Monthly Archives: June 2019

आजचं मार्केट – २८ जून २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २८ जून २०१९

आज क्रूड US $ ६६.०८ प्रती बॅरल ते US $ ६६.३० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६८.९० ते US $१=Rs ६९.०० या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.२२ होता.

सध्या ११६२५ ते ११९०० अशा रेंजमध्ये मार्केट आहे. ११९११ या स्विंग हाय पर्यंत जाऊन आले आहे. WEAKNESS असाच सुरु राहिला तर मार्केट पुन्हा एकदा ११६९१ या ५० DMA च्या पातळीला जाईल. जर क्लोजिंग बेसिसवर ही पातळी ओलांडली तर मात्र मार्केट पुन्हा ११६२५ पर्यंत जाईल. विकली चार्टवर डोजी पॅटर्न आहे.

बिमल जालन कमिटीची पुढील बैठक १७ जुलै २०१९ रोजी होईल. या बैठकीत RBI कडील सरप्लस संबंधित रिपोर्टला अंतिम स्वरूप दिले जाईल असा अंदाज आहे.

ACCENTURE च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आल्यामुळे IT सेक्टरमधील कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.
कर्नाटक राज्य सरकार बँगलोरमध्ये नवीन बांधकामावर ५ वर्षांसाठी बंदी घालण्याचा विचार करत आहे. बंगलोर शहरात होणारी गंभीर पाणी टंचाई हे कारण राज्य सरकारने दिले. यामुळे शोभा, ब्रिगेड, प्रेस्टिज इस्टेट या कंपनीच्या शेअरमध्ये मंदी आली.

DHFL आपल्या कंपनीचे चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार होती. पण आता ते हे निकाल १३ जुलै २०१९ रोजी जाहीर करतील. या त्यांच्या निकाल जाहीर करण्यात होत असलेल्या विलंबामुळे शेअर खूपच पडला.

सन फार्माच्या प्रमोटर्सनी तारण म्हणून ठेवलेले ८२ लाख शेअर्स सोडवले.

आज राष्ट्रीय बिमा जागरण दिवस साजरा केला गेला. आज लाईफ इंशुअरंस आणि जनरल इन्शुअरन्स या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये तेजी होती. उदा :- HDFC लाईफ, ICICI PRU, SBI लाईफ, ICICI लोंबार्ड.

सरकार आयात केलेल्या पाम ऑइलवर १०% ड्युटी लावणार आहे. इराणला जे सोयाबीन D -ऑइल्ड केक एक्स्पोर्ट करत होतो त्या एक्स्पोर्टमध्ये घट होईल. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर सोयाबीन च्या भावात घट होईल.

COX & KINGS ने कमर्शियल पेपरचे वेळेवर पेमेंट केले नाही म्हणून शेअर रेकॉर्ड लो वर बंद झाला.

नोकरी करणाऱ्या महिलांना अंदाजपत्रकात बर्याच सवलती देण्यात येतील. शैक्षणिक कर्जामध्ये ही सवलत दिली जाईल. तसेच क्रेशसाठी कारण्यात येणार्या खर्चावर टॅक्समध्ये सवलत दिली जाईल असा अंदाज आहे. यामुळे लव्हेबल लॉन्जरी, लक्स, रूपा, डॉलर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९३९४ NSE निर्देशांक निफ्टी ११७८८ बँक निफ्टी ३११०५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २७ जून २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २७ जून २०१९

आज क्रूड US $ ६५.९० प्रती बॅरल ते US $६६.४९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.०७ ते US $ १= Rs ६९.१५ या दरम्यान तर US $ निर्देशांक ९६.२८ VIX १४.६४ वर होता. जपानमधील ओसाका येथे चालू असलेल्या G -२० च्या बैठकीत USA चे अध्यक्ष ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात उद्या बोलणी होतील. ट्रम्प यांनी आजच स्पष्ट केले की भारताने USA मधून आयात होणाऱ्या मालावरील ड्युटी वाढवली आहे हे आपल्याला पसंत नाही.

येत्या शनीवारी होणाऱ्या ट्रम्प आनि जीन पिंग यांच्यातील वाटाघाटींकडे अवघ्या जगाचे लक्ष असेल. चीन आणि USA यांच्यातील ट्रेड वरचे चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे परिणाम होत आहेत. अनिश्चितता वाढत आहे. हे जरी खरे असले तरी याच्यामुळे पेपर इंडस्ट्री, आणि केमिकल इंडस्ट्री यांना फायदा होत आहे. ज्यूट व्यवसायाला हि फायदा होत आहे. केमिकल इंडस्त्रीमध्ये ऍग्रो केमिकल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर लक्ष ठेवावे. उदा. आरती, PI , विनंती, SRF, GALAXY फाईन केमिकल्स. दीपक नायट्रेट

