आजचं मार्केट – २९ मे २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ८ – ९ June आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – २९ मे २०१९

आज क्रूड US $ ६९.२७ प्रती बॅरल US $ ६९.५६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.७३ ते US $१=Rs ६९.९६ या दरम्यान होता. US $ निर्देशांक ९८.०१ होता.  जागतिक पातळीवरची अनिश्चितता संपलेली नाही. चीन अर्थव्यवस्थेमध्ये पैसा इन्फयुज करणार आहे. आणि भारतात निवडणुकांचे निकाल लागले आता पुढे काय ? हा प्रश्न आहे.

मंत्रिमंडळात कोणाचा समावेश होणार आणि विशेषतः अर्थमंत्री कोण होणार याबद्दल WHATSAPP विद्यापीठातून अनेक अंदाज बाहेर पडत आहेत. अरुण जेटलींनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे माझा मंत्रिमंडळात समावेश करू नका असे पत्र पंतप्रधानांना पाठवले आहे. जेटलींनी गेल्या पांच वर्षात संकटमोचन (FIREFIGHTER) स्तरावर काम केले. या त्याच्या पत्रामुळे मार्केट मात्र पडले. हीच अनिश्चितता आज तयार झालेला कँडल स्टिक पॅटर्न ‘स्पिनिंग टॉप’ दर्शवतो. मार्केटच्या दृष्टीने या वर्षी कृषी मंत्रालय महत्वाचे ठरणार आहे. कारण शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे ध्येय सरकारने ठेवले आहे.मार्केटला अनिश्चितता आवडत नाही आणि सध्याचा रिस्क रिवॉर्ड रेशियो बेअर्सच्या बाबतीत अनुकूल आहे. यामुळे आज मार्केट पडले.

या वर्षी जसे शुगर आणि पेपर सेक्टरमधील कंपन्यांचे निकाल चांगले आले त्याप्रमाणे GST मुळे लॉजिस्टिक कंपन्यांचे निकाल चांगले आले. लॉजिस्टिक कंपन्या तेजीत होत्या. उदा :- गती, AIEGES, महिंद्रा लॉजिस्टिक्स, अलकार्गो, स्नोमॅन, VRL, SIKAL, फ्युचर सप्लाय चेन, पटेल इंटिग्रेटेड, TCI एक्स्प्रेस.

BALMER LAWRIE, मार्कसन्स फार्मा या कंपन्या तोट्यातून फायद्यात आल्या.

NMDC, CME, PFC, राईट्स( PAT उत्पन्न वाढले, Rs ४ अंतिम लाभांश), इप्का लॅब्स ( PAT, उत्पन्न वाढले, Rs ३ अंतिम लाभांश) V -गार्ड इंडस्ट्रीज (पॅट, उत्पन्न वाढले Rs ०.८० अंतिम लाभांश) महिंद्रा आणि महिंद्रा (PAT, उत्पन्न, ऑपरेटिंग मार्जिन वाढले, कंपनीच्या MVML बरोबर मर्जरला मंजुरी मिळाली), कॅडीला हेल्थकेअर (PAT, उत्पन्न, मार्जिन वाढले, Rs ३.५० अंतिम लाभांश) अडानी एंटरप्रायझेस (PAT उत्पन्न वाढले. Rs १६१ कोटींचा ONE TIME लॉस ), हॅवेल्स ( मार्जिन, PAT मध्ये घट, उत्पन्न वाढले, Rs ४.५० अंतिम लाभांश) फिनोलेक्स ( Rs ४.५० अंतिम लाभांश) या कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

अडानी पॉवरचा (तोटा Rs ६५३ कोटी होता तो आता Rs ६३५ कोटी फायदा झाला.Rs ७४० कोटी टॅक्स क्रेडिट आले) रजतकुमारनी राजीनामा दिला. सुरेश जैन नवीन CFO झाले.

महाराष्ट्र सीमलेस ही कंपनी ONE टाइम लॉस Rs १४६ कोटींमुळे फायद्यातून तोट्यात आली.

इंडोको रेमेडीजचे निकाल असमाधानकारक होते.

PNB हौसिंग, MPHASIS आणि L &T इन्फोटेक F &O मध्ये सामील होणार नाहीत.

DHFL च्या SRA प्रोग्राममध्ये वेलस्पन ग्रुप स्टेक घेणार आहे. म्हणून DHFL चा शेअर वाढला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९५०२, NSE निर्देशांक निफ्टी ११८६१ बँक निफ्टी ३१२९५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – २९ मे २०१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.