरी इंका ( Rs ७ लाभांश) धनुका ऍग्री टेक, UFO मुव्हीज ( Rs १५ स्पेशल आणि Rs १२.५० इंटरीम लाभांश) ASTRAL पॉली यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

अमूलने दुधाच्या किमती Rs २ प्रती लिटरने वाढवल्या. त्यामुळे हळूहळू बाकीच्या कंपन्याही दुधाचे भाव वाढवतील असा अंदाज आहे. उदा :- पराग, नेस्ले

५ जून २०१९ रोजी सलमान खानचा ‘भारत’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. त्यामुळे PVR इनॉक्स लिजर या शेअर्सकडे लक्ष ठेवा.

NBFC साठी लिक्विडीटी पुरवण्यासाठी स्पेशल बॉरोइंग विंडो उघडली जाणार आहे. याचा फायदा LIC हौसिंग इंडिया बुल्स हौसिंग यांना होईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८९६९ NSE निर्देशांक निफ्टी ११७०९ आणि बँक निफ्टी ३०३०८ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.