आज सेबीने वोटिंग राईट्स, म्युच्युअल फंडांची विविध सेक्टरमध्ये गुंतवणूक, कॅश आणि लिक्विड असेटमधील गुंतवणुक, मल्टी नॅशनल कंपन्यांना त्यांच्या भारतीय युनिट्सकडून दिली जाणारी रॉयल्टी ५% पेक्षा जास्त द्यायची असेल तर शेअरहोल्डरची मंजुरी आवश्यक असेल. तसेच तारण म्हणून ठेवलेल्या शेअर्सच्या डिस्क्लोजर बाबतीत नवे नियम जाहीर केले. तारण म्हणून ठेवलेल्या शेअर्सच्या बाबतीत आता शेअर्स तारण ठेवण्याचे कारण डिस्क्लोज करावे लागेल. म्युच्युअल फंडांबरोबर कंपन्यांनी STANDSTILL अरेंजमेंट करणे टाळावे. शेअर बाय बॅकसाठी कंसोलीडेटेड बॅलन्स शीटचा डेट इक्विटी रेशियो लक्षात घेतले जाईल.

सरकारने PSU बँकांना MSME सेक्टरला दिलेल्या लोन्सची काळजी घ्यावी. तसेच MSME ला दिलेल्या किंवा मंजूर केलेल्या लोन विषयी साप्ताहिक रिपोर्ट द्यावा.

क्रूडचा भाव वाढू लागला की पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंडींगचे प्रमाण वाढवण्यासाठी उत्तेजन दिले जाते. इथेनॉलचा दर वाढवला जातो. इथेनॉल उत्पादन वाढावे यासाठी प्रयत्न केले जातात. यामुळे साखर सेक्टर मधील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली.

सरकार सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँका ज्या PCA ( प्रॉम्प्ट करेक्टिव्ह एक्शन) मध्ये आहेत त्यांना PCA मधून बाहेर पडण्यासाठी Rs ३५००० कोटी भांडवल पुरवेल. यात ज्या इतर बँकांनी भांडवलाची आपली गरज व्यक्त केली होती त्यांनाही भांडवल पुरवले जाईल. सरकारची अपेक्षा आहे की हे भांडवल पुरवल्यानंतर PSU बँक एलिजिबल व्यक्तींना कर्ज देतील. आणि कर्जाचा दुष्काळ संपेल. भांडवल मिळण्याच्या यादीत यूको बँक, कॉर्पोरेशन बँक, युनायटेड बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, अलाहाबाद बँक यांचा समावेश असेल.

आज निफ्टीने ११९०० ला स्पर्श करताच विक्री सुरु झाली. आज एक्स्पायरी असल्यामुळे विक्री अपेक्षित होती.

उद्या पहिल्या सहामाहीचा शेवटचा दिवस तर जुलै एक्स्पायरीचा पहिला दिवस असेल. १२ जुलै पासून इन्फोसिसच्या पहिल्या तिमाहींच्या निकालानंतर कॉर्पोरेट निकालांच्या सिझनचा शुभारंभ होईल. ओपेकची मीटिंग आहे. त्यात क्रूड उत्पादनात आणखी कपात होण्याची भीती आहे. जुलै ५ २०१९ ला केंद्र सरकार संसदेत अंदाजपत्रक सादर करेल. G -२० मधील वाटाघाटींचे फलितही कळेल. त्यामुळे पुढचा आठवडा मार्केटचा दृष्टीने महत्वाचा आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९५८६ NSE निर्देशांक निफ्टी ११८४१ बँक निफ्टी ३१२६९ वर वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २६ जून २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २६ जून २०१९

आज क्रूड US $ ६५.९८ प्रती बॅरल ते US $ ६६.२३ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.२७ ते US $१=Rs ६९.३६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.३० होता.

सरकारने BSNL आणि आणि MTNL या कंपन्यांचे पुरुज्जीवन करण्याचा निश्चय केला आहे.

L & T च्या ओपन ऑफरमध्ये माईंड त्रीचे काही संस्थापक सदस्य आपला स्टेक विकण्याची शक्यता आहे.

REL इन्फ्राला वर्सोवा बांद्रा सी लिंकसाठी Rs ७००० कोटींची ऑर्डर मिळाली. हा सी लिंक रोड ५ वर्षात पूर्ण करायचा आहे.

DHFL या कंपनीने Rs २२५ कोटींचा डिफाल्ट केला.

देशातच ग्राहक डाटा स्टोअर केला पाहिजे ही अट लौकरच सौम्य होऊ शकते किंवा रद्द केली जाऊ शकते. IT मंत्रालय लवकरच डाटा प्रोटेक्शन बिल आणत आहे.

ब्रिटानिया चे मॅनेजिंग डायरेक्टर वरूण बेरी यांनी कंपनीचा राजीनामा दिला अशी बातमी आल्याने ब्रिटानियाचा शेअर पडला. ही बातमी चुकीची आहे असे कंपनीने कळवल्यावर शेअरची किमानत पूर्व पदावर आली.

