आजचं मार्केट – ३ जून २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ८ – ९ June आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ३ जून २०१९

आज क्रूड US $६०.९४ प्रती बॅरल ते US $ ६२.१४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.४१ ते US $१=Rs ९.४३ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.६६ होता. विक्स १६.०९ होते. क्रूड पडत असले की रुपया वधारत असतो. रुपया US $ चा विनिमय दर US $१=Rs ६८.८० पर्यंत जाईल असा अंदाज आहे. मेक्सिको आणि चीनबरोबरच्या ट्रेड वॉरमुळे क्रूडला मागणीच नाही. मेटल्सना मागणी नसल्यामुळे चांदी Rs ३६००० वर होती.

USA भारताला दिली जाणारी प्रेफरंशियल ट्रेड ट्रीटमेंट ५ जून २०१९ पासून बंद होईल. GSP (जनरलाईज्ड सिस्टिम ऑफ प्रेफरन्स) मधून भारताला वगळण्यात येईल. भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती नाजूकच म्हणावी लागेल. GDP गेल्या पांच वर्षातील किमान स्तरावर तर बेकारी गेल्या ४५ वर्षाच्या कमाल स्तरावर आहे. आर्थीक मंदीची भीती आहे. GST कलेक्शन १लाख कोटींच्यावर गेले आणि GDP कमी झाले. म्हणजे ग्रोथ ओरिएंटेड अंदाजपत्रक पाहिजे.

खरे पाहता ऑटो शेअर्स जेवढे वाढले त्यामानाने ऑटो विक्रीचे आकडे चांगले नव्हते. पण ऑटो शेअर्स मध्ये आलेले करेक्शन आणी RBI च्या पॉलिसीमध्ये रेट कटची अपेक्षा याचाही हातभार लागला. हिरो मोटो मध्ये ४३% करेक्शन झाले आहे ही नो DEBT कंपनी आहे. फार्म सेक्टरला काही फायदे मिळाल्यास हिरोची विक्री वाढेल.

महिंद्रा आणि महिंद्राच्या प्रमोटर्सनी आपला स्टेक कमी केला. २ कोटी शेअर्स Rs १२४४ कोटींना विकले. कॅनडाच्या CBPQ या पेन्शन फंडाने हा स्टेक खरेदी केला. हा पैसा इलेक्ट्रिकल व्हेईकल च्या विकासासाठी वापरण्यात येईल.

अपोलो हॉस्पिटल्सचे निकाल ठीक होते. पूर्ण वर्षांचा नफा ३ पट वाढला. तारण म्हणून ठेवलेले शेअर्स ७८% होते. आता ते जवळ जवळ १०% ने कमी झाले आहेत. ब्रोकरेज हाऊसेसनी टार्गेट वाढवले. २०२० च्या अखेरीपर्यंत तारण ठेवलेले शेअर्स सोडवणार आहेत. कर्जही कमी करणार आहेत. त्यामुळे शेअर वाढला.

अर्थव्यवस्थेत लिक्विडीटी चांगली आहे. पण कॉस्ट ऑफ मनी खूपच जास्त आहे. स्माल सेविंग स्कीममध्ये दिले जाणारे व्याजाचे दर जास्त आहेत. त्यामुळे पैशाची उपलब्धता असली तरी बाजारातून पैसा उभा करणे खर्चीक होत आहे.
नॅशनल ब्रॉड बँड मिशन सुरु करणार आहेत. BSNL आणि MTNL रिवाईव्ह करण्याला प्राथमिकता दिली जाईल. ५० लाख वायफाय हॉट स्पॉट बसवणार.

त्रिवेणी इंजिनीअरिंग Rs १०० प्रती शेअर या भावाने १ कोटी शेअर्स बाय बॅक.करेल.

सेन्च्युरी टेक्सटाईल्स आपली सिमेंट डिव्हिजन (३ युनिट्स) डीमर्ज करून अल्ट्राटेक सिमेंट मध्ये मर्ज करेल. सेंच्युरी टेक्सटाईल्सच्या ८ शेअर्स ऐवजी अल्ट्राटेक सिमेंटचा एक शेअर मिळेल.

कॅडीलाच्या नेशर या प्लांटसाठी USFDA ने ११ त्रुटी दाखवल्या.

पुढील आठवड्यात फेडची बैठक, RBI पॉलिसी, रुपया रिबाउंड आणि सरकारकडून स्टिम्युलस हे ट्रिगर असू शकतात.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०२६७ NSE निर्देशांक निफ्टी १२०८८ वर बँक निफ्टी ३१६५३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.