आजचं मार्केट – ४ जून २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ८ – ९ June आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ४ जून २०१९

आज क्रूड US $ ६०.८४ प्रती बॅरल ते US $ ६१.२० प्रति बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.०६ ते US $१= Rs ६९.२३ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.१४ होता

पाऊस उशिरा सुरु होणार आहे असे सांगितले. ट्रेंड वॉरचे टेन्शन वाढते आहे FII नी हळू हळू पैसा काढून घेण्यास सुरुवात केली आहे. प्रॉफिट बुकिंग सुरु आहे. मार्केट ओव्हरबॉट झोनमध्ये आहे. प्रत्येक जण सावध आहे. RBI रेट कट करेल ही एक आशा आहे.. पण बँका आपल्या कर्ज देण्याचा रेट कमी करण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे उद्योगासाठी रेट कट हे हत्यार प्रभावी करण्यासाठी RBI ला यावेळेला थोडे वेगळे उपाय शोधावे लागतील.

ICICI बँक आणि ऍक्सिस बँक यांना ‘FITCH’ या रेटिंग एजन्सीने डाऊन ग्रेड केले आहे

NTPC आणि SJVN यांचे मर्जर सरकारच्या १०० दिवसांच्या अजेंड्यावर आहे.

L &T टेकचा OFS Rs १६५० प्रती शेअर या भावाने येत आहे. हा शेअर सोमवार तारीख ३ जून २०१९ रोजी Rs १७०५ वर क्लोज झाला होता. म्हणजे Rs १६५० पर्यंत हा शेअर खाली येणार हे उघडच आहे. L & T त्यांचा स्टेक कमी करणार आहे. म्हणजे यातून Rs ६६५ कोटी L & T ला मिळणार. त्यामुळे L & T च्या शेअर वर परिणाम होऊ शकतो.

साखर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना कमी दराने कर्ज मिळण्याची मुदत केंद्र सरकारने एक वर्ष वाढवली. त्यामुळे आज सर्व साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती.

विप्रोच्या Rs ३२५ प्रती शेअर या भावावरच्या शेअर बाय बॅकसाठी २१ जून २०१९ ही रेकॉर्ड डेट ठरवली आहे. गुरुवारी जरी शेअर विकत घेतला तरी Rs ३० नफा मिळण्याची शक्यता आहे.

IOC ने HPCL आणि BPCL या कंपन्यांबरोबर कांडला गोरखपूर या २७५७ किलोमीटर लांबीच्या पाईपलाईनसाठी जॉईंट व्हेंचर केले.

ग्राफाइट इंडिया या कंपनीने Rs ३५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला आहे लाभांशासाठी रेकॉर्ड डेट २७ जून २०१९ आहे. ग्राफाइट इंडियाचा Rs ४२१ भाव आहे. तुम्हाला लाभांशाचा फायदा होऊ शकतो.

परदेशातून सतत पैसा गुंतवणुकीसाठी येत आहे.यामुळे रुपयांचा दर वाढतो आहे. क्रूडचा भाव कमी होत आहे. USA आणि युरो देशांमध्ये ग्रोथ कमी आहे. क्रूडचे उत्पादन आणि भांडार USA मध्ये वाढत आहे. या सगळ्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचा भाव वाढत आहे.

सरकार लवकरच IPO आणि FPO दवारा PSU मध्ये असलेला आपला स्टेक विकणार आहे.

नीलांचल इस्पात निगम, सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, THDC, पवन हंस, आणि एअर इंडियामधील स्टेक विकणार आहे. या प्रक्रियेत येणाऱ्या सर्व अडचणी सरकार नियमात बदल करून दूर करील.

बजाज ऑटोने प्लॅटिनम ११०H गियर ही नवीन मोटारसायकल Rs ५३३७६ या किमतीला बाजारात आणली.

अडानी पोर्ट ही कंपनी Rs ५०० प्रती शेअर या भावाने टेंडर ऑफर रुटने ३.९२ कोटी शेअर्स बाय बॅक करण्यासाठी Rs १९६० कोटी खर्च करेल. प्रमोटर्सही या बाय बॅक मध्ये सहभागी होणार आहेत. शेअर बाय बॅक प्राईस आजच्या CMP वर १७.५% प्रीमियमने आहे.

कोलगेटने कंपनीच्या विक्रीच्या ५% रॉयल्टी दिली पाहिजे असे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीची यावर्षी Rs ४४६२ कोटी विक्री झाली. Rs २२३ कोटी रॉयल्टी म्हणून द्यावे लागतील. यासाठी कंपनीने शेअर होल्डरची परवानगी मागितली आहे.गेल्या वर्षी कंपनीने Rs २०७ कोटी रॉयल्टी दिली होती.

उद्या शेअर मार्केट रमझान ईद निमित्त बंद आहे. ६ जून २०१९ ला सकाळी ११- ४५ वाजता RBI चे वित्तीय धोरण जाहीर होईल. ग्रोथला स्टिम्युलस म्हणून RBI रेट कट करण्याची शक्यता आहे. किमान ०.२५% ते ०.५०% रेट कट होण्याची शक्यता आहे. आज आणि काल RBI च्या MPC (मॉनेटरी पॉलिसी कमिटी) ची बैठक चालू आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४००८३ NSE निर्देशांक निफ्टी १२०२२ वर बँक निफ्टी ३१५८९ वर क्लोज झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.