इंडिया मार्टचा IPO आज २२ एप्रिल २०१९ च्या सर्क्युलरप्रमाणे जून एक्स्पायरी नंतर दुपारी २ वाजेपर्यंत ३ वेळा भरला होता.

२२ एप्रिल २०१९ च्या सर्क्युलरप्रमाणे जून एक्स्पायरी नंतर ३४ शेअर्स F &O मार्केटमधून बाहेर होतील –
अजंता फार्मा, अलाहाबाद बँक, BEML, कॅन फिन होम्स, CEAT, चेन्नई पेट्रो, DCB, गॉडफ्रे फिलिप्स, गोदरेज इंडस्ट्रीज, GSFC, IDFC, IFCI, इंडिया सिमेंट, इंडियन बँक, इन्फिबीम, IRB इन्फ्रा, जेट एअरवेज, जैन इरिगेशन, कावेरी सीड्स, कर्नाटक बँक, MRPL, NHPC, OBC, PC ज्युवेलर्स, रेपको होम फायनान्स, R पॉवर, साऊथ इंडियन बँक, सुझलॉन, सिंडिकेट बँक, टाटा कम्युनिकेशन, टी व्ही १८ ब्रॉडकास्ट , V -गार्ड , VOKHARDT.

या शेअरमध्ये वायदे बाजारात आवश्यक तेवधी नव्हती. ही शेअर्स वोलटाइल राहतील आणि  या शेअर्स मध्ये आता F &O मार्केटमध्ये नवीन पोझिशन घेता येणार नाही. पण जुनी पोझिशन क्लोज करण्यासाठी दोन महिन्याची मुदत मिळेल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९५९२ NSE निर्देशांक निफ्टी ११८४७ बँक निफ्टी ३११६२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २५ जून २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २५ जून २०१९

आज क्रूड US $ ६४.२६ प्रति बॅरल ते US $ ६४.७४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.३२ ते US $१= Rs ६९.५२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.०८ तर VIX १५.५८ होते.

हळू हळू मान्सून देशाच्या सर्व भागात प्रवेश करत आहे. G -२० चे मीटिंग २८ आणि २९ जुलैला आहे. आंतरराष्ट्रीय बातम्या मिश्र स्वरूपाच्या आहेत.

रेटिंग एजन्सीजचे डाऊनग्रेडींग सुरु आहे. लोन डिफाल्ट च्या बातम्या सुरूच आहेत. लिक्विडीटी CRUNCH आहे. प्रमोटर स्टेक विकत आहेत. त्याच बरोबर टॅक्स कलेक्शन, GST कलेक्शन चांगले आहे. LTCG करात सवलत मिळेल या आशेवर मार्केट आहे . निदान एक्झम्पशन लिमिट Rs १००००० वरून Rs २००००० होईल अशी आशा आहे.

USA चे फॉरीन सेक्रेटरी पॉम्पीओ हे भारताच्या दौऱ्यावर आहेत. USA इंडिया ट्रेड वॉर, E- कॉमर्स डिस्प्युट यावर चर्चा होईल.

BNP पारिबस ही SBI लाईफ ची २.५ कोटी शेअर्स Rs ६५० प्रती शेअर या भावाने OFS च्या माध्यमातून विकणार असल्याने SBI लाईफ चा शेअर पडला.

IFCI त्यांचा NSE मधील २.४४% स्टेक म्हणजे १,२०, ६६८७१ शेअर्स विकणार आहे. म्हणून IFCI चा शेअर वाढला.
आज टायर शेअर्समध्ये तेजी होती कारण सरकार चीन मधून येणाऱ्या PNEUMATIC RADIAL टायर्सवर ५ वर्षांसाठी कॉउंटरव्हेलिंग ड्युटी लावणार आहे. उदा :- JK टायर्स, MRF. अपोलो, सिएट

सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या संदर्भात जी भूमिका घेतली आहि त्यामुळे पॉवर सेक्टरचे शेअर्स वाढले. उदा :- NTPC BHEL पॉवर ग्रीड REC PFC

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९४३४ NSE निर्देशांक निफ्टी ११७९६ बँक निफ्टी ३०८४७ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २४ जून २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २४ जून २०१९

आज क्रूड US $ ६५.३६ प्रती बॅरल ते US $ ६५.४८ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.४४ ते US $१=Rs ६९.६१ या दरम्यान होते. US $ निर्देशांक होता तर VIX १५.१२ होता.

इराण आणि USA यांच्यात तणाव वाढत आहे. त्यात ट्रम्प यांनी इराणवर नवीन निर्बंध लावण्याचे सूतोवाच केले. त्यामुळे जागतिक वातावरण गढूळ झाले आहे.

