आजचं मार्केट – ६ जून २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ८ – ९ June आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ६ जून २०१९

आज क्रूड US $ ६०.७७ प्रती बॅरल ते US $ ६०.८६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.२० ते US $ १=Rs ६९.४० या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.३० होता. VIX १५.३३ होता.

USA मध्ये क्लास ८ ट्रकची मागणी कमी झाली. याचा परिणाम भारत फोर्ज या कंपनीवर होईल.

ऑरोबिंदो फार्माच्या हैदराबाद प्लांटच्या, इंडोको रेमेडीजच्या गोवा युनिटच्या USFDA ने केलेल्या तपासणीत त्रुटी दाखवल्या. नाटको फार्माच्या KOTHUR युनिटच्या केलेल्या तपासणीत ९ त्रुटी दाखवल्या.

टिटाघर वॅगन्स चा सिमको लिमिटेडमध्ये ७९.३७% स्टेक आहे तो स्कीम ऑफ ऑरेंजमेन्ट प्रमाणे ७५% पर्यंत खाली आणायचा आहे. टिटाघर वॅगन्स सिमको मधील आपला ४.४९% स्टेक OFS च्या माध्यमातून Rs २९ प्रती शेअर या भावाने विकणार आहे.टिटाघर वॅगन्सच्या १३ शेअर्सना सिमकोचे २४ शेअर्स मिळणार.

टाटा मोटर्स आणि BMW यांच्यात इलेक्ट्रिक व्हेइकलचे पार्ट बनवण्यासाठी करार झाला.पूर्वी टोयोटा आणी मारुती यांच्यात असाच करार झाला होता.

महिंद्रा लॉजिस्टिकमध्ये मोठ्या मोठ्या फंडांनी मंगळवारी तारीख ४ जून २०१९ रोजी गुंतवणूक केली आहे.ऍक्युम्युलेशन सुरु आहे. क्रूडचा भाव घटतो आहे त्याचा फायदा मिळताना दिसत आहे. फ्रेटमध्ये फारसा फरक पडत नाही. Rs ४४० ते Rs ४५० प्रती शेअर या भावापेक्षा भाव कमी होईल तेव्हा खरेदी करण्यास योग्य होईल.

आज गेल या कंपनीचा शेअर सपाटून पडला. गेलचे मुख्य उत्पन्न गॅस वाहून नेण्यासाठी जी टॅरिफ आकारली जाते तिच्यात PNGRB ने फार कमी वाढ केली. हे हझिरा विजयपूर जगदीशपूर पाईपलाईनच्या बाबतीत झाले. टॅरिफचा दर Rs २५ वरून Rs ४१ प्रती MMBTU केला त्यामुळे गेल चा EPS ३% ते ४% ने कमी होईल. गेलच्या रिस्ट्रक्चरिंगची बातमी येत आहे.

DHFL ला आवास फायनान्स मधील स्टेक विकण्यासाठी RBI ने परवानगी दिली. हा स्टेक DHFL ‘वॉरबर्ग पिनकस’ ला विकेल.

हिंदुस्थान कॉपरने कॅथोड आणि वायर रॉडच्या किमती ५% ने कमी केल्या. त्यामुळे शेअर पडला.

आज RBI ने आपली द्विमासिक मॉनेटरी पॉलिसी जाहीर केली. रेपो रेट ०.२५% कमी केला. आता रेपो रेट ५.७५% असेल. रिव्हर्स रेपो रेट ५.५० % राहील. CRR ४% राहील. RBI ने आपला स्टान्स ‘NEUTRAL’ वरून ACCOMODATIVE केला.
FY २०१९-२० च्या पहिल्या सहा महिन्यांसाठी GDP ग्रोथ रेट ६.४% ते ६.७% तर महागाईचा दर (इन्फ्लेशन) ३% ते ३.३१% असण्याचा अंदाज जाहीर केला.

FY २०१९-२० च्या दुसऱ्या सहामाहीत GDP ग्रोथचा रेट ७.२% ते ७.५% तर महागाईचा ( इन्फ्लेशन) चा दर ३.४०% ते ३.७० % राहील असा अंदाज जाहीर केला.

ऑगस्ट २०१९ पासून मागणी केल्यास स्माल फायनान्स बँकेची लायसेन्स मिळतील असे जाहीर केले.

डिजिटलायझेशनला उत्तेजन देण्यासाठी RTGS,आणि NEFT वरील RBI लावत असलेले चार्जेस रद्द केले. याचा फायदा पास ऑन करण्याची सूचना बँकांना दिली. ATM साठी लागणारे चार्जेस आणि फीज ठरवण्यासाठी समिती नेमली जाईल असे जाहीर केले. NBFC सेक्टरची प्रत्येक वर्षी समीक्षा केली जाईल असे जाहीर केले. ग्रामीण भागातील विविध वस्तूंसाठी मागणी कमी होत आहे याबद्दल चिंता व्यक्त केली.

RBI ने आतापर्यंत ०.७५% रेपो रेट कमी केला पण बँकांनी मात्र यापैकी फक्त ०.२१% रेट कट कर्जदारांकडे पास ऑन केला. यावेळी मात्र बँका जास्तीतजास्त क्वांटिटीमध्ये आणि कमीतकमी वेळात हे रेट कट कर्जदारांकडे पास ऑन करतील यावर RBI लक्ष ठेवेल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९५२९ NSE निर्देशांक निफ्टी ११८४३ आणि बँक निफ्टी ३०५८७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.