आजचं मार्केट – ३१ मे २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ८ – ९ June आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ३१ मे २०१९

आज क्रूड US $ ६५.८३ प्रती बॅरल ते US $ ६६.१४ प्रति बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.७४ ते US $ १=Rs ६९.८६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.१२ तर VIX १६.३४ होते.  आज सेन्सेक्सने ४००००चा आणि निफ्टीने १२००० चा पल्ला दुसऱ्यांदा पार केला. पण थोड्या वेळातच मार्केट ४५० पाईंट पडले. आणि दिवसभर अस्थिर राहिले.

मे ते जूलै या दरम्यान क्रूडची मागणी कमी होते. त्यामुळे आज क्रूडचा भाव US $ ६६ वर आला. क्रूडचे दर कमी होणे आणि मोदी पंतप्रधान यांच्यात काही दैवी संकेत आहे का ? २०१४ मध्येही क्रूडचे दर कमी झाले होते.

USA मेक्सिकोच्या सगळ्या उत्पादनावर १० जून २०१९ पासून ५% ड्युटी लावणार आहे.. बेकायदेशीरपणे मेक्सिकोतुन येणाऱ्या प्रवाशांवरही ड्युटी लावली जाईल.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर केले. त्यात मार्केटच्या दृष्टीने महत्वाचे म्हणजे अर्थ खाते निर्मला सीतारामन, रेल्वे पियुष गोयल यांच्याकडे, तर पेट्रोलियम आणि स्टील हे खाते धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे आणि हरदीपसिंग पुरी यांच्याकडे अर्बन डेव्हलपमेंट, हौसिंग आणि विमान सेवा ही खाती सोपवली.

आज FY १८-१९ च्या चौथ्या तिमाहीसाठी GDP ५.८% म्हणजे ५ वर्षाच्या लो पाईंटला होते.

आंध्रातल्या सत्ता पालटाचा जबरदस्त फटका NCC या इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील कंपनीला बसला. जे प्रोजेक्ट पूर्वीच्या आंध्र प्रदेश राज्य सरकारने मंजूर केले होते त्यांच्यापैकी ज्या प्रोजेक्टमध्ये कामाची २५% प्रगती झाली नाही, त्या प्रोजेक्ट्सची सर्व पेमेंट स्टॉप केली जातील. प्रोजेक्ट्चे रिव्हॅल्युएशन केले जाईल. जे प्रोजेक्ट अजून सुरू झाले नाहीत त्याची मंजुरी ताबडतोब रद्द केली जाईल. असा निर्णय नव्या आलेल्या राज्य सरकारने घेतला. यामध्ये अमरावती या आंध्र सरकारच्या नव्या राजधानीसाठी विमानतळ बांधणे, रस्ते बांधणी यांचा समावेश असेल. या बातमीमुळे NCC चा शेअर १८% पडला. त्या बरोबरच आंध्र प्रदेशांत बेस असलेल्या सिमेंट कंपन्यांचे शेअर्स पडलेउदा रामको सिमेंट इंडिया सिमेंट

टाटा स्टील या कंपनीला भूषण स्टील या कंपनीबरोबर भूषण एनर्जी ही कंपनीही मिळाली. या कंपनीत भूषण स्टील या कंपनीचा ४७.८% स्टेक आहे. ही कंपनी भूषण स्टील या कंपनीला पॉवर पुरवत होती. आता टाटा स्टील या महत्वाच्या पॉवर ऍसेटचे मालक होतील. यामुळे कॅप्टिव्ह पॉवरचा पुरवठा टाटा स्टील BSL या कंपनीला होईल.

आज SBI चे चेअरमन विमान खात्याच्या सचिवांची जेट एअरवेजच्या रेझोल्यूशन प्लानच्या संबंधात भेट घेतील. ऑन गोईंग बिडिंग प्रोसेसमुळे जेट एअरवेजचे चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर होऊ शकले नाहीत. कारण चौथ्या तिमाहीत निकाल ऑडिट झाल्याशिवाय प्रसिद्ध होऊ शकत नाहीत.

कोल इंडियाचे चौथ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले तर ONGC चे निकाल अपेक्षेप्रमाणे आले नाहीत.

KNR कन्स्ट्रक्शन, उज्जीवन, CIMMCO या कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले

जैन इरिगेशन या कंपनीचे चौथ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते. .

भारती एअरटेलचा डेटा खूप चांगला आला.

हा महिना मार्केटच्या दृष्टीने चांगला आहे. FII आणि DII मार्केटमध्ये खूप गुंतवणूक करत आहेत.फक्त दुसर्या आठवड्यात ऍडव्हान्स टॅक्समुळे थोडेसे करेक्शन येण्याचा संभव आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९७१४, NSE निर्देशांक निफ्टी ११९२२ बँक निफ्टी ३१३७५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.