सध्या मार्केट कंटाळवाणे झाले आहे. सकाळी तेजीत असेल तर दुपारी मंदीत किंवा सकाळी मंदीत असल्यास दुपारी तेजीत असते. खराब बातम्यांना जास्त प्रतिसाद देते. चांगली बातमी आली म्हणून शेअर वाढला तर ‘सेल ऑन रॅलीज’ प्रमाणे कुठे शॉर्टींग सुरु होईल ते सांगता येत नाही. मंदीची टार्गेट पूर्ण होत आहेत. पण तेजीची टार्गेट पूर्ण होत नाहीत. तेजीची पोझिशन घेणारे फसत आहेत. फार्मा शेअरमध्ये मंदी आहे . निफ्टीचा ५० DMA ११६५० वर आहे. येथे सपोर्ट मिळतो आहे. पण खरेदीचा कल टिकाव धरत नाही.

आज शोभा आणि इमामी दोन्ही कंपन्यांच्या प्रमोटरनी स्टेक विकले. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांचे शेअर पडले.

‘नलमे जल’ या योजनेचे लक्ष्य आहे भारतातील प्रत्येक घरामध्ये नळातून पाणी मिळावे. या योजनेसाठी PVC पाइपची प्रचंड मागणी येईल. त्यामुळे पाईप उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर वाढतील असा अंदाज आहे. सुप्रीम इंडस्ट्रीज, जिंदाल SAW, महाराष्ट्र सिमलेस, फिनोलेक्स, ASTRAL पॉली, जैन इरिगेशन

सुझलॉनचा शेअर ११% वाढला. ब्रूकफील्ड सुझलॉनमध्ये मेजॉरिटी स्टेक घेणार आहे. त्याचा उपयोग सुजलॉनवर असलेले कर्ज फेडण्यासाठी केला जाईल. सुजलॉननी आपल्याला कर्ज देणाऱ्यांना एकरकमी कर्जफेडीचा प्रस्ताव दिला आहे.

इंडिया मार्टचा IPO आजपासून सुरु झाला. Rs ९७३ भावाचा विचार केल्यास EPS ६.९७ येतो. आणि P/B रेशियो १७.५१ टाइम्स एवढा होतो. त्यामुळे IPO मध्ये शेअर महाग ऑफर केला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या IPO ची प्रोसिड्स कंपनीकडे जाणार नाहीत.

KPR अग्रोकेम हा IPO शुक्रवारी ओपन होईल आणि २ जुलै २०१९ ला बंद होईल. याचा प्राईस बँड Rs ५९ ते Rs ६१ आहे. यातून Rs २८३ कोटी मिळतील.

आज बिमल जालान कमिटी आपला रिपोर्ट सादर करणार होती. पण अजून सदस्यांत मतभेद आहेत आणि ते दूर करण्याचा प्रयत्न कमिटी करत आहे. आता ही कमिटी जुलै २०१९ मध्ये अंदाजपत्रक संसदेत सादर झाल्यावर आपला अहवाल सादर करील.

राईट्स या कंपनीने तुमच्याजवळ ४ शेअर्स असतील तर एक बोनस शेअर दिला जाईल असे जाहीर केले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९१२२ NSE निर्देशांक निफ्टी ११६९९ बँक निफ्टी ३०६०२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २१ जून २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २१ जून २०१९

आज क्रूड US $६४.३३ प्रती बॅरल ते US $ ६४.९४ प्रती बॅरल या दरम्यान होते तर रुपया US $१=Rs ६९.५४ ते US $१= Rs ६९.६५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.२० होता. VIX आज ५% ने वाढून १४.६५ झाला.

USA च्या ड्रोनवर इराणने हल्ला करून ते पाडले. त्यामुळे इराण आणि USA यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला. त्यामुळे क्रूडच्या भावात वाढ झाली. इराणकडून भारताला क्रूड आयात करण्याची सवलत मिळावी यासाठी USA चे अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी G -२० परिषदेत भेट होईल तेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलणी करतील. USA चे सेक्रेटरी POMPEO यांच्याशी भारत सरकारने बोलणी सुरु केली आहेत.

आज GST कौन्सिलची मीटिंग आहे. या मीटिंग मध्ये इलेक्ट्रिक वाहनांवरील GST १२% वरून ५ % केली जाण्याची शक्यता होती.पण इलेक्ट्रिक व्हेहिकल्सवरचा GST कमी करण्याचा प्रस्ताव एका समितीकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला. GST कौन्सिलने २६ राज्यांमध्ये ट्रायब्युनल स्थापन करण्यासाठी मंजुरी दिली. GST कौन्सिलने अँटी प्रॉफीटीअरिंग बॉडीची मुदत २ वर्षांसाठी वाढवण्यास मंजुरी दिली. इलेक्ट्रिक चार्जरवरील GST चा दर १८% वरून १२% करण्यासाठी मंजुरी दिली. भारत सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादन आणि त्याच्याशी संबंधित सर्व गोष्टींना प्रोत्साहन आणी सवलती जाहीर करण्याची शक्यता आहे. यामुळे काही कंपन्यांचा फायदा होण्याची शक्यता आहे
BHEL ही कंपनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन बनवण्याचे, तसेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरीज बनवण्याचे काम करते . या कंपनीने दिल्ली चंदिगढमध्ये पहिले E-चार्जिंग स्टेशन उभारले. अडाणी गॅस या कंपनीने IOC बरोबर E -चार्जिंग स्टेशन उभारण्यासाही करार केला.

