आजचं मार्केट – २२ मे २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ८ – ९ June आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – २२ मे २०१९

आज क्रूड US $ ७१.३६ प्रती बॅरल आणि US $७२.३६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.६२ ते US $१= Rs ६९.७५ या दरम्यान होते. US $निर्देशांक ९८.०५ VIX ३० होता.

USA मधेही ज्या कंपन्यांचे चीन बरोबर व्यवहार करतात त्यांनी सांगितले की ट्रेड वॉर मुळे आमचे उत्पन्न आणि नफा यावर प्रतिकूल परिणाम होतो आहे . USA ने HUWEI या कंपनीला ९० दिवसांची मुदत वाढ दिली. आता USA मध्ये रेट वाढवण्यासाठी अनुकूल परिस्थिती नाही. त्यामुळे फेड रेट कट करेल अशी अपेक्षा आहे.

IFCI ने लोन आणि इन्व्हेस्टमेंट वाढवून दाखवले असे ऑडिटरचे म्हणणे आहे. Rs २८६.१७ एवढा तोटा दाखवला आहे. तो वास्तवात Rs ४८६ कोटी दाखवायला पाहिजे होता.

२९ मे २०१९ रोजी नवभारत व्हेंचर्सच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची शेअर BUYBACK विचार करण्यासाठी बैठक आहे
HDFC बँकेने आपल्या १ शेअरचे २ शेअर्समध्ये विभाजनाला मंजुरी मिळाली.

फ्युचर कंझ्युमर्स ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली. टर्न अर्राउंड झाली.

FDCच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची शेअर BUYBACK साठी २४ मे रोजी बैठक आहे

सेबीने म्युच्युअल फंडांना कमोडिटीमार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी काही अटींवर परवानगी दिली.

इंडस इंड बँकेचा चौथ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते. Rs ७.५० लाभांश जाहीर केला इंडसइंड बँकेचा निकाल खराब येईल याची मार्केटला कल्पना होती. त्यामुळे किंमत कमी झाली होती. पण बँकेच्या व्यवस्थापनाने आम्ही IL &FS च्या एक्स्पोजरसाठी पूर्ण प्रोव्हिजन केली आहे असे सांगितल्यावर शेअर वाढू लागला.

सिप्ला, टिमकीन, DLF क्रॉम्प्टन कन्झ्युमर, मुक्ता आर्ट्स ( तोट्यातून फायद्यात आली) JB केमिकल्स, ANSAL, आरती इंडस्ट्रीज ( बोनस देण्यावर बोर्ड मीटिंगने विचार केला नाही), BPL, KEI इंडस्ट्रीज, त्रिवेणी इंजिनीअरिंग, (तोट्यातून फायद्यात आली) सूर्या रोशनी, MOIL ,कप्लिन, शोभा, गोदरेज,राणे ब्रेक्स( Rs ९ लाभांश दिला) . या कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

JSPL, BOSCH (Rs १०५ लाभांश) टेक महिंद्रा याचे चौथ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

बँक ऑफ बरोडा चे NPA कमी झाले. बँकेने Rs ९९१ कोटी तोटा चौथ्या तिमाहीत केला

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९११०.NSE निर्देशांक निफ्टी ११७३७ बँक निफ्टी ३०५२६ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.