आजचं मार्केट – २४ मे २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ८ – ९ June आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – २४ मे २०१९

आज ब्रेंट क्रूड US $ ६७.९२ प्रती बॅरल ते US $ ६८.९५ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.४४ ते ६९.७४ या दरम्यान तर US $ निर्देशांक ९७.७४ होता. VIX १६.४६ होते.

युरोप जर्मनी आणि जपानचा इकॉनॉमिक डाटा खराब आला. ग्रोथ कमी होत आहे. क्रूडचा भाव कमी झाला आहे क्रूड US $ ६८.२५ प्रती बॅरल होते. क्रूडसाठी मागणी कमी होत आहे. क्रूडच्या दरातील नरमीमुळे विमानाचे इंधन स्वस्त होईल. स्पाईस जेटचा लोड फॅक्टर ९८% झाला आहे.

मोदींवरील बायोपिक आज रिलीज होणार आहे. वेब सिरीज सुद्धा सुरु होणार आहे. याचा फायदा इनॉक्स, इरॉस, मुक्ता आर्ट्स यांना झाला.

SPIC, ECLERK, अमृतांजन, कनोरिया या कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

पंजाब आणि सिंध बँकेचा तोटा कमी झाला.

सन टी व्हीचे चौथ्या तिमाहीचे निकाल ठीक आले.

GIC हाऊसिंगचे चौथ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते. कंपनीने Rs ६.७५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
अशोक लेलँडने Rs ३.१० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

RBI Rs १५००० कोटींच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ओपन मार्केट ऑपरेशनच्या माध्यमातून १३ जून २०१९ रोजी खरेदी करणार आहे.

मिडकॅप रॅली येईल अशी चिन्हे दिसत आहेत. कारण मिडकॅप निर्देशांकात गोल्डन क्रॉस फॉर्मेशन दिसत आहे. ५० डे मूव्हिंग ऍव्हरेज हे २०० DMA ला वरच्या दिशेने छेदत आहे. मिडकॅपचे व्हॅल्युएशन खूपच स्वस्त आहे. म्युच्युअल फंड कॅशमध्ये बसून आहेत.

लार्ज कॅपचे व्हॅल्युएशन रिच आहे त्यामानाने अर्निंग्ज तेवढी चांगली नाहीत. चांगले मिडकॅप शेअर्स शोधून गुंतवणूक केल्यास रिस्क रिवॉर्ड रेशियो चांगला मिळेल. जे मिडकॅप्स काही कालावधीनी लार्जकॅप मध्ये रुपांतरीत होतील अशा मिडकॅप्स मध्ये गुंतवणूक करावी.

BJP ला स्वतःचे पूर्ण बहुमत मिळाले आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला विकासाचा कार्यक्रम पुढे नेऊ शकतील. यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर, रिअल्टी, ऑटो, शेती आणि त्याला जोडलेले उद्योग, सिमेंट क्षेत्र, पेंट इंडस्ट्रीज यांची मागणी वाढेल. एशियन पेंट्स, कन्साई नेरोलॅक, बर्जर पेंट्स, एप्कोटेक्स या कंपन्यांवर लक्ष ठेवावे.

३० मे २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी होईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९४३४ NSE निर्देशांक निफ्टी ११८४४ वर बँक निफ्टी ३१२१२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

3 thoughts on “आजचं मार्केट – २४ मे २०१९

 1. Suhas Patwardhan

  So nice information…
  Pl.give me your personal mobile no.
  Suhas Patwardhan
  Pune
  9689930390

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.