गोव्याच्या अर्थमंत्र्यानी मायनिंग सेक्टरसाठी सवलत मागितली. आयर्न ओअरसाठी GST मध्ये सूट देण्याची विनंती केली.

मारुती सुझुकीने डीलर इन्व्हेन्टरी फायनान्ससाठी बँक ऑफ बरोदाबरोबर करार केला. ऑरोबिंदो फार्माच्या XII युनिटला USFDA ने वॉर्निंग लेटर दिले.

IL & FS च्या ऑडिटर्सची संपत्ती जप्त करण्यासाठी मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स विनंतीने करण्याची शक्यता आहे.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९१९४ NSE निर्देशांक निफ्टी ११७२४ बँक निफ्टी ३०६२८ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २० जून २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २० जून २०१९

आज क्रूड US $ ६२.५० प्रती बॅरल ते US $ ६३.७५ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.४८ ते US $१=Rs ६९.५९ या दरम्यान US $ निर्देशांक ९६.६६ होता.

आज फेडची दोन दिवसांची मीटिंग संपली. फेडने आपल्या रेटमध्ये कोणतेही बदल केले नाहीत.

HDFC ने HDFC अर्गोसाठी अपोलो म्युनिच मध्ये ५१% ची खरेदी केली. या खरेदीनंतर HDFC अर्गो या कंपनीला कॅपिटलची गरज भासेल. हे मर्जर HDFC अर्गो आणि अपोलो म्युनिच या दोन्हीसाठी विन विन प्रपोजल आहे. अपोलो हॉस्पिटल त्यांनी घेतलेले कर्ज फेडू शकेल आणि HDFC अर्गोची साईझ वाढेल. यामुळे HDFC अर्गो ही Rs १०८०७ कोटींचा जनरल इन्शुअरन्सचा व्यवसाय असणारी दुसऱ्या नंबरची मोठी कंपनी होईल. या कंपनीचा IPO येऊ शकतो.

अपोलो हॉस्पिटल्सची या कंपनीतील Rs ३०० कोटींची गुंतवणूक चौपट झाली.

इंडिया बुल्स हौसिंगचा शेअर पडतो आहे याचा फायदा LIC हौसिंगला होउ शकतो.

H १B व्हिसाचा कोटा USA कमी करणार आहे. ८५००० व्हिसा दर वर्षी दिले जातात. त्यापैकी ७०% व्हिसा भारतीयांना दिले जातात. जे ग्लोबल डेटा स्टोअरेज रुल्स आहेत त्यानुसार ही एक्शन घेतली जात आहे. जो देश डेटा लोकलायझेशन करतो आहे त्या देशांना १५% व्हिसा मिळतील. लोकली डेटा गोळा करण्याच्या मुद्द्यावरून मास्टर कार्ड आणि विसा या कंपन्यांवर परिणाम होणार आहे. भारतामध्ये ब्रॉड डेटा प्रोटेक्शन कायदा येतो आहे.

सकाळी मार्केट बघण्याआधी सर्वांचे लक्ष जाते ते रेटिंग एजन्सीजने कोणाची रेटिंग कमी केले आहेत आणि कोणत्या कंपनीने किती कर्ज घेतले आहे, किती शेअर्स तारण ठेवले आहेत/ तारण म्हणून ठेवलेले किती शेअर्स सोडवले आहेत. आपण याकडे लक्ष देत नसाल तर ही मोठी चूक होईल.

आफ्रिकेमध्ये स्वाईन फ्लुची साथ आहे याचा परिणाम सोयाबीनवर होईल. आणि पर्यायाने UPL वर होईल. म्हणून UPLचा शेअर पडला.

सन फार्माच्या हलोल प्लांटमध्ये डेटा इंटिग्रिटीच्या बाबतीत इशू आहेत. प्लांटच्या तपासणीत USFDA ने पुन्हा एकदा ४ त्रुटी दाखवल्या.

जेट एअरवेज, जैन इरिगेशन, PC ज्युवेलर्स, कावेरी सीड्स, IRB इन्फ्रा, BEML, अजंता फार्मा, रेपको होम फायनान्स, CG पॉवर, GSFC इंडिया सिमेंट, IFCI, सुझलॉनहे सर्व शेअर्स F &O मधून बाहेर पडतील.

जुलै आणि ऑगस्ट २०१९ मध्ये ज्या NCD ड्यू होतील त्या इंडिया बुल्स बाय बॅक करेल. मालाला मागणी नाही कारण कर्ज मिळण्यामध्ये अडचणी आहेत त्यामुळे अशोक लेलँड ने पंतनगरच्या प्लांटमध्ये ५ दिवस उत्पादन बंद ठेवणार आहे.
इंडस इंड बँक आणि भारत फायनान्सियल इन्क्ल्युजन यांच्यातील मर्जरची ४ जुलै २०१९ ही रेकॉर्ड डेट ठरली आहे. भारत फायनान्सियल इन्क्यूजनच्या १०००शेअर्स ला इंडस इंड बँकेचे ६३९ शेअर्स मिळतील.

