आजचं मार्केट – २८ मे २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ८ – ९ June आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – २८ मे २०१९

आज क्रूड US $ ६९.६९ प्रती बॅरल ते US $ ७०.५९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.६१ ते US $ १=Rs ६९.७८ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.७७ तर VIX १५.३८ होता.

चीनची कंपनी ‘HIKVISION’ या कंपनीवर USA ने बॅन लावला. अलीबाबा चीनमध्ये लिस्टिंग करणार आहे.
जपानच्या निवडणुकांनंतर USA जपानबरोबर करार करेल.

पूर्वी असे होत असे की की शेवटी शेवटी ज्या कंपन्यांचे निकाल येत ते खराब असत. पण या वेळी छोट्या कंपन्यांचे निकाल चांगले येत आहेत. आज VIX खाली होता. त्यामुळे ट्रेडर्स ‘बाय ऑन डिप्स’ स्ट्रॅटेजीचा अवलंब करत आहेत असे वाटते.

नवीन सरकार स्थापन झाल्यावर आपले धोरणात्मक निर्णय जाहीर करेल. यात इलेक्ट्रॉनिक, फूड प्रोसेसिंग, केमिकल या उद्योगांसाठी टॅक्स इन्सेन्टिव्ह, इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स, GST यात सूट यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक :- मर्क, HBL पॉवर, BPL, TVS इलेक्ट्रॉनिक्स, फूड प्रोसेसिंग :- फूडइन्स, वेंकी’ज, हॅरिसन मलयाळम, केमीकल :- कनोरिया केमिकल्स, थिरुमलाय, हिमाद्री, नोसिल, मंगलोर, JB केमिकल्स

४ जूनला होणाऱ्या आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मीटिंगमध्ये अडानी पोर्ट ‘शेअर बाय बॅक’ आणि लाभांशावर विचार करेल.

रिलायन्स कॅपिटल आपला ‘९२ FM’ रेडियो व्यवसाय Rs १२०० कोटींना विकणार आहे.

NHPC , DCM श्रीराम ( कंपनी तोट्यातून फायद्यात आली.), कामत हॉटेल्स, प्रिसिजन कॅमशाफ्ट,स्पाईस जेट यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

इन्फो एज, ऑइल इंडिया, PNB,सन फार्मा यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

क्रिसिलचे म्हणणे आहे की कर्मचारी वेतन, व्हिसा याचा खर्च USA मधील स्थानिक लोकांना नोकरीवर ठेवल्यास २५% ते ३०% वाढेल.त्यामुळे IT कंपन्यांच्या मार्जिनवर परिणाम होईल.

USA मध्ये निवडणुका असल्यामुळे यात काही तडजोड होईल असे वाटत नाही.

येस बँक ऍसेट मॅनेजमेंटच्या बिझिनेसमधून बाहेर पडणार आहे अशी बातमी असल्यामुळे येस बँकेचा शेअर वाढला होता. बँकेने या बातमीचे खंडन केले.

MHA ने DHFL च्या प्रमोटर्स ना शेल कंपन्यांच्या संदर्भात नोटीस पाठवली. त्यामुळे हा शेअर पडला.

आज निफ्टीमध्ये ‘हँगिंग मॅन’ पॅटर्न तयार झाला. हा पॅटर्न बुल्सना थकवा आला आहे, तेजीचा जोर शॉर्ट टर्म मध्ये कमी होईल असे दर्शवतो. मार्केटमध्ये उत्साह नव्हता हे याचेच द्योतक आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९७४९ NSE निर्देशांक निफ्टी ११९२४ बँक निफ्टी ३१५९७ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.