आजचं मार्केट – २३ मे २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ८ – ९ June आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – २३ मे २०१९

आज क्रूड US $ ६९.१८ प्रती बॅरल ते US $ ७०.९७ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=६९.४४ ते US $१= Rs ७० या दरम्यान, US $ निर्देशांक ९८.२० आणि VIX २७.६३ होता.

नाम, नेता, नीती, नियत,मेहनत,भारतीय संस्कृती,चरित्र,नेतृत्व यांचे दर्शन निवडणूक निकालात दिसले. पण एक वेगळेच दर्शन चतुराईचे, हुशारीचे मार्केटने दिले. भावना आणि वास्तव यांचे दर्शन दिले. ज्यावेळी सेन्सेक्सनी ४०००० आणि निफ्टीने १२००० ची पातळी ओलांडली त्यावेळी P /E रेशियो २९ पट झाला

मार्केटचा करंट ऍव्हरेज P /E रेशियो (निफ्टी) हा अर्निंगच्या २० ते २५ पट असतो. पण हा P /E रेशियो २९ पट झाला. मार्केट महाग झाले. मार्केटमधील लिस्टेड कंपन्यांची मिळकत आणि सेन्सेक्स , निफ्टी मधील वाढ यातील विसंगती ध्यानात येताक्षणी मार्केटने वास्तववादी भूमिका घेतली. सर्व तेजी जवळजवळ नाहीशी झाली स्वप्नात जगू नये ‘भाव भगवान है मार्केट होशियार है’ हा संदेश दिला. भावनेमध्ये भरकटू नये हे मार्केटने समजावले.दिवस संपताना मार्केट ३००पाईंट (सेन्सेक्स) डाऊन होते. मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर अर्थमंत्री कोण होईल ? आणि सरकारच्या धोरणात काय बदल होतील हे पाहून पुढील निर्णय घेता येईल असा कल जाणवला.

रिलायन्स कॅपिटल म्युच्युअल फंड व्यवसायातून बाहेर पडला. त्यांचा स्टेक त्यांनी रिलायन्स

निपॉनला ठरल्याप्रमाणे विकला. आता रिलायन्स निपॉनचे रेटिंग अपग्रेड होईल असे वाटल्यामुळे शेअर तेजीत होता.

टाटा ग्रुप विदेशी मार्केटमधून Rs १४००० कोटी गोळा करून टाटा स्टील आणि इतर कंपन्यांमध्ये गुंतवणार आहे.

६ जून २०१९ रोजी RBI मॉनेटरी स्टिम्युलस देईल. नंतर जे सरकार येईल ते फिस्कल स्टिम्युलस देईल. RBI ०.५०% रेट कट करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सिमेंट कंपन्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास त्यांची प्रॉडक्शन कॉस्ट वाढली नाही पण किमती वाढल्या आहेत. उत्पादन क्षमता वाढवत आहेत. त्यामुळे बॉटमलाईनमध्ये फरक पडेल.सिमेंटवरील GST कमी होण्याची शक्यता आहे. हौसिंग फॉर ALL आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सरकारची गुंतवणूक यामुळे सिमेंट उद्योगाला चांगले दिवस येतील असे वाटते.

थरमॅक्स ज्या नव्या क्षेत्रात काम करत आहे उदा. वॉटर मॅनेजमेंट, पोल्युशन कंट्रोल यामुळे मार्जिन कमी झाले. पण मार्जिन सुधारेल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८८११ NSE निर्देशांक निफ्टी ११६५७ बँक निफ्टी ३०४०९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.