BKC च्या विक्रीमधून इंडिया बुल्स हौसिंगला Rs१६५० कोटी मिळाले. आतापर्यंत Rs ५८००० कोटी गोळा केले आहेत.
ILFS इंजिनिअरिंगला बिहारमध्ये पुन्हा NHAI चे प्रोजेक्ट सुरु करायला परवानगी मिळाली. आज जेट एअरवेजचा शेअर १२२% ने वाढला. हा शेअर या एक्स्पायरीनंतर F & O मधून बाहेर पडेल. जेट एअरवेजची केस NCLT ने दाखल करून घेतली तर पुष्कळ सवलती मिळतील असा अंदाज होता. या शेअर्समध्ये भरपूर शॉर्टींग होते ते कव्हर झाल्यामुळे हा शेअर एवढा वाढला. संध्याकाळी NCLT ने जेटची केस दाखल करून घेतल्याचे जाहीर केले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९६०१ NSE निर्देशांक निफ्टी ११८३१ बँक निफ्टी ३०८७१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १९ जून २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १९ जून २०१९

आज क्रूड US $ ६२.१० प्रती बॅरल ते US $६२.४६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.५६ ते US $१=Rs ते Rs ६९.६९ च्या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.९१ होता तर VIX १४.७७ होते.

आज चीन आणि USA यांच्यामधील ट्रेड वॉर निवळण्याची शक्यता अंधुकशी दिसू लागली आहे. आज USA चे अध्यक्ष आणि चीनचे प्रीमियर यांच्यात टेलीफोनवरील बोलणी सामंजस्याच्या दृष्टिकोनातुन झाली. जीन पिंग हे चीनचे प्रीमिअर ओसाका येथे होणाऱ्या G -२० देशांच्या परिषदेला हजर राहणार नाहीत असे चींनने जाहीर केले होते. पण आता या परिषदेत ट्रम्प आणि जीन पिंग यांच्यात चर्चा होईल . आमच्यात होणाऱ्या वाटाघाटींसाठी ऑफिसर लेव्हलवर तयारी चालू झाले आहे असे ट्रम्प यांनी सांगितले.

इराक मधील तेलविहिरींवर बॉम्ब हल्ला झाला, तसेच टँकर्सवरील हल्ले आणि USA आणि चीन यांच्यातील ट्रेड वॉर निवळण्याच्या शक्यतेमुळे क्रूड आज वधारले.

ECB चे द्रागची यांनी असे जाहीर केले की जर इन्फ्लेशनच्या ठरवलेल्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याची शक्यता कमी वाटली तर ECB पुन्हा रेट कट आणि मार्केटमधून ऍसेट खरेदीचे धोरण चालू ठेवेल.

जागतिक स्तरावर बॉण्ड्स यिल्ड कमी होत आहे. याला अनुसरून १० वर्षाच्या भारत सरकारच्या सॉव्हरिन बॉण्ड्स वरील यिल्ड ६.८१% वर आले.

USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारत सरकारला अशा इशारा दिला की ज्या भारतीय कंपन्या HUAWEI किंवा त्याच्या युनिट्सला USA मध्ये उत्पादन केलेला माल पुरवतील त्या कंपन्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.

मारुती सुझुकीने आज MASS मार्केटसाठी S PRESO हे नवीन मॉडेल सणासुदीच्या दिवसात मार्केट मध्ये आणले.

कॅनफिना होम्स या NBFC मधील आपला स्टेक कॅनरा बँक विकण्याची शक्यता आहे.

HEG आणि ग्रॅफाइट इंडिया या कंपनयांच्या शेअर्स विक्री इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स करत आहेत. ग्रॅफाइट एक्स लाभांश झाली. कर्नाटक पोल्युशन कंट्रोल बोर्डाने ग्रॅफाइट इंडिया या कंपनीच्या बंगळूर येथील प्लाण्टला उत्पादन ३० जून २०२० पर्यंत चालू ठेवण्याची परवानगी दिली पण यानंतर या प्लांटची जागा बदलायला सांगितले.कच्च्या मालाच्या किमती वाढत असल्यामुळे या कंपन्यांच्या ऑपरेटिंग मार्जिनवर दबाव येत आहे.. त्यामुळे हे दोन्ही शेअर्स पडत आहेत.

HDFC ने अपोलो म्युनिच हेल्थकेअरमधील ५१% स्टेक Rs १३४७ कोटींना खरेदी केला.

जेट एअरवेज या कंपनीचे इंसॉल्व्हंसी प्रोसिडिंग्स २० जून २०१९ पासून सुरु होईल.

इंडिया मार्ट या कंपनीचा IPO २४ जून २०१९ ला उघडून २६ जून २०१९ ला बंद होईल. या इशूचा प्राईस बँड Rs ९७० ते Rs ९७३ असून Rs १० दर्शनी किंमत असलेले ४८.८८ लाख शेअर्स असून Rs ४७५.५९ कोटी उभारले जातील. यात वर्तमान शेअरहोल्डर्स शेअर विकत असल्यामूळे कंपनीकडे या इश्युचे प्रोसिड्स जाणार नाहीत.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९११२ NSE निर्देशांक निफ्टी ११६९१ बँक निफ्टी ३०३६२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १८ जून २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १८ जून २०१९

आज क्रूड US $ ६०.४७ प्रती बॅरल ते US $ ६०.८३ प्रती बॅरल आणि रुपया US $१=Rs ६९.६७ ते US $१=Rs ६९.८१ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.४२ होता तर VIX १४.९७ होता.

क्रूडचे उत्पादन एकूण ७०००० बॅरल प्रती दिवस ७ ऑइल फिल्ड्स मधून वाढेल त्यामुळे क्रूडचा भाव आज कमी झाला.
गेले चार दिवस मार्केट सातत्याने लोअर हाय आणि लोअर लो या क्रमाने जात होते. आज याला ब्रेक लागला. निफ्टीच्या ५० DMA चा किल्ला बुल्सनी जोरदारपणे लढवला. आणि क्लोजिंग बेसिसवर ५० DMA च्या वर मार्केट क्लोज झाले. पण ही थोडीफार तेजी सुरु राहील का ते पाहावे लागेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ५० DMA म्हणजे काय? तरDMA म्हणजे ५० दिवसांच्या किमतीची सरासरी. अशी सरासरी १० दिवसांची, २० दिवसांची, ५० दिवसांची, १०० दिवसांची, २०० दिवसांची घेतली जाते. जेव्हा मार्केट वाढत असते तेव्हा हा सरासरीचा प्राईस पाईंट सपोर्टचे काम करतो आणि जेव्हा मार्केट पडत असते तेव्हा हा पाईंट रेझिस्टन्सचे काम करतो. १० दिवसांच्या क्लोजिंग प्राईसची बेरीज करा आणि त्याला १०ने भागा म्हणजे १० DMA येते.

सध्याच्या मार्केटमध्ये बॉटम फिशिंग हा शब्द वारंवार वापरला जातो. बॉटम फिशिंग ही एक गुंतवणूक करण्याची पद्धत आहे. जर शेअरची किंमत खूप कमी झाली पण कंपनीच्या मूलभूत बिझिनेसमध्ये मोठा बदल झाला नसेल तर अशा वेळेला हे शेअर स्वस्त किमतीला उपलब्ध असतात. जर मार्केट सुधारले तर ह्या शेअर्सची किंमत पुन्हा पुर्वीसारखी होईल आणि आपल्याला भरपूर फायदा मिळेल असा अंदाज या शेअर्सच्या खरेदी मागे असतो. पण यात धोकाही तितकाच आहे. एखाद्या कंपनीची आर्थिक परिस्थिती सुधारते पण बहुतेक वेळेला कंपन्या टिकाव धरू शकत नाहीत. जर त्या कंपनीची आर्थिक अवस्था बिघडत गेली तर त्या शेअर्सची किंमत पडतच राहते आणि मोठा तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे बॉटम फिशिंग करायला गेलात तरी त्याचे प्रमाण कमी ठेवा.

जेट एअरवेजची केस NCLT मध्ये घेऊन जायची असा जेटला कर्ज देणार्या बँकांच्या कन्सॉरशियमने निर्णय घेतला. पण आश्चर्यकारकरित्या आज बँकांचे शेअर्स आपटले नाहीत. कारण बँकांच्या शेअर्सच्या किमतीत जेट एअरवेजला दिलेल्या कर्जाची परतफेड न झाल्यामुळे होणारा तोटा समाविष्ट आहे. जेट एअरवेजच्या दोन इंडिपेण्डण्ट डायरेक्टर्सनी आज राजीनामा दिलला. त्याची नावे (१) अशोक चावला आणि शरद शर्मा अशी आहेत. त्यामुळे जेटचा शेअर पडला.

HDFC AMC ने असे जाहीर केले की HDFC म्युच्युअल फंडाच्या FMP ( फिक्स्ड मॅच्युरिटी प्लान) ने खरेदी केलेले एस्सेल ग्रुपच्या कंपन्यांचे Rs ५०० कोटींचे NCD ( नॉन कॉन्व्हर्टिबल डिबेंचर्स) FMP कडून आपल्या बॅलन्सशीटमध्ये समाविष्ट करून FMP ला लिक्विडीटी प्रोव्हाइड करेल. या NCDच्या HDFC AMC ला केलेल्या विक्रीतून आलेल्या पैशातून ज्या FMP च्या युनिटधारकांच्या युनिट्सची मुदत मार्च २०१९ ला संपली किंवा सप्टेंबर २०१९ पर्यंत संपत आहे त्या युनिटधारकांचे पैसे परत केले जातील. HDFC AMC ची ही कॉर्पोरेट एक्शन जरी FMP च्या युनिटधारकांसाठी योग्य असली तरी HDFC AMC च्या शेअरहोल्डर्ससाठी हिताची नव्हती. कारण यामुळे पुढील दोन तिमाहीच्या HDFC AMC च्या प्रॉफिटवर परिणाम होईल. त्यामुळे HDFC AMC चा शेअर पडला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९०४६ NSE निर्देशांक निफ्टी ११६९१ बँक निफ्टी ३०३५१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १७ जून २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १७ जून २०१९

आज क्रूड US $ ६१.७१ प्रती बॅरल ते US $ ६२.१२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ६९.७९ ते US $ १= Rs ६९.८५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.५२ होता तर VIX १४ पेक्षा जास्त होते.

आज NSE निर्देशांकाने ५० DMA म्हणजेच ११६८० चा सपोर्ट तोडला आता नेक्स्ट सपोर्ट ११६५० चा आहे.

इराणने आपण १० दिवसांत युरेनियम करार रद्द करू असे जाहीर केले.

फेडची दोन दिवसांची बैठक १८ जून २०१९ पासून सुरु होईल. जरी या बैठकीत रेट कट करण्याचा निर्णय झाला नाही तरी जुलै २०१९ मध्ये रेट कट जाहीर केला जाईल असा अंदाज आहे.

USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केले की आपण लवकरच आपली अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर करू.

RBI ने असे जाहीर केले की महागाई काबूत ठेवून ग्रोथवर लक्ष केंद्रित केले जाईल. आर्थिक स्थिरतेला प्राधान्य दिले जाईल.NBFC साठी नवीन रेग्युलेटरी नियमांवर RBI मध्ये विचार मंथन चालू आहे.

दिल्ली राज्य सरकारने असे जाहीर केले की दिल्ली राज्य सरकार एक्सक्लुझिव्ह इलेक्ट्रिक व्हेहिकल झोन बनवेल. या झोन मध्ये उभारलेल्या चार्जिंग स्टेशन्सना राज्य सरकार मोफत वीज पुरवेल .

अकौंटिंग स्टॅण्डर्ड्समध्ये सुधारणा झाल्यामुळे ज्या कंपन्यांनी दीर्घ मुदतीची लीज ऍग्रीमेंट केली आहेत त्यांच्या बॅलन्स शीटवर परिणाम होईल. आतापर्यंत ह्या लीजवर केलेला खर्च कंपन्या इतर खर्च या सदरात दाखवत होत्या. या नियमानुसार आता या लीजवरील खर्चाचे तीन कॉस्टमध्ये विभाजन करून त्यांना P & L अकौंटमध्ये इफेक्ट द्यावा लागेल.यामुळे जरी एकंदर प्रॉफिटमध्ये फरक पडणार नसला तरी कॉस्टच्या विश्लेषणात फरक पडेल. याचा परिणाम मल्टिप्लेक्सेस, DEPT स्टोअर्स, FMCG कंपन्या, हॉटेल व्यवसायातील कंपन्या यांच्यावर परिणाम होईल. उदा PVR, इनॉक्स लिजर, फ्युचर रिटेल. ,

आज हवामान खात्याने जाहीर केले की १६ जून २०१९ पर्यंत ४३% पाऊस कमी झाला आहे. दक्षिण भारतामध्ये ५% प्रदेशात पाऊस पोहोचला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक,तेलंगाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ या राज्यांमध्ये नियमित पावसाळा सुरु झाला नाही. जुलै २०१९च्या उत्तरार्धात पावसाचे प्रमाण वाढेल. जुलै महिन्याचा उत्तरार्ध आणि ऑगस्ट २०१९ या महिन्यात ८०% पाऊस पडेल.

DCC (डिजिटल कम्युनिकेशन कमिशन) ने भारती एअरटेल आणि वोडाफोन आणि आयडिया या कंपन्यांवर २०१५ आणि २०१६ मध्ये Rs ३०५० कोटी दंड लावण्याच्या डॉट आणि ट्राय यांच्या निर्णयाची पुष्टी केली. पण DCC अजून एकदा याबद्द्ल TRAI चे मत लक्षात घेईल.

टाटा कम्युनिकेशनने Batelko बरोबर नेटवर्क कनेक्टिव्हिटीसाठीच्या कराराची मुदत वाढवली.

रिलायन्स इन्फ्राला चौथ्या तिमाहीत Rs ३३०१ कोटी तोटा झाला. त्यामुळे शेअर सपाटून पडला.

पिरामल एंटरप्रायझेसने श्री राम ट्रान्सपोर्ट या कंपनीतील आपला १०% स्टेक विकला. त्यामुळे दोन्हीही शेअर पडले.
चहाची MSP (मिनिमम सपोर्ट प्राईस) सरकार ठरवणार आहे.
.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८९६० NSE निर्देशांक निफ्टी ११६७२ बँक निफ्टी ३०२७३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!